Ravana Statues: रावणाच्या हजारो वर्षांपूर्वीच्या 35 प्राचीन मूर्ती सापडल्या! रामायण - महाभारत काळाचे कनेक्शन?

कर्नाटकातील मांड्या आणि म्हैसूर जिल्ह्यात ASI च्या उत्खननात रावणाच्या 35 हून अधिक प्राचीन मूर्ती सापडल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
Ravana Statues Found In Karnataka: रावणाचीही पूजा केली जात होती का?

Ravana Statues Found In Karnataka: कर्नाटकातील मांड्या आणि म्हैसूर जिल्ह्यांमध्ये भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या (ASI) उत्खनन आणि संशोधनादरम्यान रावणाच्या 35 हून अधिक प्राचीन मूर्ती सापडल्या आहेत. या संशोधनामुळे इतिहासकारांना आश्चर्याचा धक्का बसला आहे, कारण मांड्या येथील 'मुथथी' क्षेत्र पौराणिकदृष्ट्या भगवान राम, माता सीता आणि रामायण काळाशी जोडलेले आहे. दुसरीकडे जवळच असलेल्या पांडवपुरा आणि कुंती बेट्टाचा संबंध महाभारत काळातील पांडवांशी जोडलेला आढळतो. पारंपरिक स्वरुपात भारतीय महाकाव्यांशी जोडलेल्या अशा क्षेत्रांमध्ये एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने रावणाच्या मूर्ती मिळणे हे स्पष्ट संकेत देते की, प्राचीन काळात येथील काही समुदायांमध्ये रावणाबाबत मोठी श्रद्धा होती किंवा त्याची पूजा केली जात होती.

वेगवेगळ्या ठिकाणी उत्खननात सापडल्या मूर्ती

'सियासत डेली'च्या एका वृत्तानुसार, ASIला मद्दूर, मलावल्ली आणि मांड्या तालुक्यांमध्ये उत्खननादरम्यान रावणाच्या सुमारे 15 ते 20 मूर्ती हस्तगत केल्या आहेत. याच काळात प्राचीन इतिहास आणि पुरातत्त्व शास्त्राचे अभ्यासक प्राध्यापक एन.एस. रंगराजू यांनीही त्यांच्या स्वतंत्र संशोधनादरम्यान मलावल्ली, बन्नूर आणि टी. नरसीपुरा येथून आणखी सुमारे 15-20 प्राचीन मूर्ती शोधून काढल्या आहेत. वेगवेगळ्या उत्खनन स्थळांवरून एवढ्या मूर्ती मिळणे हे सिद्ध करते की, शतकांपूर्वी या भागात रावणाबाबत आदर असणारी एक प्रादेशिक धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक विविधता अस्तित्वात होती, असे इतिहासकारांचे म्हणणे आहे.

कर्नाटकमध्ये जमिनीखाली आढळल्या रावणाच्या 35हून अधिक प्राचीन मूर्ती 

मूर्ती किती जुन्या आहेत हे कार्बन डेटिंगवरून स्पष्ट होणार

आता या सर्व मूर्तींचे अचूक वय आणि प्रत्यक्ष ऐतिहासिक संदर्भ शोधण्यासाठी त्यांचे सखोल वैज्ञानिक संशोधन, शिलालेख विश्लेषण आणि कार्बन डेटिंग केले जात आहे. या भागाचा लपलेला इतिहास पूर्णपणे समजून घेण्यासाठी अधिक उत्खनन आणि दस्तऐवजीकरण (डॉक्युमेंटेशन) करणे आवश्यक आहे, जेणेकरून जमिनीखाली अशा आणखी काही मूर्ती किंवा कलाकृती गाडल्या गेल्या आहेत का? हे समजू शकेल, असे पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

Advertisement

(नक्की वाचा: Bhagwa Rang Significance: कावड यात्रेत भाविक भगव्या रंगाचेच कपडे का घालतात? ज्योतिषींकडून जाणून घ्या धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व)

मांड्याचे रावण कनेक्शन आणि इतिहास

तुम्हाला सांगू इच्छितो की, मांड्या जिल्ह्यात रावणाची मूर्ती मिळण्याची ही पहिलीच घटना नाही. याच जिल्ह्यातील मलावल्ली तालुक्यामधील निदघट्टा (Nidaghatta) गावात रावणाचे एक प्राचीन मंदिर आधीपासूनच अस्तित्वात आहे, जेथे स्थानिक लोक शतकांपासून रावणाला एक महान राजा आणि शिवभक्त मानून त्याची पूजा करतात.

(नक्की वाचा: White Horse Swapna Shastra: स्वप्नात पांढरा घोडा दिसणे शुभ की अशुभ? पंडित कौशल पांडेय यांनी सांगितला खरा अर्थ)

इतिहासकारांच्या मते दक्षिण भारताच्या अनेक प्रादेशिक परंपरांमध्ये रावणाची बुद्धिमत्ता, वेदांचे ज्ञान आणि संगीत कलेमुळे त्याचा नितांत आदर केला जात आहे. हेच कारण आहे की, रामायण कालीन महत्त्व असणाऱ्या 'मुथथी' क्षेत्राच्या आसपास एवढ्या मोठ्या संख्येने या मूर्ती मिळणे इतिहासाचे दुवे परस्परांशी जोडते. शास्त्रज्ञांच्या मते, या शोधानंतर आता दक्षिण भारतातील प्राचीन काळातील सांस्कृतिक आणि धार्मिक इतिहासाची अनेक नवी पाने उलगडतील.

Advertisement

Topics mentioned in this article