मुंबईतील धारावीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाईल चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोराने एका व्यक्तीवर धारधार हत्याराने वार केल्याची घटना समोर आली आहे. चोरीचा प्रयत्न आणि जीवघेण्या हल्ल्याची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार म्हणजेच 3 सप्टेंबर रोजी इंडियन बँकेच्या मागे ही घटना घडली आहे. सकाळी 9.24 वाजता हा सगळा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नेमकं काय घडलं?
सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील दृष्यांमध्ये दिसत आहेत की, एक व्यक्ती धारधार हत्यार घेऊन रस्त्यांना जाणाऱ्या एका व्यक्तीचा मोबाईल फोन खेचून घेण्याचा प्रयत्न करत होता. मात्र व्यक्तीने याला विरोध केला आणि आपला फोन देण्यास नकार दिला. त्यावेळी चोराने व्यक्तीवर धारधार हत्याराने हातावर वार केला. त्यानंतर पीडित व्यक्तीने तिथून पळण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आरोपीने व्यक्तीच्या पाठीवर देखील एक वार केला.
(नक्की वाचा - जनता पूरपरिस्थितीमुळे त्रस्त, भाजप आमदार नाच-गाण्यात व्यस्त; गौतमीसोबतचा VIDEO Viral )
मात्र आरोपीसोबत असलेल्या एका व्यक्तीने त्याला विरोध केला आणि तिथून पळ काढला. आरोपीसोबत आणखी 3 जण असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित तपास सुरु केला. पोलिसांना सीसीटीव्ही दृश्यांच्या आधारे चार आरोपांना अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world