New FASTag Rule : ...अन्यथा फास्टटॅग असूनही भरावा लागेल दंड, आजपासून FASTag चे नवे नियम लागू

FASTag : वापरकर्त्यांनी लक्ष दिलं नाही तर त्यांना अतिरिक्त रक्कम भरावी लागणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

FASTag New Rules : फास्टॅगचे नवे नियम आज म्हणजेच सोमवार, 17 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत. यापुढे सर्व वापरकर्त्यांना FASTag मध्ये कमी रक्कम, पेमेंट करण्यात उशीर किंवा FASTag ब्लॅकलिस्ट झाल्यास अतिरिक्त पैसे मोजावे लागतील. FASTag मधील अडचणींमुळे टोलवरील वाहनांच्या रांगा कमी करणे आणि प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नवा नियम लागू करण्यात आला आहे. 

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाने FASTag इकोसिस्टममध्ये काही महत्त्वाचे बदल सूचवले आहेत. ज्यातून टोल पेमेंट व्यवस्थित सुरू ठेवणे, वाद कमी करणे आणि फसवणुकीला आळा घालण्यासाठी मदत होईल अशी अपेक्षा आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

FASTag चे नवे नियम कोणते?
FASTag चे नवे नियम 17 फेब्रुवारीपासून लागू होतील. नव्या नियमांअंतर्गत, तुमची गाडी टोल पार करण्याच्या 60 मिनिटं आधी आणि टोल पार केल्याच्या 10 मिनिटांनंतरपर्यंत फास्टॅग ब्लॅकलिस्टेड, हॉटलिस्टेड किंवा त्यामध्ये कमी बॅलन्स असेल तर व्यवहार रद्द केला जाईल. म्हणजे टोलचा पेमेंट होऊ शकणार नाही. अशावेळी पेमेंटला सिस्टममधून 176 दाखवून रद्द केलं जाईल आणि वापरकर्त्याकडून दंड म्हणून टोल शुल्काच्या दुप्पट रक्कम आकारली जाईल. 

Advertisement

नक्की वाचा - Zero Click Malware : 'झिरो-क्लिक' मालवेयर म्हणजे काय? ऑनलाईन फसवणुकीसाठी कसा वापर होतेय?

महत्त्वाचं...
FASTag मध्ये पुरेशी रक्कम नसणे, केवायसी केली नसल्यास किंवा वाहन नोंदणीच्या तपशीलात तफावत असेल तर FASTag ब्लॅकलिस्ट केला जाऊ शकतो. त्यामुळे प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी FASTag मधील रक्कम तपासून घेणं आवश्यक आहे. अनेकदा टोल येण्यापूर्वी अगदी शेवटच्या क्षणाला फास्टटॅग रिर्चाज केला जातो. मात्र यापुढे तसं करता येणार नाही. टोल येण्याच्या 60 मिनिटांपर्यंत पुरेशी रक्कम नसेल तर त्यानंतर रिचार्ज करता येणार नाही. अशा परिस्थिती दंड आकारला जाईल. याशिवाय ब्लॅकलिस्टींग टाळण्यासाठी केवायसी तपासून घ्या.