Nationwide strike of chemist shops : पुण्यासह राज्यातील सर्व जिल्ह्यातील औषध दुकानं २० मे रोजी बंद राहणार आहेत. देशव्यापी संपाअंतर्गत देशभरातील तब्बल साडेबारा लाख केमिस्ट बंद राहणार असल्याची माहिती आहे. सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर बेमुदत संप सुरू राहिल आणि दुकानांच्या चाव्या सरकारकडे जमा केल्या जातील असा इशारा अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेकडून देण्यात आला आहे.
देशव्यापी बंद पुकारण्याचं कारण काय?
बेकायदेशीरपणे ऑनलाइन औषध विक्री तसेच कॉर्पोरेटद्वारे होणाऱ्या अव्यावसायिक स्पर्धेविरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. ऑनलाइन औषध विक्रीबाबत ड्रग्ज अँण्ड कॉस्मेटिक्स अॅक्टमध्ये कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. केंद्र सरकारकडून इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाइन औषध विक्रीबाबत तब्बल ६ ते ७ वर्षांपूर्वी नोटिफिकेशन जारी करून नोटिफिकेशन जारी केलं होतं. मात्र अद्याप याचे कायद्यात रुपांतर करण्यात आलेले नाहीत. अद्यापही देशात औषधांची बेकायदेशीरपणे ऑनलाइन विक्री सुरू आहे.
पुण्यात अत्यावश्यक सेवा सुरू...
या संपात पुणे शहरासह जिल्ह्यातील 15000 औषध विक्रेते सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेने दिली आहे. उद्या शहरासह जिल्ह्यातील मेडिकल बंद असतील मात्र अत्यावश्यक सेवा सुरू राहील असे केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे विभागाने स्पष्ट केलं आहे. बंदमध्ये सहभागी न होण्याचं एफडीएने औषध विक्रेत्यांना आवाहन केलं आहे. औषधाचा तुटवडा निर्माण होऊ नये अन्यथा कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
नागपुरसाठी FDA कडून हेल्पलाइन नंबर जारी...
नागपूर अन्न आणि औषध प्रशासनाकडून हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आले आहेत. नागपुरकरांनी स्वाती भारदे - ९८९०८२८१९४, प्रशांत रामटेके - ९०२८६७००२४, अभिषेक - ८८९७९४०९८१ यांच्याशी संपर्क साधावा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world