जाहिरात

Telangana News: नक्षलवाद्याचं पत्नीसह अपहरण? आज सकाळी 10.30 वाजेपर्यंत शोधून काढायचे थेट महासंचालकांना आदेश

Naxalite Couple Missing : गड्डाम लक्ष्मण यांच्या वकीलांनीा सांगितले की, पोलीस दाम्पत्याला घेऊन गेले, त्याला आता 24 तास उलटून गेले आहेत. तेव्हापासून त्यांच्याशी काहीच संपर्क नाही.

Telangana News: नक्षलवाद्याचं पत्नीसह अपहरण? आज सकाळी 10.30 वाजेपर्यंत शोधून काढायचे थेट महासंचालकांना आदेश

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य चंदन मिश्रा आणि त्यांच्या पत्नी रापाका स्वाती बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेऊन न्यायालयात हजर करण्याचे निर्देश तेलंगणा उच्च न्यायालयाने पोलीस महासंचालक यांना दिले आहेत. या प्रकरणी दाखल हॅबियस कॉर्पस याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सिव्हिल लिबर्टिज कमिटीचे अध्यक्ष प्रो. गड्डाम लक्ष्मण यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेतील माहितीनुसार, साध्या वेशात आलेल्या पोलिसांनी दाम्पत्याला शुक्रवारी रात्री ताब्यात घेतलं होते. गड्डाम लक्षण यांचा दावा आहे की, स्वाती या माओवादी नसून गृहिणी आहेत. तर मिश्रा यांना चकमकीत ठार केल्याची भीती देखील गड्डाम यांनी व्यक्त केली आहे. 

गड्डाम लक्ष्मण यांच्या वकीलांनी सांगितले की, पोलीस दाम्पत्याला घेऊन गेले, त्याला आता 24 तास उलटून गेले आहेत. तेव्हापासून त्यांच्याशी काहीच संपर्क झालेला नाही. यावर न्यायमूर्ती मौसमी भट्टाचार्य  आणि न्यायमूर्ती मदुसूदन राव बोबिली रमय्या यांच्या खंडपीठाने पोलीस महासंचालक यांना 27 जानेवारीला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

(नक्की वाचा - Walmik Karad: वाल्मीक कराडचे थेट पोलीस निरीक्षकासोबत संभाषण, ऑडिओ क्लिप व्हायरल, काय आहे बीड कनेक्शन?)

तसेच स्वाती यांचा भाऊ या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी आहे. त्यामुळे स्वातीच्या भावाला देखील संरक्षण देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. ज्या वाहनात जोडप्याला नेले त्याचा देखील शोध घेण्याचे आदेश दिले आहेत.

(नक्की वाचा-  Saif Ali Khan Attack : हा तो नव्हेच? सैफ अली खान हल्ला प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठा धक्का)

जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला छत्तीसगडमध्ये मोठी नक्षलविरोधी कारवाई पोलिसांनी केली होती. यात 16 माओवाद्यांना ठार करण्यात आलं होतं. विशेष सरकारी वकील स्वरूप ओरिल्ला यांनी कोर्टाला सांगितले की, मिश्रा यांच्यावर आंध्र प्रदेशात गुन्हा दाखल आहे. मात्र दाम्पत्याला घेऊन गेलेले लोक पोलीस आहेत की नाही हे तपासण्यासाठी कोणताही पुरावा नसल्याबद्दलचा युक्तीवाद न्यायमूर्तींनी फेटाळून लावला.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: