Half Male Half Female Crab: निसर्गाच्या खजिन्यात किती रहस्ये दडलेली आहेत हे कोणी सांगू शकत नाही. केरळच्या सायलेंट व्हॅली नॅशनल पार्कमधून असं वृत्त समोर आलंय ज्यामुळे वैज्ञानिकही हैराण झाले आहेत. येथे एक असा 'जादुई' खेकडा सापडला आहे, जो ना पूर्णपणे नर आहे, ना मादी. या अनोख्या जीवाचं अर्ध शरीर पुरुषासारखं आहे आणि अर्ध स्त्रीसारखं.
निसर्गाची एक अद्भभूत कलाकृती...
केरळच्या रहस्यमयी जंगलात वैज्ञानिकांना एक अद्भूत जीव दिसला, जो पाहून वैज्ञानिकही हैराण झाले. वेला कर्ली नावाच्या प्रजातीचा हा खेकडा गोड्या पाण्यात राहतो. मात्र याची खरी ओळख याच्या शरीरात लपलेली आहे. वैज्ञानिकांनी जेव्हा याची चाचपणी केली, तर लक्षात आलं की, हा खेकडा bilateral gynandromorphy आहे. याचा अर्थ याच्या शरीराच्या उजव्या आणि डाव्या बाजूला वेगवेगळे लिंग आहेत. ही परिस्थिती अत्यंत दुर्लभ आहे.
मच्छीमारही थक्क...
पश्चिम घाटातील धबधब्यांमध्ये आणि झाडांच्या ढोलीत राहणारा हा जीव सर्वप्रथम स्थानिक मच्छिमारांनी पाहिला होता. जेव्हा संशोधकांनी १२० खेकड्यांची चाचणी केली, त्यावेळी तीन असे खेकडे आढळले ज्यांचे दोन वेगळे जेंडर होते. हैराण करणारी बाब म्हणजे, हे प्रदूषण किंवा कोणत्याही विषामुळे झालेलं नाही. तर अंड्यांचा विकास होत असताना एक genetic error निर्माण झाला. वैज्ञानिकांमुळे अशा प्रकरणांमुळे जेनेटिक्सचं जग अधिक समजून घेण्याची संधी मिळते.
या खेळड्याचं वृत्त समोर येताच, इंटरनेटवर मीम्स आणि विविध प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. कोणी याला निसर्गाचं क्विअर आयकॉन म्हणत आहेत. तर कोणी याला डिवा खेकडा म्हणत आहेत.
(वरील माहिती सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओच्या आधारावर देण्यात आली आहे. NDTV मराठी याचा दावा करीत नाही)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world