जाहिरात

Epstein Files मध्ये Dalai Lama यांचा 169 वेळा उल्लेख? स्पष्टीकरणात मोठे खुलासे

Dalai Lama Epstein Files : जेफरी एपस्टिनशी संबंधित अमेरिका न्याय विभागाच्या कागदपत्रांमध्ये तिबेटच्या अध्यात्मिक गुरु, नेता दलाई लामा यांच्या नावाचा उल्लेख १६९ वेळा आल्याची चर्चा आहे.

Epstein Files मध्ये Dalai Lama यांचा 169 वेळा उल्लेख? स्पष्टीकरणात मोठे खुलासे
  • तिब्बती आध्यात्मिक नेता दलाई लामा ने जेफरी एपस्टीन से अपने संबंधों को लेकर सामने आई खबरों पर प्रतिक्रिया दी है
  • दलाई लामा ऑफिस ने प्रेस रिलीज जारी कर कहा कि उनका नाम एपस्टीन से जुड़े फाइलों में गलत तरीके से जोड़ा गया है
  • धर्मशाला स्थित दलाई लामा कार्यालय ने स्पष्ट किया कि दलाई लामा ने कभी जेफरी एपस्टीन से मुलाकात नहीं की है
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
धर्मशाला:

Jeffrey Epstein Files : जेफरी एपस्टिनशी संबंधित अमेरिका न्याय विभागाच्या कागदपत्रांमध्ये तिबेटच्या अध्यात्मिक गुरु, नेता दलाई लामा यांच्या नावाचा उल्लेख १६९ वेळा आल्याची चर्चा आहे. दरम्यान दलाई लामा यांनी जेफरी एपस्टीनशी संबंधित बातम्यांवर स्पष्टीकरण दिलं आहे. दलाई लामांच्या ऑफिसमधून अमेरिकेतील लैंगिक अत्याचार आणि तस्कर जेफरी एपस्टिन संबंधित कागदपत्रांमध्ये आपलं नाव आल्याच्या वृत्तांवर स्पष्टीकरण दिलं आहे.

हिमाचल प्रदेशाच्या धर्मशालास्थित दलाई लामा यांच्या ऑफिसकडून प्रसिद्ध केलेल्या प्रेस रिलिजमध्ये म्हटलंय, दलाई लामा कधीच जेफरी एपस्टिनला भेटले नाही, याशिवाय त्यांनी त्याच्या वतीने कोणालाही भेटण्याची किंवा बोलण्याची परवानगी दिलेली नाही.

जेफरीन एपस्टिनला कधीच भेटले नाहीत...

दलाई लामा यांच्या कार्यालयातून जारी केलेल्या विधानानुसार, काही मीडिया वृत्तांमध्ये १४ वे दलाई लामा यांचा आणि एपस्टीन फाइल्सशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र या चर्चांमध्ये काहीच तथ्य नाही. १४ वे दलाई लामा कधीही जेफरी एपस्टीनला भेटले नाही. काही वृत्तांमध्ये दलाई लामा यांचं नाव एपस्टिन फाइल्समध्ये तब्बल १६९ वेळा आल्याचं म्हटलं जात होतं. तिबेटी कार्यकर्त्यांनी हे दावे चुकीचे असल्याचे म्हटलं आहे.

जेफरी एपस्टिनच्या फाइल्समध्ये काय आहे?

अमेरिकेच्या न्याय विभागाने फायनान्सर जेफरी एपस्टिनच्या चौकशीशी संबंधित मोठ्या प्रमाणात फाइल्स जारी केल्या आहेत. ज्यामध्ये ३० लाखांहून अधिक पानांचे रेकॉर्ड, २००० व्हिडिओ आणि १,८०,००० छायाचित्रे समाविष्ट आहेत. त्यानंतर, माजी ब्रिटिश राजकुमार अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर आणि भारतीय चित्रपट निर्मात्या मीरा नायर यांच्यासह अनेक प्रमुख व्यक्तींचा सहभाग असल्याचे वृत्त समोर येत आहे.

जेफरी एपस्टिन कोण आहे?

जेफरी एपस्टिन अमेरिकेतील एक वादग्रस्त व्यक्ती होती. अल्पवयीन मुलींशी संबंधित असलेल्या फेडरल सेक्स-ट्रॅफिकिंगच्या आरोपांवरील खटल्याची वाट पाहत असताना २०१९ मध्ये न्यूयॉर्क तुरुंगात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूला अधिकृतपणे आत्महत्या म्हणून घोषित करण्यात आलं.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com