- NTA मे 2026 रोजी झालेली NEET (UG) परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे
- आधी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना पुनःनोंदणी करण्याची गरज नाही
- NEET परीक्षा वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी भारतातील सर्वात मोठी आणि अनिवार्य परीक्षा आहे
NEET UG 2026: भारत सरकारने दिलेल्या मंजुरीनुसार राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (NTA) पेपरफुटीमुळे 3 मे 2026 रोजी झालेली NEET (UG) 2026 परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा आता नवीन तारखांना पुन्हा आयोजित केली जाईल. दरम्यान परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही. ज्या विद्यार्थ्यांनी आधीच नोंदणी केली आहे, त्यांना पुन्हा नोंदणी करावी लागणार नाही आणि कोणतीही अतिरिक्त परीक्षा फी देखील द्यावी लागणार नाही.
NEET UG 2026: जगातील सर्वात मोठ्या प्रवेश परीक्षांपैकी एक परीक्षा
NEET-UG ही भारतातील सर्वात मोठी आणि अनिवार्य देशव्यापी प्रवेश परीक्षा आहे. MBBS, BDS, BAMS, BSMS, BUMS आणि BHMS यासारख्या पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते. 3 मे रोजी झालेल्या परीक्षेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
- परीक्षेची तारीख: 3 मे 2026 (रविवार)
- एकूण उमेदवार: 22.79 लाख विद्यार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती
- परीक्षा केंद्रे: 5,432 केंद्रं
- शहरांची संख्या: भारतातील 551 शहरे आणि परदेशातील 14 शहरे
- निरीक्षण यंत्रणा: स्वतंत्र देखरेखीसाठी 6,000 हून अधिक ऑब्झर्व्हर (निरीक्षक) तैनात होते
- 674 सिटी कोऑर्डिनेटर्सनी शहर स्तरावरील कामाची देखरेख केली
- कर्मचारी: परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी 2 लाखांहून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले होते
प्रकरणाचा तपास सीबीआयकडे (CBI)
- भारत सरकारने या प्रकरणातील आरोपांची चौकशी करण्यासाठी हा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. NTA या तपासात सीबीआयला पूर्ण सहकार्य करेल आणि आवश्यक सर्व कागदपत्रे, रेकॉर्ड आणि मदत पुरवेल.
- पुन्हा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना नव्याने नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.
- कोणतीही अतिरिक्त फी घेतली जाणार नाही. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी यापूर्वी भरलेली फी परत केली जाईल आणि पुनर्परीक्षेचा खर्च NTA आपल्या अंतर्गत संसाधनातून करेल.
- पुनर्परीक्षेच्या तारखा आणि नवीन प्रवेशपत्रांचे (Admit Card) वेळापत्रक NTAच्या अधिकृत चॅनेलद्वारे जाहीर केले जाईल.
(नक्की वाचा : Sharad Pawar: पेट्रोल, डिझेल आणि सोन्याच्या खरेदीबाबत मोठी बातमी, शरद पवारांची PM मोदींकडे थेट 'ही' मागणी)
विद्यार्थ्यांनी घाबरू नये, 'हे' लक्षात ठेवा
परीक्षा पुन्हा घेण्यामुळे उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबीयांची मोठी गैरसोय होईल, याची एजन्सीला जाणीव आहे. NTA ने हा निर्णय हलक्याने घेतलेला नाही; पण विश्वासार्हतेला होणारे कायमस्वरूपी नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेणे अनिवार्य होते.
- मे 2026 परीक्षेचा नोंदणी डेटा, उमेदवारी आणि निवडलेली परीक्षा केंद्रे पुनर्परीक्षेसाठी ग्राह्य धरली जातील.
- उमेदवारांनी आणि पालकांनी केवळ अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा.
- सोशल मीडियावर पसरणाऱ्या कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
- कोणत्याही नवीन नोंदणीची (रजिस्ट्रेशन) गरज भासणार नाही आणि कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.
- याशिवाय विद्यार्थ्यांनी यापूर्वी भरलेले शुल्क परत केले जाईल आणि ही परीक्षा एनटीएच्या (NTA) अंतर्गत संसाधनांचा वापर करून पुन्हा आयोजित केली जाईल.
- नीट (NEET) परीक्षेच्या नवीन तारखा आणि प्रवेशपत्राच्या (अॅडमिट कार्ड) वेळापत्रकासह पुढील सर्व माहिती एजन्सीच्या अधिकृत माध्यमांद्वारे जाहीर केली जाईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world