Kumar Pillai : हाँगकाँगमधून अटक, 10 वर्षे तुरुंगात; मुंबईचा 'गँगस्टर' कुमार पिल्लई परतीच्या वाटेवर  

कुख्यात गुंड कुमार पिल्लई हा मूळचा मुंबईतील विक्रोळी भागातील आहे.  त्याचे वडील एका केमिकल कंपनीत काम करायचे, मात्र त्यांच्या हत्येनंतर कुमार पिल्लईने गुन्हेगारीच्या जगात पाऊल ठेवले.

जाहिरात
Read Time: 2 mins

Kumar Pillai News : न्यायालयाने मुंबई पोलिसांना कथित गँगस्टर कुमार पिल्लईला त्याच्या स्वदेशी हाँगकाँगला परत पाठविण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने सर्व प्रकरणात त्याची सुटका केली आहे. विशेष मकोका न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण आर. नावंदर यांनी १३ फेब्रुवारी रोजी दिलेल्या आदेशात म्हटलं की, प्रत्यार्पण करणाऱ्या देशाच्या परवानगीशिवाय अर्जदारावर भारतातील इतर कोणत्याही प्रलंबित प्रकरणांमध्ये खटला चालवता येणार नाही. न्यायाधीश पुढे म्हणाले, त्यामुळे पिल्लईला त्याच्या मायदेशी, म्हणजे हाँगकाँगला परत पाठवण्याशिवाय फिर्यादी पक्षासमोर कोणताही पर्याय उरलेला नाही.

कुख्यात कथित गुंड कुमार पिल्लई हा मूळचा मुंबईतील विक्रोळी भागातील आहे.  त्याचे वडील एका केमिकल कंपनीत काम करायचे, मात्र त्यांच्या हत्येनंतर कुमार पिल्लईने गुन्हेगारीच्या जगात पाऊल ठेवले.

नक्की वाचा - Epstein Files मध्ये Dalai Lama यांचा 169 वेळा उल्लेख? स्पष्टीकरणात मोठे खुलासे


कुमार पिल्लई कोण आहे? 



कुमार पिल्लई हा मूळचा मुंबईतील विक्रोळी भागातील होता. त्याचे वडील एका केमिकल कंपनीत काम करायचे, मात्र त्यांच्या हत्येनंतर कुमार पिल्लईने गुन्हेगारीच्या जगात पाऊल ठेवले. सुरुवातीला त्याने अमर नाईक टोळीशी हातमिळवणी केली होती. त्यातही मुंबईतील विक्रोळी, कांजूरमार्ग आणि भांडुप या भागांत त्याचं वर्चस्व होतं. खंडणी, हत्या आणि जमीन बळकावणे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याचे नाव होते. 

कुमार पिल्लई व्यवसायाने केमिकल इंजिनिअर असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे त्याला 'शिक्षित गुंड' म्हणून ओळखले जाई. एकेकाळी तो छोटा राजनचा जवळचा सहकारी मानला जात होता. भारतीय तपास यंत्रणांपासून वाचण्यासाठी तो जवळपास १८-२० वर्षे देशाबाहेर सिंगापूरमध्ये लपून बसला होता. इंटरपोलने जारी केलेल्या रेड कॉर्नर नोटीसच्या आधारे त्याला भारतीय पोलिसांनी सिंगापूरमधून ताब्यात घेण्यात आलं होतं. कुमार पिल्लईवर खंडणीसाठी बिल्डरांना धमकावल्याचे अनेक गुन्हे दाखल असल्याचं सांगितलं जातं. विशेषतः विक्रोळीतील पूर्व उपनगरांमध्ये त्याच्या नावाची मोठी दहशत होती असं म्हटलं जातं. 

Advertisement

भारताने पिल्लई याच्याविरुद्ध प्रलंबित असलेल्या सहा प्रकरणांमध्ये सिंगापूरच्या न्यायालयाकडून त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. मात्र पिल्लई याच्या प्रत्यार्पणाला केवळ तीन प्रकरणांमध्येच मंजुरी देण्यात आली होती.

कोर्टाने काय सांगितलं? 

कोर्टाने आदेशात सांगितलं की, त्याच्याविरोधातील सर्व खटले निकाली काढण्यात आले आहेत आणि अर्जदाराची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पिल्लईचे वकील पंकज कावळे यांनी तर्क दिला की, प्रत्यार्पणाचा उद्देश आता संपुष्टात आला आहे. त्यांनी सांगितलं की, अर्जदार भारताचा नागरिक नाही. त्यामुळे तो येथे राहणं वैध मानलं जाऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्यार्पण अधिनियमच्या कलम २१ अंतर्गत त्याला हाँगकाँगला पाठवलं जाणं आवश्यक आहे. 

Advertisement