पाकिस्तानमधील ऑपरेशन सिंदूरनंतर दिल्लीत आज हालचाली वाढल्या आहेत. भारतीय लष्कराने आपलं काम केलं आहे. आता परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि एनएसए अजित डोभाल यांनी मोर्चा सांभाळला आहे. बुधवारी दिवसभर राजनैतिक बाजू सांभाळणाऱ्या अजित डोभाल आज अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पीएम मोदी आणि डोभाल यांच्यात जवळपास 50 मिनिट चर्चा पार पडली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एकीकडे मोदी आणि डोभाल यांच्यात बैठक सुरु होती, तर दुसरीकडे सर्वपक्षीय बैठक पार पडत होती. या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह ऑपरेशन सिंदूरबाबत अपडेट देत होते. ऑपरेशन सिंदूरसाठी संपूर्ण भारत एकत्र आहे. राजकीय मतभेद विसरून सर्व पक्षे एकत्रित आले आहेत.
पंतप्रधान मोदी आणि डोभाल यांच्या बैठकीत काय झालं?
अजित डोभाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर राजनैतिक आणि गुप्तचर क्षेत्रातील सर्व माहिती सादर केल्याची माहिती आहे. ऑपरेशन सिंदूरच्या बदलत्या परिस्थितीबद्दल पंतप्रधानांना माहिती देण्यात आली आहे. भारतासाठी, या कारवाईनंतरचा हा काळ राजनैतिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. हे पूर्णपणे स्पष्ट झाले आहे की पाकिस्तान लष्करी आघाडीवर भारताचा सामना करण्याच्या स्थितीत नाही.
(नक्की वाचा: 'सुसाईड ड्रोन'ने उडवली पाकिस्तानची झोप! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये वापर)
पाकिस्तान आता जगासमोर विक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचे मंत्री परदेशी टीव्ही न्यूज चॅनेलवर मुलाखती देत आहेत. पाकिस्तान निर्दोष असल्याचा दावा ते करत आहे. मात्र तिथेही पाकिस्तानची नाचक्की होताना दिसत आहे. पाकिस्तानच्या या प्रचारावर आणि ऑपरेशन सिंदूरवर भारत राजनैतिक मार्गाने जगातील देशांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत आहे.
(नक्की वाचा : भारतीय लष्कराची पाकिस्तानवर कारवाई आणि चीनला इशारा! समजून घ्या अर्थ)
ऑपरेशन सिंदूरनंतरच्या अपडेट्स
ऑपरेशन सिंदूरनंतर देशभरातील 21 विमानतळे 10 मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एलओसीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. जोधपूरमधील सर्व खासगी आणि सरकारी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.