मतदान करताना बुरखा हटवू नये; मतदार ओळखपत्र तपासणीबाबतही समाजवादी पक्षाची मोठी मागणी

मतदानादरम्यान मुस्लीम महिलांची बुरखा हटवून तपासणी करण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं मतदान अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलं आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशातही पोटनिवडणुकीची तयारी सुरू आहे. यावेळी समाजवादी पक्षाकडून अजब मागणी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील 9 विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीपूर्वी समाजवादी पक्षाने निवडणूक आयोगाला पत्राद्वारे एक मागणी केली आहे. मतदानादरम्यान मुस्लीम महिलांची बुरखा हटवून तपासणी करण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे. अशा प्रकारची तपासणी केल्याने मुस्लीम महिला घाबरतात आणि  त्यांना मतदान करताना अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. 

नक्की वाचा - मुंबईत दिव्यांग-ज्येष्ठ मतदारांसाठी खास सुविधा, मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी मोफत वाहतुकीची व्यवस्था

समाजवादी पक्षाने निवडणूक आयोगाकडे याबाबत मागणी केली आहे. पोलीस त्यांच्या अधिकारांचा चुकीचा वापर करीत असल्याचं सपाचं म्हणणं आहे. समाजवादी पक्षाने आयोगाला दिलेल्या पत्रात म्हटलं की, मुस्लीम महिला बुरखा घालून मतदान केंद्रावर आल्यास पोलीस किंवा अन्य सुरक्षा दलाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार असू नये. अशा महिला आपली ओळख सिद्ध करण्यासाठी अन्य पद्धतीचा अवलंब करू शकतात. पक्षाने पुढे सांगितलं की, मुस्लीम महिला बुरखा हटविण्याच्या भीतीने मतदान करायला घाबरतात. कारण यामुळे त्यांच्या खासगीकरणाचं उल्लंघन होईल असं त्यांना वाटतं. 

 ('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दुसरीकडे समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेश अध्यक्ष श्याम लाल पाल यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. त्यांनी केलेल्या मागणीनुसार, रिटर्निंग ऑफिसर, जिल्हा मॅजिस्ट्रेट, जनरल ऑब्जर्वर आणि पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत लिखित आदेश जारी करण्यात यावेत. 20 नोव्हेंबर 2024 च्या मतदामादरम्यान कोणताही पोलीस अधिकारी कोणत्याही मतदाराचं वोटिंग आयडीची तपासणी करणार नाही. पत्रात पुढे लिहिलं आहे की, मतदारांच्या ओळख पत्राची तपासणी करण्याचा अधिकार केवळ मतदान अधिकाऱ्यांना आहे.  

Topics mentioned in this article