विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात बुधवार, 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे. ‘एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये' या निवडणूक आयोगाच्या घोषणेप्रमाणे मतदानाच्या दिवशी दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांची मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासनातर्फे मोफत वाहन व्यवस्था सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दिव्यांग मतदारांच्या सुविधेसाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय मोफत बस प्रवासासाठी दिव्यांग समन्वय अधिकारी नेमले आहेत. मोफत बस सुविधेकरिता बेस्टकडून मतदान केंद्राच्या निश्चित ठिकाणानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी रूट प्लान तयार करण्यात आला आहे. समन्वय अधिकारी व मार्ग नियोजन (रूट प्लान) एका क्लिकवर मतदारांना मिळण्यासाठी क्युआर कोड तयार करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांनी या सेवेचा लाभ घेवून मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे.
(नक्की वाचा - राहुल गांधींना 'ते' वक्तव्य भोवणार? पुणे प्रथमवर्ग न्यायालयाचे हजर राहण्याचे आदेश )
मतदारांना आपल्या मतदान केंद्रापर्यंत पोहचवण्यासाठी मतदार संघनिहाय समन्वय अधिकारी, दिव्यांग मित्र यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांनी सदर विशेष सुविधेचा लाभ घेण्यासाठी 1950 या टोल फ्री क्रमांकावर किंवा समन्वयक दिलीप यादव यांच्याशी 7385919403 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा दिव्यांग नोडल अधिकारी मुंबई शहर, सुनिता मते यांनी केले आहे. क्युआर कोडवर क्लिक केल्यानंतर मतदारांना मतदार संघ निहाय नेमलेले समन्वय अधिकारी, बसचा रूट प्लान यांची माहिती मिळणार आहे.
बेस्ट बससेवा यांच्याकडून ज्येष्ठ नागरिक मतदार व दिव्यांग मतदार यांना मतदान केंद्रावर ने-आण करण्याकरिता व्हीलचेअर, व्हीलचेअर व्हॅन, दिव्यांग सुलभ बसेस, ईको व्हॅन, टॅक्सी, मतदानाच्या ठिकाणी जिन्यावर सरकत्या ‘व्हीलचेअर'ची अशी वाहन उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या ठिकाणी अरुंद रस्त्यामध्ये बस जाणार नाही, अशा ठिकाणी प्रत्येक मतदारसंघनिहाय दिव्यांगांच्या संख्येनुसार टॅक्सी व इको व्हॅन प्रत्येकी 25 टॅक्सी 25 इको व्हॅन उपलब्ध करून देण्यात येत आहे.
(नक्की वाचा - Exclusive : अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांना इशारा, Video)
समन्वय अधिकारी यांचे नाव आणि मोबाईल क्रमांक
- धारावी – अयाज शेख (9892270822)
- सायन कोळीवाडा - विजय साळुंखे (8369532138)
- वडाळा - शैलेन्द्र पवार (7303220905)
- माहीम - रोशन पिंपळे (8983041236)
- वरळी - ज्ञानेश्वर पाटील (9422200176)
- शिवडी - हेमलता भांगे (9967520165)
- भायखळा - वर्षा डोकरे (9930321001)
- मलबार हिल - स्वाती जिरंगे (9869024254)
- मुंबादेवी - सूचित पांचाळ (9987048253)
- कुलाबा - दत्तात्रय कांबळे (9137513832)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world