NEET Paper Leak : पतीच्या फोनचा वापर अन् चॅटिंग डिलीट; पुरावे मिटवण्यासाठी मनिषा हवालदारने वापरली 'ही' शक्कल

NEET Paper Leak 2026 : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे यातील धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
NEET Paper Leak 2026 : सीबीआयने केलेल्या चौकशीत मनिषा हवालदार यांनी कबूल केले की...
मुंबई:

NEET Paper Leak 2026 : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे यातील धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. मुख्य आरोपी मनिषा हवालदार हिने केवळ प्रश्न विकलेच नाहीत, तर पुरावे नष्ट करण्यासाठी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न केल्याचे सीबीआय (CBI) तपासात उघड झाले आहे. तपासाचा धागा आपल्यापर्यंत पोहोचू नये, यासाठी हवालदार यांनी चक्क भौतिकशास्त्राच्या नोट्स जाळून नष्ट केल्याची माहिती समोर आली आहे.

पुरावे नष्ट करण्यासाठी नोट्स जाळल्या

सीबीआयने केलेल्या चौकशीत मनिषा हवालदार यांनी कबूल केले आहे की, नीट परीक्षेशी संबंधित ज्या भौतिकशास्त्राच्या नोट्स त्यांनी स्वतः तयार केल्या होत्या, त्या त्यांनी जाळून टाकल्या आहेत. तपास यंत्रणांना संशय येऊ नये किंवा त्यांच्या हाती कोणतेही लेखी पुरावे लागू नयेत, या उद्देशाने त्यांनी हे पाऊल उचलले होते. ज्या प्रश्नांचा सौदा झाला, त्यांचा कोणताही लेखी पुरावा मागे उरू नये, असा त्यांचा प्रयत्न होता.

Advertisement

व्हॉट्सॲप चॅटिंग आणि मेसेज केले डिलीट

केवळ लेखी नोट्सच नाही, तर डिजिटल पुरावे नष्ट करण्यासाठीही मनिषा हवालदार यांनी शक्कल लढवली होती. सहआरोपी मनीषा मांढरे हिच्यासोबत केलेले सर्व व्हॉट्सॲप चॅटिंग त्यांनी डिलीट केले आहे. तपासात अडथळा आणण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक हे मेसेज हटवले असले, तरी सीबीआय आता हे तांत्रिक पुरावे पुन्हा मिळवण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेत आहे.

( नक्की वाचा :NEET Paper Leak : पुण्यातील प्रसिद्ध कॉलेजच्या प्राचार्याला बेड्या! 'नीट' च्या परीक्षेत असा झाला पेपरचा सौदा )
 

पतीच्या फोनचा केला वापर

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, स्वतःचा फोन सुरक्षित ठेवण्यासाठी मनीषा हवालदार यांनी आपल्या पतीच्या फोनचा वापर केला होता. पतीच्या मोबाईलवरून त्यांनी मनीषा मांढरे हिला प्रश्नमालिका पाठवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यावरून या पेपरफुटीचे नियोजन किती खोलवर आणि सावधगिरीने केले होते, हे स्पष्ट होत आहे. पतीच्या फोनवरून पाठवलेले हे मेसेज आता या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा ठरणार आहेत.

( नक्की वाचा : NEET Paper Leak: बापानं लाखो खर्चून पेपर चोरला, पण पोरगा अभ्यासात ढ! नीट परीक्षेतील सर्वात मोठी 'कॉमेडी' उघड )

सीबीआयचा तपास आता नव्या वळणावर

मनिषा हवालदार यांनी केवळ आर्थिक मोबदल्यासाठी प्रश्न विकले नाहीत, तर पुरावे पद्धतशीरपणे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला आहे. मात्र, पुण्याच्या विशेष न्यायालयात झालेली मध्यरात्रीची सुनावणी आणि सीबीआयच्या हाती लागलेली माहिती पाहता, हवालदार यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या एका प्राचार्यांनी पुराव्यांची होळी करून स्वतःला वाचवण्याचा केलेला हा प्रयत्न आता त्यांच्याच अंगलट आला आहे.