
Mumbai Metro 3 News: मुंबईतील प्रवाशांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची सुविधा सुरू झाली आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) ने महत्त्वाकांक्षी कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो-3 (Colaba-Bandra-SEEPZ Mumbai Metro-3) मार्गावरील सर्व स्टेशनवर प्रवाशांसाठी मोफत वाय-फाय (Wi-Fi) सुविधा उपलब्ध केली आहे. 'अॅक्वा लाईन' (Aqua Line) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मेट्रो मार्गावरील स्थानकांवर प्रवाशांना आता भूमिगत (underground) भागातही इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
प्रवाशांची सोय वाढवणे आणि विशेषतः 'MetroConnect3' या मोबाईल अॅपद्वारे डिजिटल तिकीट खरेदीला प्रोत्साहन देणे, हे या उपक्रमामागील मुख्य उद्दिष्ट आहे. ही वाय-फाय सुविधा स्थानकांच्या कॉनकोर्स (Concourse) स्तरावर (जिथे तिकीट खिडक्या असतात) उपलब्ध करण्यात आली आहे.
कसे सुरु करणार वाय-फाय?
प्रवाशांना ही मोफत, सुरक्षित आणि विश्वासार्ह वाय-फाय सेवा वापरण्यासाठी खालील तीन सोप्या पायऱ्या पूर्ण कराव्या लागतील:
1. अॅप डाउनलोड आणि लॉगिन: सर्वप्रथम प्रवाशांनी 'MetroConnect3' हे मोबाईल अॅप डाउनलोड करून स्टेशनमध्ये प्रवेश करण्यापूर्वी लॉगिन करावे.
2. वाय-फायशी कनेक्ट: मोबाईलच्या वाय-फाय सेटिंग्जमध्ये जावे आणि उपलब्ध नेटवर्कमधून “MetroConnect3” हे नेटवर्क निवडावे.
( नक्की वाचा : Mumbai Metro 2B: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो 2B चा पहिला टप्पा 'या' महिन्यात सुरू, वाचा सर्व अपडेट )
3. अॅक्सेस सक्रिय करा: त्यानंतर 'MetroConnect3' अॅप उघडावे, 'Profile' या विभागात जावे आणि “Connect to Wi-Fi” या पर्यायावर टॅप करावे. हे केल्यावर प्रवाशी तिकीट बुकिंग सेवेचा आणि वाय-फाय सुविधेचा लाभ घेऊ शकतील.
एमएमआरसीच्या वतीने सर्व नागरिकांना तिकीट बुकिंगसाठी या मोफत सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world