काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी मोठं वक्तव्य करत काँग्रेस हायकमांडवर हल्लाबोल केला आहे. "गांधी कुटुंबाने माझं राजकीय कारकीर्द घडवली आणि बिघडवली देखील", असं मणिशंकर अय्यर यांनी म्हटलं आहे. पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मणिशंकर अय्यर यांनी दावा केला की, "त्यांना गांधी कुटुंबातील प्रमुख सदस्यांशी वर्षानुवर्षे संपर्क साधू दिला नाही. मागील 10 वर्षांपासून मला सोनिया गांधींना समोरासमोर भेटण्याची संधी दिली गेली नाही. मला राहुल गांधींसोबत वेळ घालवण्याची एकही संधी दिली गेली नाही."
(नक्की वाचा- प्रादेशिक समतोल ते नव्या चेहऱ्यांना संधी! महायुतीच्या कॅबिनेटची 'ही' आहेत 10 वैशिष्ट्ये)
मणिशंकर अय्यर यांनी पुढे म्हटलं की, "प्रियांका गांधी यांना देखील मी एकदा-दोनदा भेटलो असेन. त्यानंतर मला कधीही त्यांना भेटता आलं नाही. प्रियंका गांधी यांनी अधूनमधून फोन केले होते, त्यामुळे काही प्रमाणात त्यांच्यासोबत संपर्क कायम आहे." एका घटनेची आठवण करून देताना अय्यर म्हणाले की, "पक्षातून निलंबित करण्यात आले तेव्हा राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांना वायनाडच्या खासदारावर अवलंबून राहावे लागले."
"माझ्याकडे सर्वकाही असताना देखील मी पक्षात एकटा पडलो होतो. मात्र पक्षाप्रती आपली बांधिलकी ठामपणे मांडली आहे. मी कधीही पक्ष बदलणार नाही. मी भाजपमध्ये नक्कीच जाणार नाही," हे देखील मणिशंकर अय्यर यांनी स्पष्ट केलं.
(नक्की वाचा- सरपंच ते एकनाथ शिंदेंचे विश्वासू! कसा राहिलाय भरत गोगावलेंचा प्रवास?)
"2012 मध्ये राष्ट्रपती पद रिक्त झाल्यावर प्रणव मुखर्जी यांच्याकडे सरकारची सूत्रे सोपवायला हवी होती आणि डॉ. मनमोहन सिंग यांना भारताचे राष्ट्रपती बनवायला हवे होते, असे मला व्यक्तिशः वाटत होते. मात्र प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपती भवनात पाठवून यूपीए -3 सरकार स्थापन करण्याच्या शक्यता एकप्रकारे संपवून टाकल्या", असं देखील मणिशंकर अय्यर यांनी म्हटलं.