लेहमध्ये सोलो ट्रिपसाठी गेला, मात्र परतलाच नाही; तरुणांसोबत नेमकं काय घडलं? 

जेव्हा शरीरात ऑक्सिजनची पातळी कमी होते आणि हवेचा दाब खूप लवकर बदलतो अॅल्टिट्युड सिकनेसचा त्रास होतो. डोकेदुखी, उलट्या, थकवा, श्वास लागणे आणि मळमळ या लक्षणांचा यामध्ये समावेश होतो. 

Advertisement
Read Time: 2 mins
H

जम्मू-काश्मीरमधील लेहमध्ये सोलो बाईक ट्रिपला गेलेल्या नोएडातील 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. चिन्मय शर्मा असं मृत तरुणाचं नाव आहे. एकुलता एक मुलगा असल्याने चिन्मयच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मिळालेल्या माहितीनुसार, 22 ऑगस्ट रोजी चिन्मय ट्रिपला निघाला होता. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, चार दिवसांनंतर 26 ऑगस्ट रोजी त्याने त्याच्या वडिलांना कळवले की त्याला डोकेदुखीचा त्रास होत आहे. श्वास घेण्यासही त्रास होत असल्याचं त्याने सांगितलं. वडिलांनी त्याला विश्रांती घेण्याचा आणि वैद्यकीय मदत घेण्याचा सल्ला दिला. 

(नक्की वाचा - CCTV Footage : आधी फोन मागितला, मग धारधार शस्त्राने वार केले; धारावीतील धक्कादायक घटनेचा Video )

वडिलांनी लेहमधील हॉटेल मॅनेजरला आपल्या मुलाला हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले. 29 ऑगस्ट रोजी चिन्मयचे आई-वडील लेहला पोहोचले. मात्र अवघ्या काही तासांतच त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अॅल्टिट्युड सिकनेसमुळे चिन्मयचा मृत्यू झाला आहे. 

अॅल्टिट्युड सिकनेस म्हणजे काय?

जेव्हा शरीरात ऑक्सिजनची पातळी कमी होते आणि हवेचा दाब खूप लवकर बदलतो अॅल्टिट्युड सिकनेसचा त्रास होतो. डोकेदुखी, उलट्या, थकवा, श्वास लागणे आणि मळमळ या लक्षणांचा यामध्ये समावेश होतो. 

Advertisement

(नक्की वाचा -  जनता पूरपरिस्थितीमुळे त्रस्त, भाजप आमदार नाच-गाण्यात व्यस्त; गौतमीसोबतचा VIDEO Viral )

बाहेरुन लडाखमध्ये येणाऱ्या पर्यटकांना उंचीच्या भागात ऑक्सिजनच्या कमतरतेचा सामना करावा लागतो. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना हॉटेल किंवा निवासस्थानी सुमारे दोन दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून त्यांचे शरीर कमी ऑक्सिजन पातळीशी जुळवून घेते.

Advertisement
Topics mentioned in this article