2 months ago

गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज सोन्याचे दर 91 हजारांपर्यंत पोहोचले आहेत. चांदीचे भावही एक लाखांच्यावर आहे. येत्या काळात सोन्याच्या दरात अधिक वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Mar 19, 2025 22:21 (IST)

Chiplun News: चिपळूणमध्ये अल्पवयीन तरुणाचा वाशिष्ठी नदीत बुडून मृत्यू

चिपळूणमधल्या गोवळकोटमध्ये वाशिष्ठी नदीत पोहायला गेलेल्या अल्पवयीन तरुणाचा पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडून मृत्यू झाल्याची घटना आहे. तलहा मन्सूर घारे असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. स्थानिक बोट चालकांच्या मदतीने जवळपास अर्ध्या तासानंतर त्याचा मृतदेह शोधण्यात आला.

गोवळकोट मोहल्ला येथील तलहा मन्सूर घारे हा 15 वर्षांचा मुलगा आपल्या अन्य चार मित्रांसोबत सायंकाळी वाशिष्टी नदीपात्रामध्ये पोहण्यासाठी गेला होता. यावेळी वाशिष्टीच्या उधाणाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. तो बुडताना पाहून त्याच्यासोबत असलेले इतर मित्र घाबरले. 

Mar 19, 2025 22:20 (IST)

Hingoli News: रिल्स करणाऱ्या वाळू माफिया भाऊने अखेर मागितली माफी

हिंगोलीच्या सेनगाव परिसरात वाळूच्या टिप्परवर उभे एका वाळू माफियाने रील बनवली होती त्याचबरोबर गळ्यात सोन्याची साखळी बोटात सोन्याच्या अंगठ्या आणि समोर पैशाचं बंडल ठेवून एका वाळू माफियाने रील बनवून सोशल मीडियावर टाकली होती. दरम्यान या वाळू माफियाला पोलिसांनी ताब्यात घेत त्याची  दादागिरी उतरवली असून त्याने अखेर माफी मागितली आहे....

Mar 19, 2025 22:20 (IST)

LIVE Updates: मुरबाडच्या सरळगावात हॉटेल मालकावर गावगुंडांचा हल्ला

 मुरबाड तालुक्यातील सरळगावच्या साई दरबार हॉटेलचे मालक महेंद्र हरड यांना गावगुंडांकडून लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Mar 19, 2025 22:19 (IST)

Nagpur News: बारामती नगर परिषदेतील रचनाकाराला लाच घेताना अटक

बारामतीतील नगर परिषदेचा नगर रचनाकार विकास ढेकळे याला लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. बारामतीतील एका बांधकाम व्यवसायिकाने विकास ढेकळे यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदार असलेल्या बांधकाम व्यवसायिकाला विकास ढेकळे याने पावणे दोन लाखाची मागणी केली होती.यातील एक लाख रुपये लाच देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ढेकळे याला रंगेहात पकडला आहे. 

या संदर्भातील पुढील कारवाई सुरू आहे. लाच घेण्यात फक्त ढेकळे यांचाच सहभाग होता की ढेकळे अन्य कुणाला यातील वाटा देत होते याचा देखील शोध घ्यायला पाहिजे अशी मागणी नागरिक करत आहेत.

Advertisement
Mar 19, 2025 22:17 (IST)

Pune News: पुणे येरवडा अश्लील व्हिडिओ प्रकरण, भाग्येश ओसवाल याला जामीन मंजूर

पुणे येरवडा अश्लील व्हिडिओ प्रकरण 

येरवडा प्रकरणातील आरोपी भाग्येश ओसवाल याला जामीन मंजूर 

भाग्येश ओसवाल याला सशर्त जामीन मंजूर 

तर गौरव अहुजा चा मुक्काम अजूनही तुरुंगातच 

भाग्येश ओसवाल याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.एस बारी यांनी 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटी शर्तीवर जामीन मंजूर केला आहे

 मात्र आरोपी आहुजा याच्या जामीन अर्जावर येरवडा पोलिसांनी म्हणणे मांडण्यासाठी मुदतवाढीची मागणी केल्याने आहुजा याचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे

50 हजार रुपये दंड भरा..

भाग्येश ओसवालने तपासात पोलिसांना सहकार्य कराव

आणि  परवानगीशिवाय देशाबाहेर जाऊ नये या अटी शर्तीवर ओसवाला जामीन मंजूर

Mar 19, 2025 22:17 (IST)

Nagpur News: नागपुरातील शांती मार्चला परवानगी नाकारली

गुरुवारी काढण्यात येणाऱ्या शांती मार्चला नागपूर पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. 

बुध्दगया महाबोधी विहार मुक्‍ती आंदोलनच्या समर्थना करिता हा पायदळ मार्च काढण्यात येणार होता. 

ऑल इंडिया बुध्दीस्ट फोरम ऑफ ऑल बुध्दीस्ट आर्गनायझेशन नागपूरच्या वतीने संजय

फुलझेले यांनी दिक्षाभूमी ते संविधान चौक पर्यंत या पायदळ शांती मार्च करिता गुरुवार दिनांक 20 मार्च रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत परवानगी करिता अर्ज केला होता.

मात्र, नागपूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेची  परिस्थिती पाहता आणि संचारबंदी लागु असल्याने मागितलेल्या कार्यक्रमास पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे.

Advertisement
Mar 19, 2025 20:00 (IST)

Disha Salian Case: दिशा सालियन हत्या प्रकरणात मोठा ट्वीस्ट! आई- वडिलांची हायकोर्टात धाव, आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार?

दिशाचे वडील सतीश सालियन यांची नव्याने चौकशीची मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका

 लवकरच सुनावणी अपेक्षित

दिशाचा सामुहिक बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याचा याचिकेत आरोप

एनआयए चौकशीची मागणी 

तसेच याप्रकरणाचा तपास समीर वानखेडेंसारख्या प्रामाणिक अधिका-याच्या देखरेखीखाली करण्याची याचिकेतून मागणी

मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करत आपल्यावर दबाव टाकल्याचा दिशाच्या वडलांचा याचिकेतून आरोप

त्यांनी आपल्याला नजरकैदेत ठेवत मांडलेले पुरावे खरे मानण्यास भाग पाडल्याचा याचिकेतून आरोप 

याचिकेत आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोर्या यांच्यासह मुंबई पोलीसांवर याचिकेतून आरोप

भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे तसेच पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी दिशाच्या मृत्यूबाबत केलेल्या आरोपांत तथ्य असल्याचा याचिकेतून दावा

Mar 19, 2025 19:55 (IST)

LIVE Updates: मुरबाड शहरात धावत्या बसला आग, 20 ते 25 प्रवासी जखमी झाल्याची माहिती

मुरबाड शहापूर दरम्यान प्रवास करत असलेली ही एसटी बुधवारी दुपारच्या सुमारास कुडवली गावाजवळ येताच बसचा बेल्ट तुटून स्टेअरिंग लॉक झालं आणि चालकाचं नियंत्रण सुटून बस उलटली. हा अपघात घडला तेव्हा बसमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह एकूण ६० प्रवासी होते. अपघात झाल्यानंतर सर्व प्रवाशांना बाहेर काढत जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं. या अपघातात बसची डिझेलची टाकी फुटून डिझेल हे इंजिनवर सांडत होतं. त्यामुळं अपघात झाल्यावर अर्ध्या तासाने बसने पेट घेतला. याबाबतची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली. ही आग प्रवासी बाहेर आल्यानंतर लागल्यानं मोठा अनर्थ टळला.

Advertisement
Mar 19, 2025 18:45 (IST)

LIVE Updates: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा खटला बीड जिल्हा न्यायालयात चालणार

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा खटला आता बीड जिल्हा सत्र न्यायालयात चालवला जाणारं 

सुरक्षेच्या दृष्टीने देशमुख हत्या प्रकरणाचा खटला केज न्यायालया ऐवजी बीड न्यायालयात चालवला जावा असा विनंती अर्ज करण्यात आला होता 

या विनंती अर्जासाठी काल बीडच्या न्यायालयात दोन्ही पक्षाचे वकील हजर होते 

काल युक्तिवाद झाल्यानंतर आज याचा निकाल न्यायालयाने दिला आहे 

त्यानुसार इथून पुढे सरपंच देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात होणार आहे..

अशी माहिती सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी दिली..

Mar 19, 2025 17:12 (IST)

Nagpur News: नागपूर हिंसाचार, विश्व हिंदू परिषदेचे 9 जण ताब्यात

विश्व हिंदू परिषदेच्या एकूण 9 जणांविरुद्ध एफ आय आर दाखल करण्यात आला असून विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्र मंत्री गोविंद शेंडे उपस्थित झाले नाहीत. आरोपीपैकी उर्वरित आठ जण पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. अमोल ठाकरे आणि सात जण हजर झाले असून त्यांना आता पोलिस वॅन ने शासकीय रुग्णालयात नेण्यात येत आहे. तिथून वैद्यकीय तपासणी नंतर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Mar 19, 2025 17:11 (IST)

LIVE Updates: क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मासोबत मुंबई उच्च न्यायालयात हजेरी

क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मासोबत मुंबई उच्च न्यायालयात हजेरी...

वांद्रे कुटुंब न्यायालयानं दिलासा नाकारल्याचा निर्णय हायकोर्टाकडून रद्द...

उद्या तातडीनं चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटाबाबत निकाल देण्याचे हायकोर्टाकडून कुटुंब न्यायालयाला निर्देश जारी..

घटस्फोटासाठीचा किमान कालावधी हटवण्यास कुटुंब न्यायालयानं दिला होता नकार..

मात्र आगामी आयपीएलपूर्वी तातडीनं घटस्फोट मिळवण्यासाठी दांपत्यानं कुटुंब न्यायालयाच्या निकालाला दिलं होतं हायकोर्टात आव्हान..

चहल आणि धनश्री वर्मानं परस्पर सहमतीनं घटस्फोटासाठी दाखल केलीय याचिका...

Mar 19, 2025 15:30 (IST)

Nagpur News: मद्यधुंद ट्रक चालकाने वाहने उडवली, जनावरांना दिली धडक

नागपूर-संभाजीनगर महामार्गावर मद्यधुंद ट्रक चालकाने जऊळका रेल्वे परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना धडक देत एका गायीला जखमी केल्यानंतर हा ट्रक एका झाडावर आदळला आणि नंतर घाटात जाऊन पलटी झाला. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, मात्र या प्रकारामुळे महामार्गावर भीतीचं वातावरण पसरलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि मद्यधुंद ट्रक चालकाला ताब्यात घेतले. सध्या पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत असून, संबंधित चालकावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे

Mar 19, 2025 15:16 (IST)

Beed News: बीड जिल्ह्यात मनाई आदेश जारी

बीड जिल्ह्यात 2 एप्रिलपर्यंत मनाई हुकूम जारी करण्यात आलाय. सध्या जिल्ह्यात नेत्याचे प्रमुख कार्यकर्ते यांचे व्हायरल होत असलेले व्हिडिओ,धनंजय मुंडे यांच्या राजीनामा यामुळे वंजारी विरुद्ध मराठा असा वाद होण्याची शक्यता आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यात निदर्शन,आंदोलन, उपोषण, मोर्चे होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर हा मनाई आदेश लागू करण्यात आलाय.

जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्याकडून हे मनाई आदेश जारी करण्यात आलेत. 19 मार्च मग रात्री बारापासून ते 2 एप्रिल पर्यंत हे आदेश लागू असतील. परिस्थिती लक्षात घेऊन यात वाढ देखील होण्याची शक्यता आहे. या आदेशानुसार मोर्चे निदर्शने आंदोलने परवानगीशिवाय एकत्र येण्यास निर्बंध असतील.

Mar 19, 2025 12:06 (IST)

Live Update : आर्वीच्या मुख्य चौक असलेल्या गांधी चौक परिसरातील दुकानांना आग

वर्ध्याच्या आर्वी भागात भीषण आग

आर्वीच्या मुख्य चौक असलेल्या गांधी चौक परिसरातील दुकानांना लागली आग

मुख्य मार्केटमधील जवळपास चार ते पाच दुकानांना आग लागण्याचा संशय

घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर धूर व आगीचे लोळ

आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू

Mar 19, 2025 10:16 (IST)

Live Update : पोलिसांवर कोणी हात उचलत असेल तर हे सहन केले जाणार नाही - योगेश कदम

नागपूर प्रकरणात आम्ही कठोरात कठोर कारवाई करणार आहोत 

पोलिसांवर कोणी हात उचलत असेल तर हे सहन केले जाणार नाही पोलिसांचा धाक असलाच पाहिजे

नागपूर प्रकरणात कुठलीही निवेदनात विसंगती नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारेच मुख्यमंत्र्यांनी विधानभवनात निवेदन केले आहे. 

कोरटकर प्रकरणी लवकर कारवाई केली जाईल

Mar 19, 2025 09:47 (IST)

Live Update : हिंजवडीतील टेम्पोला भीषण आग, चार जणं जळून खाक

हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीत फेज १ रोडवर  व्योमा ग्राफिक्स या कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हल MH14 CW 3548 बसला अचानक आग लागली होती.  सदर आगीत टेम्पोमधील एकूण 12 प्रवासी पैकी 4 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. सदर जखमींना रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

Mar 19, 2025 08:27 (IST)

Live Update : शेगावात देहव्यापार करणाऱ्या हॉटेलवर पोलिसांची धाड; तिघांसह 2 पीडित पोलिसांच्या ताब्यात

अनैतिक पद्धतीने देहव्यापार करणाऱ्या शेगाव शहरातील आशीर्वाद हॉटेलवर धाड टाकून दोन पीडित महिलेसह तिघांना शेगाव पोलिसांनी रात्री अटक केली आहे. शेगाव शहर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ठाणेदार नितीन पाटील यांच्यासह उपनिरीक्षक कुणाल जाधव यांच्या पथकाने रात्री 7.20 दरम्यान सदरची कारवाई केली. या प्रकरणी आशीर्वाद हॉटेल मधून आरोपी हुसेन खान अजगर खान वय 34 रा. गायत्री मंदिर पश्चिम गेटजवळ शेगाव, कुलदीप जिजाराम अवचरमल वय 28 , निखिल हिम्मतराव काहार वय २७ या तिघांना दोन पीडित महिलांना देहव्यापार करण्यास भाग पाडत असल्यावरून पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून ठाणेदार नितीन पाटील ह्या प्रकरणी तपास करीत आहेत. या कारवाई मुळे शेगाव सह जिल्ह्यात खळबळ निर्माण झाली आहे.

Mar 19, 2025 08:24 (IST)

Live Update : केशरयुक्त गुलाबी रंगाची उधळण करत विठ्ठलाची रंगपंचमी

आज रंगपंचमी उत्सवाच्या निमित्ताने पहाटेची नित्य पूजा झाल्यानंतर केशरयुक्त चंदनाचा असा गुलालाचा रंग विठ्ठल आणि रुक्मिणी मातेस लावण्यात आला. वसंत पंचमी पासून ते रंगपंचमी पर्यंत सुमारे सव्वा महिना विठ्ठलाची रंगपंचमी सुरू असते. याच रंगपंचमीची सांगता आज होते. रंगपंचमी निमित्त विठ्ठलास पांढराशुभ्र पोशाख परिधान करण्यात आला होता. यावर गुलाबी रंगाच्या रंगाची उधळण करत विठ्ठलाची रंगपंचमी साजरी झाली. रंगात सजलेला विठ्ठल "रंगी रंगला श्रीरंग .." अशाच भावात शोभून दिसत होता.