जाहिरात
1 hour ago

गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज सोन्याचे दर 91 हजारांपर्यंत पोहोचले आहेत. चांदीचे भावही एक लाखांच्यावर आहे. येत्या काळात सोन्याच्या दरात अधिक वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Live Update : आर्वीच्या मुख्य चौक असलेल्या गांधी चौक परिसरातील दुकानांना आग

वर्ध्याच्या आर्वी भागात भीषण आग

आर्वीच्या मुख्य चौक असलेल्या गांधी चौक परिसरातील दुकानांना लागली आग

मुख्य मार्केटमधील जवळपास चार ते पाच दुकानांना आग लागण्याचा संशय

घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर धूर व आगीचे लोळ

आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू

Live Update : पोलिसांवर कोणी हात उचलत असेल तर हे सहन केले जाणार नाही - योगेश कदम

नागपूर प्रकरणात आम्ही कठोरात कठोर कारवाई करणार आहोत 

पोलिसांवर कोणी हात उचलत असेल तर हे सहन केले जाणार नाही पोलिसांचा धाक असलाच पाहिजे

नागपूर प्रकरणात कुठलीही निवेदनात विसंगती नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारेच मुख्यमंत्र्यांनी विधानभवनात निवेदन केले आहे. 

कोरटकर प्रकरणी लवकर कारवाई केली जाईल

Live Update : हिंजवडीतील टेम्पोला भीषण आग, चार जणं जळून खाक

हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीत फेज १ रोडवर  व्योमा ग्राफिक्स या कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हल MH14 CW 3548 बसला अचानक आग लागली होती.  सदर आगीत टेम्पोमधील एकूण 12 प्रवासी पैकी 4 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. सदर जखमींना रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

Live Update : शेगावात देहव्यापार करणाऱ्या हॉटेलवर पोलिसांची धाड; तिघांसह 2 पीडित पोलिसांच्या ताब्यात

अनैतिक पद्धतीने देहव्यापार करणाऱ्या शेगाव शहरातील आशीर्वाद हॉटेलवर धाड टाकून दोन पीडित महिलेसह तिघांना शेगाव पोलिसांनी रात्री अटक केली आहे. शेगाव शहर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ठाणेदार नितीन पाटील यांच्यासह उपनिरीक्षक कुणाल जाधव यांच्या पथकाने रात्री 7.20 दरम्यान सदरची कारवाई केली. या प्रकरणी आशीर्वाद हॉटेल मधून आरोपी हुसेन खान अजगर खान वय 34 रा. गायत्री मंदिर पश्चिम गेटजवळ शेगाव, कुलदीप जिजाराम अवचरमल वय 28 , निखिल हिम्मतराव काहार वय २७ या तिघांना दोन पीडित महिलांना देहव्यापार करण्यास भाग पाडत असल्यावरून पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून ठाणेदार नितीन पाटील ह्या प्रकरणी तपास करीत आहेत. या कारवाई मुळे शेगाव सह जिल्ह्यात खळबळ निर्माण झाली आहे.

Live Update : केशरयुक्त गुलाबी रंगाची उधळण करत विठ्ठलाची रंगपंचमी

आज रंगपंचमी उत्सवाच्या निमित्ताने पहाटेची नित्य पूजा झाल्यानंतर केशरयुक्त चंदनाचा असा गुलालाचा रंग विठ्ठल आणि रुक्मिणी मातेस लावण्यात आला. वसंत पंचमी पासून ते रंगपंचमी पर्यंत सुमारे सव्वा महिना विठ्ठलाची रंगपंचमी सुरू असते. याच रंगपंचमीची सांगता आज होते. रंगपंचमी निमित्त विठ्ठलास पांढराशुभ्र पोशाख परिधान करण्यात आला होता. यावर गुलाबी रंगाच्या रंगाची उधळण करत विठ्ठलाची रंगपंचमी साजरी झाली. रंगात सजलेला विठ्ठल "रंगी रंगला श्रीरंग .." अशाच भावात शोभून दिसत होता.