जाहिरात
Story ProgressBack

Modi 3.O : मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात कुणाला मिळालं कोणतं मंत्रिपद? एका क्लिकवर पाहा संपूर्ण खातेवाटप

Modi 3.O Ministers portfolios : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi ) यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालं आहे

Read Time: 4 mins
Modi 3.O : मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात कुणाला मिळालं कोणतं मंत्रिपद? एका क्लिकवर पाहा संपूर्ण खातेवाटप
Modi 3.O Ministers portfolios announced
नवी दिल्ली:

Modi 3.O : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi ) यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शाह यांच्याकडं गृहमंत्रालय सोपवलंय. राजनाथ सिंह पुन्हा एकदा संरक्षण मंत्रालय सांभाळणार आहेत. तर, नितीन गडकरी यांच्याकडं रस्ते वाहतूक आणि दळणवळण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलीय. अजय टम्टा आणि हर्ष मल्होत्रा रस्ते वाहतूक आणि दळणवळण मंत्रालयाचे राज्यमंत्री असतील.

लोकजनशक्ती पार्टीचे (LJP) प्रमुख चिराग पासवान यांना क्रीडा मंत्री करण्यात आलं आहे. तर हरयाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर ऊर्जा खातं सांभाळतील. श्रीपाद नाईक ऊर्जा राज्यमंत्री असतील. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान देशाचे नवे कृषी मंत्री असतील. त्याचबरोबर त्यांच्याकडं पंचायत आणि ग्रामीण विकास मंत्रलाय देखील सोपवण्यात आलंय. मोदी 2.O मध्ये रेल्वे मंत्रालय सांभाळणाऱ्या अश्विनी वैष्णव यांना रेल्वे आणि माहिती प्रसारण मंत्रालय सोपवण्यात आलं आहे. 

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि HAM पक्षाचे अध्यक्ष जीतन राम मांझी सूक्ष्म, लघ आणि मध्यम उद्योग मंत्री असतील. शोभा करंदलाजे यांना या खात्याचं राज्यमंत्रीपद देण्यात आलंय. तर निर्मला सीतारमण यांना पुन्हा एकदा अर्थ मंत्री बनल्या आहेत.  

( नक्की वाचा : NDA तील खदखद दुसऱ्याच दिवशी उघड, एकच मंत्रीपद मिळाल्यानं शिवसेना खासदार नाराज )

नरेंद्र मोदी यांनी रविवारी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. हा विक्रम करणारे दे पंडीत नेहरु यांच्यानंतरचे दुसरे नेता आहेत. मोदींसह 71 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामध्ये 30 कॅबिनेट, 5 स्वतंत्र राज्य प्रभार आणि 36 राज्यमंत्री आहेत. 

मोदी 3.O मध्ये कुणाला कोणती जबादारी ?

राजनाथ सिंह - संरक्षणमंत्री
अमित शाह - गृहमंत्री
एस. जयशंकर - परराष्ट्रमंत्री
निर्मला सीतारमण - अर्थमंत्री
नितीन गडकरी - रस्ते वाहतूक आणि दळणवळमंत्री
चिराग पासवान - अन्न प्रक्रियामंत्री
शिवराज सिंह चौहान - कृषी, ग्रामीण विकास, पंचायत राजमंत्री
मनोहरलाल खट्टर - ऊर्जामंत्री
जीतनराम मांझी - MSME मंत्री
राममोहन नायडू - नागरी उड्डाणमंत्री
भूपेंद्र यादव - पर्यावरणमंत्री
गजेंद्र शेखावत - संस्कृती आणि पर्यटनमंत्री 
सीआर पाटील - जलशक्ती मंत्री
किरेन रिजिजू - संसदीय कामकाजमंत्री 
धर्मेंद्र प्रधान - शिक्षणमंत्री
एचडी कुमारस्वामी - अवजड उद्योगमंत्री
जेपी नड्डा - आरोग्यमंत्री
प्रल्हाद जोशी - अन्न, ग्राहक व्यवहार आणि अक्षय ऊर्जामंत्री
हरदीप सिंह पुरी - पेट्रोलियममंत्री
अन्नपूर्णा देवी - महिला आणि बालविकासमंत्री
ज्योतिरादित्य सिंदिया - टेलिकॉममंत्री
गिरीराज सिंह - टेक्सटाईलमंत्री
मनसुख मांडविया - श्रम आणि रोजगारमंत्री
पीयूष गोयल - उद्योग आणि वाणिज्यमंत्री
सर्वानंद सोनोवाल- जहाजबांधणीमंत्री
राजीव रंजन सिंह  (लल्लन सिंह) - पंचायत राज, मत्स्यपालन, पशूपालन आणि दुग्धविकास
वीरेंद्र कुमार - सामाजिक न्याय
राजीव रंजन सिंह  (लल्लन सिंह) - पंचायत राज, मत्स्यपालन, पशूपालन आणि दुग्धविकासमंत्री
वीरेंद्र कुमार - सामाजिक न्यायमंत्री
राममोहन नायडू - नागरी उड्डाणमंत्री
जुएल ओरावं - आदिवासी विकासमंत्री
अश्विनी वैष्णव - रेल्वे, माहिती आणि प्रसारण, इलेक्ट्रोनिक्समंत्री

स्वतंत्र कार्यभार असलेल्या राज्यमंत्र्यांकडं कोणतं खातं?

इंद्रजित सिंह – सांख्यिकी, कार्यक्रम अंमलबजावणी, नियोजन आणि सांस्कृतिक विभागाचे राज्यमंत्री.
डॉ. जितेंद्र सिंह – विज्ञान आणि तंत्रज्ञान, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्ती वेतन राज्यमंत्री, अणुऊर्जा आणि अंतराळ विभागातील राज्यमंत्री
अर्जुन राम मेघवाल – कायदा आणि न्याय मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), संसदीय कामकाज राज्यमंत्री
प्रतापराव जाधव – आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य तसंच कुटुंब कल्याण राज्यमंत्री
जयंत चौधरी – कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि शिक्षण राज्यमंत्री

राज्यमंत्र्यांना कोणतं खातं ?

जितिन प्रसाद – वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री; इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री
श्रीपाद नाईक – ऊर्जा राज्यमंत्री
पंकज चौधरी – अर्थ राज्यमंत्री.
कृष्ण पाल – सहकार राज्यमंत्री
रामदास आठवले – सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री.
राम नाथ ठाकूर – कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री.
नित्यानंद राय – गृह राज्यमंत्री.
अनुप्रिया पटेल – आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, रसायने आणि खते राज्यमंत्री
व्ही. सोमन्ना – जलशक्ती आणि रेल्वे राज्यमंत्री
चंद्रशेखर पेम्मासानी – ग्रामीण विकास राज्यमंत्री आणि दळणवळण राज्यमंत्री.
एस. पी. सिंह बघेल – मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री आणि पंचायती राज राज्यमंत्री
शोभा करंदलाजे – सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग, कामगार आणि रोजगार राज्यमंत्री
कीर्तिवर्धन सिंह – पर्यावरण, वन आणि हवामान बदल आणि परराष्ट्र राज्यमंत्री.
बी.एल. वर्मा – ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री आणि सामाजिक न्याय तथा सक्षमीकरण राज्यमंत्री
शंतनू ठाकूर – बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री
सुरेश गोपी – पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, पर्यटन राज्यमंत्री
डॉ. एल. मुरुगन – माहिती आणि प्रसारण, संसदीय कामकाज राज्यमंत्री
अजय टम्टा – रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री
बंदी संजय कुमार – गृह राज्यमंत्री
कमलेश पासवान – ग्रामीण विकास राज्यमंत्री
भगीरथ चौधरी – कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री
सतीशचंद्र दुबे – कोळसा आणि खणिकर्म राज्यमंत्री
संजय सेठ – संरक्षण राज्यमंत्री
रवनीत सिंह – अन्न प्रक्रिया उद्योग, रेल्वे राज्यमंत्री
दुर्गादास उईके – आदिवासी व्यवहार राज्यमंत्री
रक्षा खडसे – युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री
सुकांता मजुमदार – शिक्षण, ईशान्य क्षेत्राच्या विकास विभागाचे राज्यमंत्री
सावित्री ठाकूर – महिला आणि बालविकास राज्यमंत्री
तोखन साहू – गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री
राजभूषण चौधरी – जलशक्ती राज्यमंत्री
भूपती राजू श्रीनिवास वर्मा – अवजड उद्योग राज्यमंत्री आणि पोलाद राज्यमंत्री
हर्ष मल्होत्रा ​​- कॉर्पोरेट व्यवहार, रस्ते वाहतूक, महामार्ग राज्यमंत्री
निमूबेन बांभनिया – ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री
मुरलीधर मोहोळ – सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री
जॉर्ज कुरियन – अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन तथा दुग्धव्यवसाय राज्यमंत्री
पबित्रा मार्गेरिटा – परराष्ट्र राज्यमंत्री आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
Terrorist Attack बस दरीत पडली, तरी गोळीबार सुरुच होता! भाविकांनी सांगितला भयंकर अनुभव
Modi 3.O : मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात कुणाला मिळालं कोणतं मंत्रिपद? एका क्लिकवर पाहा संपूर्ण खातेवाटप
narendra-modi-3-0-union-cabinet portfolios-announced-nitin gadkari murluidhar mohol ramdas athawale raksha khadse maharashtra minster
Next Article
पुण्याच्या मुरलीधर मोहोळांकडं 2 महत्त्वाची खाती, वाचा महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना काय मिळाली जबाबदारी?
;