Iran Israel War: इराण- इस्त्राईल युद्धात आता नरेंद्र मोदी यांची एन्ट्री, उचललं 'हे' पाऊल

रविवारी इराण-इस्रायल यांच्यातील युद्धात महत्त्वाचे वळण तेव्हा आले, जेव्हा अमेरिकेने इराणवर हल्ला केला.

जाहिरात
Read Time: 2 mins

इराण-इस्रायल युद्धाचा आज 10 वा दिवस आहे. १३ जूनपासून सुरू झालेल्या या युद्धात दोन्ही देशांमध्ये मोठी हानी झाली आहे. काल रात्री म्हणजेच शनिवारी अमेरिकाही या युद्धात उतरला. अमेरिकेने इराणच्या अणु ठिकाणांवर हल्ला केला आहे. त्यामुळे  हे युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराण-इस्रायलमधील सध्याचे युद्ध थांबवण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. त्यांनी हे युद्ध थांबावे यासाठी पुढाकार घेतला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पंतप्रधान मोदींनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आहे. या संवादाची माहिती देताना पंतप्रधान मोदींनी X वर लिहिले आहे. "आम्ही सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली. अलीकडील घटनांमुळे वाढलेल्या तणावाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. परिस्थिती त्वरित शांत करण्याची गरज आहे. दोन्ही देशांमध्ये संवाद आणि मुत्सद्देगिरीला चालना देण्याची गरज आहे." असं मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Iran Israel War: पाकिस्तानने रंग बदलले, अमेरिकेलाच सुनावले, इराणवरील हल्लाबाबत मोठं वक्तव्य

रविवारी इराण-इस्रायल यांच्यातील युद्धात महत्त्वाचे वळण तेव्हा आले, जेव्हा अमेरिकेने इराणवर हल्ला केला. शिवाय इराणच्या तीन अणु केंद्रांना लक्ष्य केले. अमेरिकेने इराणमधील "फोर्डो, नतांज आणि एस्फाहान" येथे बॉम्ब टाकले. या हल्ल्यासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदही घेतली. ट्रम्प म्हणाले, "आम्ही त्यांच्या अणु ठिकाणांना लक्ष्य केले आहे. आता इराणने शांततेच्या मार्गाने चर्चा करावी.  यापूर्वी ट्रम्प यांनी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे हल्ल्याची माहिती दिली होती.

ट्रेंडिग बातमी - Miraj News: 3 दिवस, 3 रंग, 3 गाठोडी! वाढदिवसाच्या बॅनर खाली जादूटोणा

इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्याचा अनेक देशांनी निषेध केला आहे. चीन, पाकिस्तान, संयुक्त अरब अमिराती सह जगातील अनेक देशांनी अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यावर नाराजी व्यक्त केली आहे. आता पंतप्रधान मोदींनीही इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी बोलून हे तणावपूर्ण वातावरण संपवण्याबाबत चर्चा केली आहे. मात्र इराण या हल्ल्याने डिवचला गेला आहे. रशियाकडून मदत मिळावी यासाठी आता इराण प्रयत्न करत आहे. त्यामुळे भविष्यात इराण काय पाऊल उचलतो ते पाहालं लागणार आहे. 

Advertisement