NEET Paper Leak : नीट वादाची सुनावणी पुढे ढकलली, आता 18 जुलै रोजी होणार फैसला!

केंद्राने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, नीटमध्ये एकूण विद्यार्थ्यांना मिळालेल्या मार्कांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

नीट वादावर आता सर्वोच्च न्यायालय पुढील सुनावणी 18 जुलै रोजी (Supreme Court NEET exam controversy) होणार आहे. 18 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालय यावर मोठा निर्णय घेऊ शकते. या प्रकरणावरून देशभरात खळबळ उडाली आहे. आज सुनावणीदरम्यान न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला. 

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नीट संदर्भात सुनावणी पुढे ढकलण्यामागे केंद्र आणि NTA ने काल रात्री उत्तर दाखल केलं आहे. त्याची प्रत काही पक्षांना मिळालेली नाही. त्या पक्षांना ही उत्तरे पाहण्यासाठी आणि उलटतपासणीसाठी तयार होण्यासाठी वेळ हवा आहे. त्यामुळे वकिलांशी चर्चा करून 18 जुलैपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. 

नक्की वाचा - नीट पेपरफुटीचा दावा फेक, अभ्यासक्रम 25 % कमी झाल्याने गुण वाढले; IIT मद्रासचाही धक्कादायक निष्कर्ष

केंद्राने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, नीटमध्ये एकूण विद्यार्थ्यांना मिळालेल्या मार्कांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. विशेषत: 550 ते 720 दरम्यान मार्क मिळविणाऱ्यांची संख्या विविध शहरं, परीक्षा केंद्र सर्व ठिकाणांमध्ये वाढल्याचं दिसत आहे. यामागे अभ्यासक्रम 25 टक्क्यांनी कमी झाला हे कारण आहे. त्यामुळे यामागे घोटाळा होण्याची शक्यता कमी आहे.  

सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं?
सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि एनटीए यांनी एससीमध्ये दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या उत्तरात इतर पक्षांना त्यांचे संबंधित शपथपत्र दाखल करण्यास सांगितले आहे. सर्व प्रतिज्ञापत्रांनंतर न्यायालय 18 जुलै रोजी NEET वर पुढील सुनावणी घेणार आहे.

Advertisement