जाहिरात

New Baba Venga Predictions: एका भविष्यवाणीने खळबळ! धडाधड विमान आणि हॉटेल बुकिंग रद्द, 5जुलैला काय होणार?

Massive Disaster on July 5:  'जपान आणि फिलीपिन्स दरम्यान समुद्राखाली एक दरी निर्माण होईल आणि तोहोकू भूकंपापेक्षा तिप्पट उंच लाटा किनाऱ्यावर येतील, असं भाकित त्यांनी केले होते. 

New Baba Venga Predictions: एका भविष्यवाणीने खळबळ! धडाधड विमान आणि हॉटेल बुकिंग रद्द, 5जुलैला काय होणार?

Baba Vanga  Predicted A Major Disaster In Next 3 Weeks: सध्या जपानमध्ये कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे नाही तर एका भविष्यवाणीमुळे खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर 'न्यू बाबा वांगा' म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध जपानी मंगा कलाकार र्यो तात्सुकी यांनी केलेल्या धक्कादायक भाकितामुळे संपूर्ण आशियामध्ये भीती पसरली आहे. तात्सुकी यांनी 1999 मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या 'द फ्युचर आय सॉ' या मंगामध्ये५ जुलै २०२५ रोजी जपानवर एक मोठी आपत्ती येईल असं म्हटलं होत.  'जपान आणि फिलीपिन्स दरम्यान समुद्राखाली एक दरी निर्माण होईल आणि तोहोकू भूकंपापेक्षा तिप्पट उंच लाटा किनाऱ्यावर येतील, असं भाकित त्यांनी केले होते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

( Rio Tatsuki Future Prediction)

या भीतीचा परिणाम आता जपानच्या पर्यटन उद्योगावर स्पष्टपणे दिसून येत आहे. हाँगकाँग ते जपान पर्यंतच्या फ्लाइट बुकिंगमध्ये 83% घट झाली आहे. ग्रेटर बे एअरलाइन्सने सांगितले की एप्रिल आणि मे या वसंत ऋतूतील सुट्टीच्या काळातही गेल्या वर्षीच्या तुलनेत बुकिंग निम्मे झाले होते. जपान ऑफिसचे जनरल मॅनेजर 'हिरोकी इटो' म्हणाले, 'जिथे आम्हाला 80% जागा भरण्याची अपेक्षा होती, तिथे फक्त 40% बुकिंग झाले.' हाँगकाँग एअरलाइन्सने जुलै-ऑगस्टमध्ये कागोशिमा आणि कुमामोटो सारख्या दक्षिण जपानी शहरांसाठी उड्डाणे रद्द केली आहेत.

ब्लूमबर्ग इंटेलिजेंसनुसार, प्रादेशिक विमान कंपन्यांमध्ये, विशेषतः बोईंग विमान चालवणाऱ्या विमान कंपन्यांमध्ये 15,20c% उड्डाणे रद्द झाल्याचे वृत्त आहे. तथापि, मियागी प्रांताचे गव्हर्नर योशिहिरो मुराई यांनी लोकांना अफवांकडे लक्ष देऊ नका आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, जपानी लोक देश सोडून पळून जात नाहीत. कृपया गोंधळून जाऊ नका आणि जपानला भेट द्या. दरम्यान, रियो तात्सुकीची मागील अनेक भाकिते खऱ्या ठरल्या आहेत. २०११ मधील तोहोकू त्सुनामी, राजकुमारी डायनाचा मृत्यू, फ्रेडी मर्क्युरीचा मृत्यू आणि कोविड 19 बाबतची भविष्यवाणी खरी ठरली होती. दरम्यान, ५ जुलै रोजी खरोखर काहीतरी घडेल की ही देखील अफवा राहील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Air India Plane Crash: आईच्या एका शब्दाने लेकाचा जीव वाचला! यमन व्यासची मृत्यूला हुलकावणी देणारी कहाणी

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com