CBSE Result : अदाणी विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश, NABET नेही थोपटली शाळेची पाठ

नाबेटने दिलेल्या या प्रशस्तीपत्रकामुळे अदाणी विद्यामंदिरचा नावलौकीक आणखी उंचावला आहे. सोबतच ही शाळा देशातील नामांकीत शाळांच्या यादीत आणखी वरच्या स्थानावर गेली आहे. 2020 साली हाच मान मिळवणारी देशातील पहिली पहिली निशुल्क शाळा ठरली होती. या शाळेच्या अल्विना रॉय आणि जय बावस्कर यांनी अनुक्रमे ह्युमॅनिटीज आणि सायन्स या 97.60 टक्के मार्क मिळवले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

समाजातील आर्थिकदृष्टा मागास असलेल्या मात्र अत्यंत प्रतिभावंत विद्यार्थ्यांना अहमदाबादस्थित अदाणी विद्या मंदिर मदतीचा हात देत असते. या शाळेने देशातील सर्वोत्तम शाळांपैकी एक शाळा म्हणून आधीच नावलौकीक मिळवला आहे. नुकताच CBSE च्या 12 वीच्या परीक्षेचा निकाल लागला. या परीक्षेमध्ये अदाणी विद्यामंदिर शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे. या शाळेत शिकणारे CBSE चे बारावीचे 95 पैकी 95 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. योगायोग असा आहे की या आनंद वार्तेच्यावेळी शाळेच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

2008 सालापासून अदाणी विद्यामंदिर शाळेने आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचे काम केले आहे.  CBSE चा बारावीचा निकाल लागला तेव्हा या शाळेने आणखी एक उत्तम कामगिरी करून दाखवल्याची पोचपावती मिळाली. NABET (National Accreditation Board for Education and Training) ने या शाळेला 250 पैकी 232 गुण दिले आहे. NABET हा शाळेच्या गुणवत्तेची तपासणी करणारा बोर्ड असून तो भारतीय क्वालिटी काऊन्सिलचा भाग आहे.  नाबेटने दिलेल्या या प्रशस्तीपत्रकामुळे अदाणी विद्यामंदिरचा नावलौकीक आणखी उंचावला आहे. सोबतच ही शाळा देशातील नामांकीत शाळांच्या यादीत आणखी वरच्या स्थानावर गेली आहे. 2020 साली हाच मान मिळवणारी देशातील पहिली पहिली निशुल्क  शाळा ठरली होती. या शाळेच्या अल्विना रॉय आणि जय बावस्कर यांनी अनुक्रमे ह्युमॅनिटीज आणि सायन्स या 97.60 टक्के मार्क मिळवले आहे.  

Advertisement

या वर्षी फेब्रुवारी महिन्यात अदाणी  शिक्षणाचा अधिकार उत्तमरित्या राबवणारी शाळा म्हणून राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार मिळाला आहे. राज्य शिक्षणमंत्री डॉ.सुकांता मजुमदार यांच्या हस्ते या शाळेला समग्र शिक्षा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. अदाणी विद्यामंदिर आपल्या विद्यार्थ्यांना संयुक्त राष्ट्र संघाच्या महत्त्वाच्या जागतिक ध्येयां (global goals) बद्दल शिकवण देण्याचा प्रयत्न करते आणि विद्यार्थ्यांचे विज्ञान तसेच गणित अधिक पक्के व्हावे यासाठी युनिसेफ (UNICEF) सारख्या संस्थांसोबत काम करते.

Advertisement

( नक्की वाचा : SSC Result : ऑक्सिजन सपोर्टनं पेपर दिले, दुर्मीळ आजारावर मात करत कल्याणच्या माहीचं दहावीत दणदणीत यश )

AVMA ने पर्यावरणपूरक शाळा (environmentally friendly school) आणि दयाळूपणा शिकवणारी शाळा (school for teaching kindness) म्हणूनही पुरस्कार जिंकले आहेत. अदाणी विद्यामंदिरच्या एकूण चार शाखा असून त्यात  3,000 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी शिकतात.

Advertisement
Topics mentioned in this article