16 hours ago

आशियातील सर्वांत मोठ्या अशा मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. शहराच्या मालमत्ता करात गेल्या दहा वर्षांत वाढ झालेली नाही. त्यामुळे यंदा त्यात वाढ होणार की, मुंबईकरांना दिलासा मिळणार याकडे लक्ष लागले आहे. दुसरीकडे अंजली दमानिया आज पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडेंबाबत नवे पुरावे सादर करणार असल्याची माहिती आहे. दमानिया कोणता गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 
 

Feb 04, 2025 22:40 (IST)

अभिनेते राहुल सोलापूरकर यांची अखेर दिलगिरी ! शिवाजी महाराजांवरील वक्तव्यावर स्पष्टीकरण

शिवप्रेमी नाराज झाले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. शिवरायांचा अपमान करण्याचा कुठलाही हेतू नव्हता, असा खुलासा अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केला आहे. वादग्रस्त विधानावर राहुल सोलापूरकर यांनी स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केली आहे.   

छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्र्याहून सुटका कशी झाली? याबाबत राहुल सोलापूरकर यांनी अजब दावा केला आहे. महाराज आग्र्याहून सुटले, तेव्हा मिठाईचे पेटारे वगेरे काही नव्हते. चक्क लाच देऊन आले, त्यासाठी किती हुंडा वठवला, त्याचेही पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोलाही महाराजांनी लाच दिली आणि त्यांच्याकडून अधिकृत शिक्के घेऊन ते बाहेर पडले, असे धक्कादायक विधान राहुल सोलापूरकर यांनी केलं होतं.

Feb 04, 2025 21:24 (IST)

Live Update : इन्स्टाग्रामवर भाईगिरी करणाऱ्या तरुणांची पोलिसांनी काढली शहरभर धिंड

छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड परिसरात हुल्लडबाज तरुणांकडून इंस्टाग्रामवरती रिल्स काढून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हातात धारदार शस्त्र घेऊन सोशल मीडियावर रिल्स काढण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी तात्काळ इंस्टाग्रामवर या तरुणाच्या रील पाहून या तरुणांना ताब्यात घेतले आहे.

 या रीलमध्ये काही तरुण कमरेला कट्टा, हातात कोयता, धारदार शस्त्र घेऊन, कॉलर उडवत इंस्टाग्राम वरती रील व्हायरल करत होते. पाचोड पोलिसांनी यांना ताब्यात घेतले असून, या तरुणांची पाचोड येथील पाचोड पैठण चौकातून धिंड काढत पोलीस ठाण्यात नेण्यात आले. इंस्टाग्राम वर भाईगिरी करणाऱ्या तरुणांची पोलिसांनी चौकातून धिंड काढत भाईगिरी उतरवली.

Feb 04, 2025 19:30 (IST)

Live Update : दमानिया vs मुंडे वाद पेटला, मुंबई उच्च न्यायालयात जाणार प्रकरण

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या विरोधात  फौजदारी अब्रू नुकसानीचा खटला दाखल करण्यची घोषणा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी ट्विट केले आहे. 

अंजली दमानिया यांनी आज दिवसभरात दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा खोटे आणि बेछूट आरोप केले आहेत. या विषयासह विविध विषयांवर मोघम आरोप करणाऱ्या अंजली दमानिया ताई यांच्या विरोधात आपण आता फौजदारी अब्रू नुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी ट्विट केले आहे. 

Feb 04, 2025 18:46 (IST)

Live Update :ST-SC वर्गातल्या एकाच परिवाराचे तीन खासदार झाले का? PM मोदींचा संसदेत सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेतील भाषणात सांगितलं, 'ससंदेमध्ये एकाच वेळी SC वर्गातील एका परिवाराचे तीन खासदार झाले आहेत का? एकाच कालखंडात संसदेत ST वर्गातील परिवाराचे तीन खासदार झाले का? काही जणांचे बोलण्यात आणि वागण्यात मोठा फरक असतो. माझ्या एका प्रश्नातील उत्तरामध्ये ते स्पष्ट दिसेल. जमीन-आस्मानचे अंतर असते.

Advertisement
Feb 04, 2025 18:03 (IST)

Live Update : 2014 मध्ये विरोधी पक्ष नव्हता, पण... PM मोदी

लोकसभेत पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं की, 2014 साली विरोधी पक्ष नव्हता. अनेक कायद्यांमध्ये आम्हाला स्वातंत्र्य होतं. पण, आम्ही समित्यांमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांचा समावेश केला. आम्ही निवडणुकीच्या प्रक्रियेत देखील विरोधी पक्षाच्या नेत्यांचा समावेश केला. 

Feb 04, 2025 17:26 (IST)

Live Update - आम्ही 12 कोटी शौचालयं दिली - PM मोदी

पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं की, आत्तापर्यंत 4 कोटी घर देण्यात आले आहेत. जे खडतर आयुष्य जगले आहेत, त्यांना घर मिळाल्याची किंमत समजू शकते. सुरुवातीला महिलांना खूप त्रास सहन करावा लागत होता.  शौचालयाची कमतरता होती. ज्यांच्याकडं या सोयी आहेत, ते या लोकांच्या अडचणी समजू शकत नाहीत. आम्ही 12 कोटींपेक्षा जास्त शौचालयं दिली आहेत. 

Advertisement
Feb 04, 2025 17:20 (IST)

आम्ही गरीबीला पराभूत करुन बाहेर पडलो - PM मोदी

पाच दशकांपासून 'गरीबी हटाओ ' च्या घोषणा ऐकल्या असतील. पण, आता गरीबीला पराभूत करुन लोकं बाहेर येत आहेत. हे असंच होत नाही.तुम्ही गरिबांसाठी तुमचे जीवन अर्पण करता तेव्हा हे शक्य होते. जमिनीशी जोडलेली माणसं जमिनीवरील सत्यता ओळखून आपलं आयुष्य जमिनीवर घालवतात, तेव्हा जमिनीवर बदल निश्चित घडतो, असं मोदी यांनी यावेळी सांगितलं.

Feb 04, 2025 17:15 (IST)

Live Update : PM मोदी यांचं भाषण सुरु, संपूर्ण देशाचं पंतप्रधानांकडं लक्ष

मला देशातील नागरिकांनी 14 वेळा राष्ट्रपतींचे आभार व्यक्त करण्याची संधी दिली ही माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. - PM मोदी

Advertisement
Feb 04, 2025 17:06 (IST)

Live Update : PM मोदी यांचं भाषण सुरु, संपूर्ण देशाचं पंतप्रधानांकडं लक्ष

राष्ट्रतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत दाखल झाले आहे. पंतप्रधान यावेळी काय बोलणार याकडं सर्व देशाचं लक्ष लागलं आहे. 

पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केली आहे.

Feb 04, 2025 16:33 (IST)

Live Update : 'मंत्री म्हणून वेळ काढायला हवा होता', दमानियांचं मुंडेंना उत्तर

'तुम्ही जेवढा वेळ वाल्मीक कराडसोबत काढला तेवढा मंत्री म्हणून काढायला हवा होता', या शब्दात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांना उत्तर दिलं आहे. बदनाम लोकांना पुरावे मी देत असेन तर मला काहीही नाव ठेवा, असं आव्हान त्यांनी यावेळी दिलं. 

मुख्यमंत्र्यांना अधिकार असतात या मुंडे यांच्या प्रतिक्रियेवर अंजली दमानिया यांनी पुरावा देत मुख्यमंत्र्यांना अधिकार नसतात असे सांगितले. मंत्री म्हणून वेळ दिला असता तर कळलं असत. पण तुम्ही बीड मधील जमिनी लाटण्यात व्यस्त आहात, असा आरोप त्यांनी केला. 

Feb 04, 2025 14:48 (IST)

Live Update : कर्वेनगर येथे कैनाल रोडवर अपघात, आधी पादचाऱ्याला उडवलं नंतर चारचाकीलाही धडकला

कर्वेनगर येथे कैनाल रोडवर अपघात, दुचाकी चालकाने रस्त्यावरून चाललेल्या तरुणाला उडवलं 

नंतर दुचाकीचालक चारचाकीला धडकला 

अपघातांची दृश्य सीसीटीवीमध्ये कैद 

अपघातात संदीप कापसे जखमी 

रस्त्यावर फुटपाथ असूनही झालेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालाव लागत आहे.

Feb 04, 2025 14:20 (IST)

Live Update : प्रसिद्धीसाठी माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले

अंजली दमानियांनी केलेले आरोप धादांत खोटे 

प्रसिद्धीसाठी माझ्यावर आरोप केले 

डीबीटी प्रक्रियेबाबत सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांचे

प्रसिद्धीसाठी माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले

Feb 04, 2025 14:17 (IST)

Live Update : अंजली दमानियांनी केलेले आरोप धादांत खोटे - धनंजय मुंडे

अंजली दमानियांनी केलेले आरोप धादांत खोटे - धनंजय मुंडे

Feb 04, 2025 13:14 (IST)

Live Update : धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्याप्रकरणी महंत नामदेव शास्त्री यांचं पुण्यातील कीर्तन रद्द

पुण्यातील मराठा सेवक महंत नामदेव शास्त्रीबद्दल आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. पुण्यातील देहू येथील भंडारा डोंगरावर अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने येत्या 7 फेब्रुवारीला महंत नामदेव शास्त्री याचे कीर्तन ठेवण्यात आले होते. परंतू नामदेव शास्त्री यांनी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याची व धनंजय मुंडे यांची या प्रकरणात पाठराखण केल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे हे कीर्तन रद्द करण्यात आले आहे. 

Feb 04, 2025 12:52 (IST)

Live Update : वाल्मिक कराडची 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी वाढवली

Live Update : वाल्मिक कराडची 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी वाढवली

Feb 04, 2025 12:05 (IST)

Live Update : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात, 7 प्रवासी जखमी

समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात

अपघातात 7 प्रवासी जखमी

वर्ध्याच्या विरुळ गावाजवळ अपघात

अपघातग्रस्त प्रवाशांना पुलगाव व सावंगी येथे हलवलं

Feb 04, 2025 11:00 (IST)

Live Update : मुंबई महापालिका अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात...

मुंबई महापालिका अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात...

Feb 04, 2025 09:28 (IST)

Live Update : शिवाजी विद्यापीठात 'शोध होळकरशाहीचा' विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवी वर्षानिमित्त शिवाजी विद्यापीठात एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र पार पडलं. 'शोध होळकरशाहीचा' असा विषय या चर्चासात्रात होता. अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राच्यावतीने पार पडलेल्या या चर्चासत्रात विविध मान्यवर, विद्यापीठातील इतिहास विभागातील प्राध्यापक, विद्यार्थी  उपस्थित होते.

Feb 04, 2025 09:14 (IST)

Live Update : मेंढ्यांच्या झुंजी लावणाऱ्यांमध्ये उच्चशिक्षित तरूणांचा सहभाग, 30 जणांना अटक

काही दिवसापूर्वी डोंबिवलीत बैलांच्या झुंजीवर लाखोंचा सट्टा लागल्याचा गुन्हा दाखल झाला होता आता पुन्हा एकदा डोंबिवली पूर्वेतील खंबळपाडा परिसरात रविवारी मेंढ्यांच्या झुंजी खेळविण्यामध्ये उच्चशिक्षित तरूणांसह इतर नागरिकांचा सहभाग आढळून आला आहे. टिळकनगर पोलिसांनी 30 जणांविरुध्द प्राण्यांना निर्दयीपणे वागविल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 

Feb 04, 2025 09:11 (IST)

Live Update : आज सोन्याचे दर किती?

जळगाव गोल्ड रेट 

82 हजार 600 रुपये जीएसटी सह 85 हजार 78 रुपये 

चांदीचे भाव 96 हजार रुपये जीएसटीसह 98 हजार 880 रुपये

Feb 04, 2025 08:11 (IST)

Live Update : बोगस पीक विमा भरणाऱ्या राज्यासह परराज्यातील 96 सीएससीधारकांचे आयडी ब्लॉक

बोगस पीक विमा भरणाऱ्या राज्यासह परराज्यातील 96 सीएससी आयडी ब्लॉक

बनावट पीक विमा भरणारे 35 सीएससीधारक बीड जिल्ह्यातील

22 जणांचे सीएससी आयडी माजी कृषिमंत्री यांच्या परळी तालुक्यातील 

महाराष्ट्रात बनावट पीक विमा भरणारे 7 सीएससीधारक  इतर राज्यांतील

उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातील 2, बंदा जिल्ह्यातील अत्तारा येथील 1, हरदोई जिल्ह्यातील 2, तर हरियाणा राज्यातील रोहतक जिल्ह्यातील २ बनावट पीक विमा भरणारे सीएससीधारक

Feb 04, 2025 08:00 (IST)

Live Update : मुंबईत उद्या अनेक परिसरातील पाणी पुरवठा बंद राहणार

मुंबईत उद्या अनेक परिसरातील पाणी पुरवठा बंद राहणार, जलवाहिनीच्या कामासाठी पाणीपुरवठा अंशता: खंडित राहणार, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन 

Feb 04, 2025 07:39 (IST)

Live Update : राज्यमंत्रिमंडळ बैठक आज दुपारी 12 वाजता

राज्यमंत्रीमंडळ बैठक आज दुपारी 12 वाजता होत आहे. गेल्या आठवड्यात कॅबिनेट बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते. कालच्या सीएम यांना बोलविलेल्या बैठकीला शिंदे हजर नव्हते, आज कॅबिनेट बैठकीत शिंदे येतात का याकडे लक्ष त्याचवेळी पालकमंत्री पदाचा तिढावरून नाराजी शिंदेची कमी झाली का याकड लक्ष आहे. राज्यात पुण्यात जीबीएस आजार इतरत्र पसरत आहे यावर चर्चा होणार तसंच इतर काही महत्वाचे विषय चर्चा अपेक्षित आहे

Feb 04, 2025 07:38 (IST)

Live Update : पुण्यात 8 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान 14 वे भारतीय छात्र संसद

पुणे येथे 8 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या 14 व्या भारतीय छात्र संसद परिषदेत जळगाव जिल्ह्यातील 150 पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होणार असून भारतीय छात्र संसद परिषदेच्या वतीने पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे. दरम्यान जळगाव मधील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत धुळे जळगाव व नंदुरबार या तीनही जिल्ह्यातील 500 पेक्षा अधिक विद्यार्थी या परिषदेत सहभागी होणार असून या परिषदेत विविध राज्यांचे मुख्यमंत्री, तसेच केंद्रीय मंत्र्यांची ही उपस्थिती राहणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.

Feb 04, 2025 07:36 (IST)

Live Update : अकोल्याच्या अकोट उपविभागातील दोन तलाठी निलंबित, उपविभागीय अधिकारी अकोट यांची कारवाई..

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा व अकोट महसूल उपविभागात  नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाईत फार मोठा भ्रष्टाचार झाला असून, तेल्हारा तालुक्यातील दोन सज्ज्यातील काही गावात चक्क शेती नसलेल्या व्यक्तींना अनुदान अदा केल्याचे करण्यात आलेल्या चौकशीत निष्पन्न झाले आहेए. या चौकशी अहवालात अनेक गंमतीशिर,गंभीर बाबी पुढे आल्या आहेत. दरम्यान तेल्हारा तालुक्यातील दोषी असलेल्या भारत ढोरे व नंदू मांडवे नामक या दोन तलाठ्यांना एका आदेशाद्वारे निलंबित करण्यात आले आहे.