जाहिरात

Yavatmal Accident: एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक, बसचे दोन तुकडे; दोघांचा मृत्यू

Yavatmal Accident: अपघाताची माहिती मिळताच मारेगाव पोलीस पथक व रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. स्थानिक ग्रामस्थांनीही तत्परता दाखवत बसच्या अवशेषांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात मदत केली.

Yavatmal Accident: एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक, बसचे दोन तुकडे; दोघांचा मृत्यू

संजय तिवारी, नागपूर

Yavatmal Accident News: यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील जळका फाट्या जवळ आज रात्री आठच्या सुमारास भीषण अपघात झाला. वणी–करंजी मार्गावर वणीहून करंजीकडे जात असलेल्या एस.टी. बसला करंजीकडून वणीच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने जबर धडक दिली. धडक एवढी भीषण होती की बसचे अक्षरशः दोन तुकडे झाले असून समोरचा भाग पूर्णपणे चिरडला गेला.

या अपघातात 2 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 2 जण गंभीर असून एकूण 8 प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. कारला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना ही आमने सामने धडक झाली.

(नक्की वाचा-  Chhatrapati Sambhajinagar: लग्न करुन घरी निघाले, रस्त्यात चौघांनी कार अडवली अन् डोळ्यासमोर नवरी गायब!)

अपघाताची माहिती मिळताच मारेगाव पोलीस पथक व रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. स्थानिक ग्रामस्थांनीही तत्परता दाखवत बसच्या अवशेषांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात मदत केली. सर्व जखमी प्रवाशांना मारेगाव व करंजी येथील ग्रामीण रुग्णालयांत उपचारासाठी हलवण्यात आले.

अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून ट्रक चालकाचा ताबा घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. स्थानिक नागरिकांनी या मार्गावरील वाढत्या अपघातांची दखल घेऊन वाहतूक विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com