जाहिरात

NHAI Offer: Dirty Toilet चा फोटो पाठवून व्हा मालामाल! राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची खास 'बक्षीस' योजना

NHAI Bumper Offer: तुम्ही वारंवार राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करता आणि टोल प्लाझावरील अस्वच्छ शौचालयांमुळे हैराण आहात?

NHAI Offer:  Dirty Toilet चा फोटो पाठवून व्हा मालामाल! राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची खास 'बक्षीस' योजना
NHAI Bumper Offer: या अभिनव उपक्रमामुळे राष्ट्रीय महामार्गावरील स्वच्छता आणि सुविधांचा दर्जा सुधारण्यास मदत होईल, अशी NHAI ला अपेक्षा आहे.
मुंबई:

NHAI Bumper Offer: तुम्ही वारंवार राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करता आणि टोल प्लाझावरील अस्वच्छ शौचालयांमुळे हैराण आहात? या प्रवासात टोल प्लाझावर अस्वच्छ शौचालय आढळले, तर त्याची तक्रार करा आणि लगेच तुमच्या FASTag खात्यावर 1,000 रुपये मिळवा.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) 'स्वच्छता अभियाना'अंतर्गत एक अनोखी मोहीम सुरू केली आहे. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी टोल प्लाझावर असलेल्या अस्वच्छ शौचालयांची तक्रार केल्यास, त्यांना बक्षीस म्हणून 1,000 रुपये FASTag रिचार्ज मिळणार आहे. ही योजना 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत लागू असणार आहे.

FASTag वर 1,000 रुपये रिचार्ज कसा मिळवायचा?

NHAI च्या या योजनेत सहभागी होण्यासाठी खालील प्रक्रिया वापरावी लागेल:

'राजमार्गयात्री' (Rajmargyatra) ॲपचा वापर: महामार्ग वापरकर्त्यांना 'राजमार्गयात्री' ॲपच्या लेटेस्ट व्हर्जनवर तक्रार नोंदवावी लागेल.
जिओ-टॅग केलेले फोटो अपलोड: अस्वच्छ शौचालयाचे जिओ-टॅग केलेले (geo-tagged) आणि वेळेची नोंद असलेले (time-stamped) स्पष्ट फोटो ॲपवर अपलोड करावे लागतील.
माहिती भरणे: तक्रार करताना आपले नाव (User Name), स्थळ (Location), वाहन नोंदणी क्रमांक (VRN) आणि मोबाइल क्रमांक (Mobile Number) ही माहिती भरणे आवश्यक आहे.

( नक्की वाचा : Mumbai Metro 3 : मेट्रो 3 च्या स्टेशनवर मोफत Wi-Fi वापरायचंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करा आणि व्हा कनेक्ट )
 

योजनेच्या महत्त्वाच्या अटी आणि नियम:

बक्षीस केवळ 1,000 रुपये: प्रत्येक यशस्वी आणि वैध तक्रारीसाठी, संबंधित VRN ला 1,000 रुपये FASTag रिचार्जच्या रूपात बक्षीस दिले जाईल.
बक्षीस नॉन-ट्रान्सफरेबल (Non-transferable): हे बक्षीस हस्तांतरणीय नसेल आणि रोख स्वरूपात (cash) दिले जाणार नाही.
एकदाच बक्षीस:  प्रत्येक वाहन नोंदणी क्रमांक (VRN) या कालावधीत फक्त एकदाच या बक्षिसासाठी पात्र ठरेल.
NHAI क्षेत्रातील शौचालये: ही योजना केवळ NHAI च्या अधिकार क्षेत्राखाली बांधलेल्या, चालवलेल्या किंवा देखरेख केलेल्या शौचालयांसाठी लागू आहे. रिटेल इंधन पंप, ढाबे किंवा NHAI च्या नियंत्रणाबाहेरील सुविधांमधील शौचालयांसाठी ही योजना नाही.
एका दिवसातून एकदाच बक्षीस: एका दिवसात एकाच ठिकाणी असलेल्या शौचालयाच्या कितीही तक्रारी आल्या तरी, त्या जागेसाठी दिवसातून फक्त एकदाच बक्षीस दिले जाईल.
पहिला वैध फोटो ग्राह्य: एकाच शौचालयासाठी एकाच दिवशी अनेक तक्रारी प्राप्त झाल्यास, 'राजमार्गयात्री' ॲपद्वारे नोंदवलेला पहिला वैध (Valid) फोटोच बक्षिसासाठी विचारात घेतला जाईल.
तपासणी: जमा केलेल्या तक्रारींचे Artificial Intelligence (AI) - Assisted Screening आणि आवश्यकतेनुसार मॅन्युअल व्हॅलिडेशन केले जाईल. कोणतीही फेरफार केलेली, डुप्लिकेट किंवा पूर्वी रिपोर्ट केलेली छायाचित्रे त्वरित नाकारली जातील.

( नक्की वाचा : Mumbai Metro 2B: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो 2B चा पहिला टप्पा 'या' महिन्यात सुरू, वाचा सर्व अपडेट )
 

या अभिनव उपक्रमामुळे राष्ट्रीय महामार्गावरील स्वच्छता आणि सुविधांचा दर्जा सुधारण्यास मदत होईल, अशी NHAI ला अपेक्षा आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com