9 hours ago

दोन्ही राष्ट्रवादींचा आज पुण्यात वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी 10 वाजता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मेळावा पार पडणार आहे. तर दुपारी 3 वाजता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा मेळावा पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दोन शकलं झाल्यावर आज दोन्ही पक्षांचे वर्धापन दिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी मेळावेही पार पडत आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये मेळावा पार पडत आहे तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा बालगंधर्व रंगमंदिर येथे मेळावा पार पडत आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाच्या चर्चांदरम्यान आजच्या मेळाव्याला महत्व प्राप्त झालं आहे. सकाळी 10 वाजल्यापासून शरद पवारांच्या पक्षाचा मेळावा सुरू होणार असून वर्धापन दिन कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पक्ष कार्यालयात ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे.  तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दुपारी ३ वाजता मेळावा सुरू होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं मनोमिलन होणार का? सुप्रिया सुळे काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्वाचं ठरेल.  

Jun 10, 2025 22:07 (IST)

LIVE Update: ठाणे बेलापूर मार्गावर सिलेंडरचा ब्लास्ट

ठाणे बेलापूर मार्गावर सिलेंडरचा ब्लास्ट 

नवी मुंबईच्या ऐरोली रेल्वे स्टेशन बाहेरील घटना 

स्टेशनबाहेर उभ्या असलेल्या खाद्यपर्थाच्या टेम्पोमध्ये लागली आग 

टेम्पोमध्ये असलेल्या सिलेंडरचा अचानक झाला ब्लास्ट 

ब्लास्ट इतका भीषण होता की जोरदार आवाज झाला

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल 

रस्त्यावरच ब्लास्ट झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

तर आगीच करण अद्याप अस्पष्ट

Jun 10, 2025 20:54 (IST)

LIVE Update: पालिकांच्या प्रभाग रचनेचे आदेश जारी

पालिकांच्या प्रभाग रचनेचे आदेश जारी

प्रभाग रचना करण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला होते. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारने हे अधिकार आपल्याकडे घेतले. महापालिका सोबत नगरपालिका व नगर पंचायतींच्या प्रभाग रचनेचेबाबत शासन आदेश जारी

Jun 10, 2025 19:50 (IST)

LIVE Update: बच्चू कडूंच्या आंदोलनाला मनोज जरांगेंचा पाठिंबा

* मनोज जरांगे पाटलांचा बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज बच्चू कडूंची घेणार भेट, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांच गेल्या 3 दिवसापासून गुरुकुंज मोझरीमध्ये सुरू आहे बेमुदत अन्नत्याग आंदोलन. आज आंदोलनाचा चौथा दिवस. दुपारी 4 वाजता मनोज जरांगे पाटील बच्चू कडू यांच्या अन्नदात्याग आंदोलनाला भेट देणार.

Jun 10, 2025 19:24 (IST)

LIVE Updates: शशांक हगवणे आणि निलेश चव्हाण यांना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात

शशांक हगवणे आणि निलेश चव्हाण यांना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात

उद्या या दोघांना पुणे न्यायालयासमोर हजर केलं जाणार

बनावट कागदपत्र सादर करून शस्त्र परवाना घेतल्या प्रकरणी सुशील हगवणे याला काल कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं

आज न्यायालयाने सुशील याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे

सुशील याचा भाऊ शशांक याने सुद्धा बनावट कागदपत्र सादर करून शस्त्र परवाना घेतल्याप्रकरणी वारजे पोलिसांनी आज त्याला ताब्यात घेतले

निलेश चव्हाण याने वैष्णवी हगवणे कुटुंबियांना पिस्तूल चा धाक दाखवल्या प्रकरणी वारजे पोलिसांनी अटक केली आहे

Advertisement
Jun 10, 2025 19:15 (IST)

LIVE Update: बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची भेट

बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची भेट...

बच्चू कडू व जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची चर्चा...

 जिल्हाधिकाऱ्यांनी केली बच्चू कडूंना उपोषण सोडवण्याची विनंती 

 उपोषण सोडण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली विनंती बच्चू कडूंनी फेटाळली.. 

 मात्र सरसकट कर्जमाफीचा निर्णय, दिव्यांगाना सहा हजार रुपये प्रति महा मानधन व इतर 17 मागण्या जोपर्यंत  मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा बच्चू कडू यांचा निर्धार..

Jun 10, 2025 19:14 (IST)

LIVE Update: सुशील हगवणे याला न्यायालयीन कोठडी

सुशील हगवणे याला न्यायालयीन कोठडी 

कोथरूड पोलिसांनी अटक करत आज केलं होतं कोर्टात हजर 

पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये सुशील हगवणे याच्या विरोधात खोटे कागदपत्र देत बंदुकीचे लायसन मिळवल्या प्रकरणी करण्यात आला होता गुन्हा दाखल

याच प्रकरणी कोथरूड पोलिसांनी काल सुशील हगवलेला केली होती अटक

Advertisement
Jun 10, 2025 17:17 (IST)

LIVE Update: उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुनील खराटेचा भाजपमध्ये

उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुनील खराटेचा भाजपमध्ये....

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सुनील खराटेंचा भाजपमध्ये प्रवेश...

गेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे उद्धव ठाकरे गटाकडून सुनील खराटे यांनी लढवली होती निवडणूक.....

आमदार रवी राणांच्या विरोधात सुनील खराटे यांनी लढविली होती निवडणूक....

या निवडणुकीत सुनील खराटेंचा झाला होता दारून पराभव...

त्याच सुनील खराटेंचा आमदार रवी राणांच्या पुढाकारातून भाजपमध्ये प्रवेश..

ठाकरे गटाच्या तत्कालीन नेत्या प्रीती बंड यांना डावलून दिलं होतं सुनील खराटे यांना तिकीट....

त्याच सुनील खराटे यांनी सोडली आता उद्धव ठाकरेंची साथ...

Jun 10, 2025 16:22 (IST)

LIVE Updates: शाळेत अंधाधुंद गोळीबार, 8 जणांचा मृत्यू

ऑस्ट्रियातील ग्राझ शहरातील एका शाळेत झालेल्या गोळीबारात  8 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांचा समावेश आहे. संशयित, जो विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येत आहे, त्याने आत्महत्या केली आणि तो शौचालयात सापडला. शाळेच्या आत गोळीबार ऐकू आल्यानंतर सकाळी 10 वाजल्यापासून शहरात मोठी कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Advertisement
Jun 10, 2025 16:17 (IST)

LIVE Updates: प्रकाश महाजनांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त

प्रकाश महाजनांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त 

राणे-महाजन वाद पाहता पोलिसांकडून खबरदारीचा उपाय 

महाजनांच्या घरासमोर पोलिस तैनात 

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नयेत यासाठी पोलिसांकडून खबरदारी 

राणे समर्थकांकडून धमकीचे फोन येत असल्याने पोलीस बंदोबस्त वाढवला

Jun 10, 2025 15:37 (IST)

LIVE Updates: संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे त्र्यंबकेश्वरहून प्रस्थान

- संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे त्र्यंबकेश्वरहून प्रस्थान 

- त्र्यंबकेश्वरच्या समाधी मंदिरातून पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान 

- टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष करत हजारो वारकरी निघाले

- विठुरायाच्या भेटीसाठी वारकरी 26 दिवसांचा पायी प्रवास करत पंढरपूरात दाखल होणार

Jun 10, 2025 14:28 (IST)

LIVE Update: राजस्थानमध्ये मोठी दुर्घटना, 8 जणांचा बुडून मृत्यू

राजस्थानच्या टोकमधून एक भयंकर घटना समोर आली असून नदीला पोहायला गेलेल्या 8 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

Jun 10, 2025 13:35 (IST)

Live Update : शरद पवारांनी जयंत पाटलांचा राजीनामा स्वीकारला नाही

शरद पवारांनी जयंत पाटलांचा राजीनामा स्वीकारला नाही 

Jun 10, 2025 13:23 (IST)

Live Update : येणाऱ्या निवडणुकीत 50 टक्के जागा महिलांना; शरद पवारांची मोठी घोषणा

Live Update : येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून 50 टक्के जागेवरव महिला निवडणूक लढवणार असल्याची घोषणा शरद पवारांनी पुण्यात आयोजित राष्ट्रवादीच्या वर्ध्यापनदिनी केली. 

Jun 10, 2025 12:59 (IST)

Live Update : आदरणीय मोदींजीबद्दलही चांगलंच बोलले, गैरसमज नसावा - सुप्रिया सुळे

ज्या देशात मी गेले तिथली लोकं माझ्याशी महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधींबद्दल लोकं बोलायचे. आदरणीय मोदींजीबद्दलही चांगलंच बोलले, गैरसमज नसावा. 

सुप्रिया सुळे, खासदार, राशप

Jun 10, 2025 12:50 (IST)

Live Update : शरद पवारांनी संघटना कशासाठी उभी केली, त्यांचं अंतिम ध्येय काय आहे हे आपल्या लक्षात राहीलं पाहिजे - सुप्रिया सुळे

आपण एकमेकांसाठी प्रेरणा देणारी भाषणं करतो पण शरद पवारांसाठी त्यासाठी कधीच थांबत नाही. कारण त्यांचा स्वत:वर विश्वास आहे. शरद पवारांनी संघटना कशासाठी उभी केली, त्यांचं अंतिम ध्येय काय आहे हे आपल्या लक्षात राहीलं पाहिजे. राष्ट्रवादीचे आठ खासदार संसदेत उभे राहतात तेव्हा त्यांना कोणी विरोध करू शकत नाही. त्यांच्या भाषणाचं, त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांचं कौतुक केलं जातं. देशातील महत्त्वाच्या निर्णयात राष्ट्रवादी पक्षाचं मत घेतलं जातं. - सुप्रिया सुळे 

Jun 10, 2025 12:37 (IST)

Live Update : जळगावमधून संत मुक्ताई श्रीराम पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

जळगावमधून संत मुक्ताई श्रीराम पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले असून जुन्या जळगाव मधील पुरातन श्री राम मंदिरातून संत मुक्ताई श्रीराम पालखीचे परंपरेनुसार पंढरपूर कडे प्रस्थान करण्यात आले. या पालखी सोहळ्याला दीडशे वर्षांची परंपरा असून 550 किलोमीटर पायी प्रवास करत हा पालखी सोहळा 25 दिवसांनी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे.

Jun 10, 2025 11:45 (IST)

Live Update : प्रदेशाध्यक्षपदापासून मुक्त करा, जयंत पाटलांची पवारांकडे मागणी - जयंत पाटील

प्रदेशाध्यक्षपदापासून मुक्त करा, जयंत पाटलांची पवारांकडे मागणी, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जयंत पाटील यांची मागणी

Jun 10, 2025 11:04 (IST)

Live Update : शरद पवार साहेबांची ती सभा ऐकण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता - जयंत पाटील

आज आपल्या पक्षाचा २६ वा वर्धापन दिन ! याच दिवशी २६ वर्षांपूर्वी १९९९ साली दादरच्या शिवाजी पार्क मैदानात आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष स्थापन झाला होता. मला आजही आठवतं की आदरणीय शरद पवार साहेबांची ती सभा ऐकण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता - जयंत पाटील

Jun 10, 2025 11:00 (IST)

Live Update : दादा आणि साहेबांचे सोबत फोटो, नाशिकमध्ये शरद पवार राष्ट्रवादीच्यावतीने मनोमिलनाचे झळकले होर्डिंग्स

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन आज साजरा होत असतांनाच दुसरीकडे नाशिकमध्ये पंचवटी परिसरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून दादा आणि साहेब मनोमिलनाचे झळकणारे होर्डींग्स चर्चेचा विषय  ठरत आहेत. 'साहेब आणि दादा आपल्या एकत्रीकरणाचा मनी आहे ध्यास, संपूर्ण महाराष्ट्राला आहे आपल्या मनोमिलनाची आस' असा आशय या होर्डींग्सवर बघायला मिळत असून दोन्ही राष्ट्रवादीने पुन्हा एक होण्याची गरज असल्याच्या भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.. 

Jun 10, 2025 10:54 (IST)

Live Update : राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनादरम्यान सुप्रिया सुळेंच्या स्टेटसची चर्चा

राष्ट्रवादीचा दिवस उत्साहात साजरा होतोय. माझ्या एकटीवर नजरा नाहीत‌

माझ‌ं स्टेटस हे माझ्या आईसाठी होतं.‌ माझी आई आणि माझ्यातील ती गोष्ट आहे. लोकशाहीत स्टेटस ठेवण्याचा सगळ्यांंना अधिकार आहे‌.

दोन्ही राष्ट्रवादी  एकत्र येण्याची कोणतीही चर्चा नाही. मी १४ दिवस बाहेर होते.

 राष्ट्रवादी कॉंग्रेस बाबत निर्णय घेण्याचे अधिकार शरद पवारांनी मला दिलेत. पण त्याला टाईमलाईन नाही

सुप्रिया सुळेंच्या स्टेटस - 

आपली बाजू कितीही खरी असली तरी आपल्यावर अन्याय होतो, त्यावेळी आपण काहीच करू शकत नाही, 

Jun 10, 2025 10:51 (IST)

Live Update : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष वर्धापन दिन LIVE

Jun 10, 2025 10:42 (IST)

Live Update : शासकीय इतमामात शहीद आकाश राव यांच्यावर अंत्यसंस्कार

शासकीय इतमामात शहीद आकाश राव यांच्यावर अंत्यसंस्कार  

शहीद आकाश राव गिरपुंजे यांच्यावरील अंत्यसंस्कार राजकीय सन्मानाने केले जातील

अंत्यसंस्काराची तयारी झाली पूर्ण 

त्यांचे पार्थिव सकाळी 8:45 ला त्यांच्या निवासस्थानावरून माना येथे नेण्यात आले होते 

माना येथील चौथ्या बटालियनमध्ये सकाळी 9:30 वाजता राज्य सन्मान आणि मानवंदना देण्यात आली 

शहीद आकाश राव यांच्या निवासस्थानी रायपूरचे एएसपी डॉ. लाल उमेद सिंह उपस्थित

Jun 10, 2025 09:43 (IST)

Live Update : वैद्यकीय क्षेत्रात खळबळ, धर्मादाय रुग्णालयातील डॉक्टरांनी स्वीकारली लाच

धर्मादाय रुग्णालयातील डॉक्टरांनी स्वीकारली लाच

- महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून शस्त्रक्रिया केल्यानंतर डिस्चार्ज देण्यापूर्वी मागण्यात आले पैसे

- नाशिकच्या नामांकित नामको कॅन्सर रूग्णालयातील प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

- रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल

- पिवळे रेशनकार्ड धारक तक्रारदाराच्या पत्नीवर करण्यात आली होती योजनेतून शस्त्रक्रिया

Jun 10, 2025 08:57 (IST)

Live Update : ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत

ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत

नेरुळजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत

Jun 10, 2025 08:16 (IST)

Live Update : पुरंदर विमानतळाच्या भूसंपादन हरकतींवर आजपासून सुनावणी

पुरंदर विमानतळाच्या भूसंपादन हरकतींवर आजपासून होणार सुनावणी 

पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनांसाठी शेतकऱ्यांकडून एकूण 2 हजार 52 हरकती 

एकूण 7 गावातील शेतकऱ्यांनी पाठवल्या हरकती 

विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या सात गावांमधून सुमारे 2 हजार 673 हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले जाणार

एकूण 3 उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर होणार हरकतींवर सुनावणी

Jun 10, 2025 08:15 (IST)

Live Update : पुणे आरटीओकडून पालखीततील वारकऱ्यांच्या वाहनाच्या तपासणीची विशेष मोहीम

पुणे आरटीओकडून पालखीततील वारकऱ्यांच्या वाहनाच्या तपासणीची विशेष मोहीम सुरू 

दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करून आरटीओने ही विशेष व्यवस्था पालखीतील वाहनासाठी केली आहे. 

वारकरी मोठ्या संख्येने पालखीत सहभागी होताना वाहन घेऊन येतात त्यांच्या वाहनाची सुरक्षितता आणि नियमाचे पालन सुनिश्चित करण्यासाठी आरटीओने ही मोहीम चालू केली आहे 

या वाहनाची तपासणी दिवेघाटामध्ये  9 ते 19 जून पर्यंत सकाळी साडेअकरा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत करता येणार आहे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांच्यावर ही जबाबदारी आहे 

आळंदी रोड आरटीओ कार्यालयात 9 ते 19 जून पर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्यंत प्रादेशिक सहाय्यक परिवहन अधिकारी अमर देसाई यांच्यावर वाहने तपासण्याची विशेष जबाबदारी देण्यात आली आहे.

Jun 10, 2025 07:46 (IST)

Live Update : पालखी सोहळ्यासाठी पुणे शहर पोलीस प्रशासन सज्ज

पालखी सोहळ्यासाठी पुणे शहर पोलीस प्रशासन सज्ज 

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून पालखी मार्गाची पाहणी 

पोलीस अधिकाऱ्यांसह पालखी मार्गावर जात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या पोलीस प्रशासनाला सूचना

संत ज्ञानेश्वर माऊली महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पालखी दोन दिवस असणार पुण्यात मुक्कामी 

याच पालखी मुक्कामी दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे पोलीस सज्ज 

पालखी मुक्कामी असणाऱ्या ठिकाणी देखील आयुक्तांकडून पाहणी