जाहिरात

NITI Aayog: .... म्हणून ग्रॅज्यूएट भारतीयांनाही नोकऱ्या मिळत नाहीत, निती आयोगाने सांगितला 'वीक पॉईंट'

नीती आयोगाने इंग्रजी आणि परदेशी भाषा प्रवीणता कार्यक्रम राबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय भाषा संस्थांशी सहकार्य करण्याची शिफारस केली आहे. 

NITI Aayog: .... म्हणून ग्रॅज्यूएट भारतीयांनाही नोकऱ्या मिळत नाहीत, निती आयोगाने सांगितला 'वीक पॉईंट'

NITI Ayog Report: भारतातील मुलांना इंग्रजीबद्दल ज्ञान नसल्याने आणि इंग्रजीबद्दल न्यूनगंड असल्याने नोकऱ्या मिळत नसल्याचे धक्कादायक कारण निती आयोगाच्या अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे नीती आयोगाने इंग्रजी आणि परदेशी भाषा प्रवीणता कार्यक्रम राबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय भाषा संस्थांशी सहकार्य करण्याची शिफारस केली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अनेक देशांमध्ये इंग्रजी ही संवादाची मुख्य भाषा मानली जाते आणि ती जागतिक भाषा म्हणून देखील स्वीकारली गेली आहे. सध्या भारतामध्येही इंग्रजी शिकण्याकडे प्राधान्य दिले जात आहे. शहरांपासून ते खेड्यांपर्यंतची मुले आता खाजगी शाळांमध्ये शिक्षण घेऊ इच्छितात कारण इंग्रजीवर जास्त भर दिला जातो. कारण इंग्रजी येत नसल्याचा फटका भविष्यातील नोकऱ्यांवर पडू शकतो, अशी भिती या विद्यार्थ्यांना आहे.

याबाबतच आता निती आयोगाने एक धक्कादायक अहवाल सादर केला आहे.  नीती आयोगाच्या अहवालानुसार, राज्य सार्वजनिक विद्यापीठांमधून पदवीधर होणाऱ्या तरुणांमध्ये रोजगार क्षमतेवर परिणाम करणारे 'अपुरे' इंग्रजी भाषेचे प्राविण्य हे एक प्रमुख घटक आहे. नीती आयोगाने या संस्थांना इंग्रजी आणि परदेशी भाषा प्रवीणता कार्यक्रम राबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय भाषा संस्थांशी सहकार्य करण्याची शिफारस केली आहे. नीती आयोगाने 10 डिसेंबर रोजी 'राज्ये आणि राज्य सार्वजनिक विद्यापीठांद्वारे दर्जेदार उच्च शिक्षणाचा विस्तार' या शीर्षकासह हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

(नक्की वाचा-  Crime News : 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' भाषणासाठी विद्यार्थिनीला पुरस्कार, काही दिवसात शिक्षकानेच केला अत्याचार)

नीती आयोगाच्या या अहवालात इतर अनेक शिफारशी करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये असे म्हटले आहे की देशातील उच्च शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांपैकी 80 टक्के विद्यार्थी सार्वजनिक विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतात आणि म्हणूनच राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 ची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्यांच्या इंग्रजीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

या अहवालात राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांसमोरील अनेक आव्हाने मांडली आहेत. ज्यात संबंधित रोजगारक्षम कौशल्यांच्या अभावामुळे राज्यांमधून प्रतिभा नष्ट होत असल्याचे म्हटले आहे. 'अनेक राज्यांमध्ये असलेल्या स्थानिक उद्योगांमध्ये, प्रतिभावान लोक प्रामुख्याने राज्याबाहेरून काम करण्यासाठी येतात आणि याचे सर्वात मोठे कारण म्हणजे स्थानिक तरुणांमध्ये इंग्रजी भाषेचे अपुरे ज्ञान'. याचा अर्थ स्थानिक तरुणांमध्ये प्रतिभा असते, परंतु ते इंग्रजी भाषेत अपयशी ठरतात आणि त्यामुळे त्यांना चांगली नोकरी मिळू शकत नाही, असेही या अहवालामध्ये म्हटले आहे. 

( नक्की वाचा : अमेरिकेतील भयंकर कायद्याला ट्रम्पकडून स्थगिती, अदाणी समूहासाठी Good News )

"विद्यार्थ्यांना राज्यातच राहून केवळ प्रादेशिकच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरही वाढ आणि विकासात योगदान देण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी त्यांच्या रोजगारक्षमतेचे कौशल्य वाढवण्याची नितांत गरज आहे," असे अहवालात म्हटले आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, नीती आयोगाने विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी आणि इतर परदेशी भाषा प्रवीणता कार्यक्रम राबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय भाषा संस्थांशी भागीदारी करण्याची शिफारस केली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: