पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी रविवारी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतलीय. यावेळी मोदींसोबत 71 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामध्ये 30 कॅबिनेट, 5 स्वतंत्र राज्य प्रभार आणि 36 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. मोदींच्या मंत्रीमंडळात महाराष्ट्रातले 6 मंत्री आहेत.
यापैकी नितीन गडकरी आणि पीयूष गोयल हे दोन कॅबिनेट मंत्री आहेत. शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांच्याकडं राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) सोपवण्यात आलाय. तर रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ आणि रामदास आठवले हे राज्यमंत्री आहेत. रामदास आठवले तिसऱ्यांदा मंत्री झाले आहेत. तर मुरलीधर मोहोळ आणि रक्षा खडसे यांना पहिल्यांदाच मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आलीय.
( नक्की वाचा : Modi 3.O : मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात कुणाला मिळालं कोणतं मंत्रिपद? एका क्लिकवर पाहा संपूर्ण खातेवाटप )
मुरलीधर मोहोळ यांना महत्त्वाची जबाबदारी
पुण्यातून लोकसभेवर निवडून आलेल्या मुरलीधर मोहोळ यांची खासदारकीची ही पहिलीच टर्म आहे. त्यांना पहिल्याच टर्ममध्ये मंत्रीपद देण्यात आलं आहे. सोमवारी (10 जून) जाहीर झालेल्या खातेवाटपात त्यांना सहकार आणि नागरी उड्डाण या दोन महत्त्वाच्या खात्यांचं राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. रक्षा खडसे यांना क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री करण्यात आलंय. तर रामदास आठवले यांच्याकडील सामाजिक न्याय राज्यमंत्रीपद यंदाही कायम आहे. शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांच्याकडं आयुष खात्याचा (स्वतंत्र कार्यभार) सोपवण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील कॅबिनेटमंत्र्यांमध्ये भाजपाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याकडं रस्ते वाहतूक आणि दळणवळम मंत्रालय कायम ठेवण्यात आलं आहे. तर पीयूष गोयल हे वाणिज्य मंत्री असतील.
( नक्की वाचा : NDA तील खदखद दुसऱ्याच दिवशी उघड, एकच मंत्रीपद मिळाल्यानं शिवसेना खासदार नाराज )
महाराष्ट्रातील मंत्र्यांना कोणती खाती?
नितीन गडकरी - रस्ते वाहतूक आणि दळणवळणमंत्री
पीयूष गोयल - वाणिज्यमंत्री
रामदास आठवले - सामाजिक न्यायमंत्री
मुरलीधर मोहोळ - सहकार आणि नागरी उड्डाणमंत्री
प्रतापराव जाधव - आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य तसंच कुटुंब कल्याण राज्यमंत्री
रक्षा खडसे - क्रीडा आणि युवक कल्याणराज्यमंत्री