
आसाममध्ये भ्रष्टाचाराचे एक मोठे प्रकर उघडकीस येऊ लागले आहे. हे प्रकरण खळबळजनक आणि धक्कादायक आहे. याचं कारण म्हणजे या भ्रष्टाचाराच्या केंद्रस्थानी नुपूर बोरा नावाची एक महिला आहे. नुपूर बोरा ही आसाममधील एक सनदी अधिकारी असून तिला उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती बाळगल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांच्या विशेष दक्षता पथकाने (Special Vigilance Cell) ही कारवाई केली आहे. या कारवाईत नुपूर बोराच्या हिच्या घरातून तब्बल 92 लाख रुपयांची रोकड आणि जवळपास 1 कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. इतकेच नाही, तर बारपेठ येथील एका भाड्याच्या घरातून 10 लाख रुपयांची रोकडही जप्त करण्यात आले आहेत.
नक्की वाचा: सांगलीत स्पेशल 26! तोतया अधिकारी, खोटी IT रेड अन् कोट्यवधींची लूट, कसा घडला थरार?
कोण आहे नुपूर बोरा ?
2019 मध्ये आसाम नागरी सेवेत रुजू झालेल्या नूपुर बोरा सध्या कामरूप जिल्ह्यातील गोरिमारी येथे सर्कल ऑफिसर म्हणून कार्यरत होत्या. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली होती, कारण त्यांच्यावर जमिनींशी संबंधित काही वादग्रस्त प्रकरणांमध्ये सहभाग असल्याच्या तक्रारी येत होत्या. मुख्यमंत्री सरमा यांच्या कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोरा यांनी बारपेठ येथे सेवेत असताना काही संशयास्पद आर्थिक व्यवहार केले होते. बोरा यांच्यावर आरोप होता की त्यांनी काही लोकांकडून पैसे घेऊन हिंदूंच्या जमिनी दुसऱ्यांच्या नावे केल्या. या गंभीर आरोपांनंतर बोरा यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली. मुख्यमंत्री सरमा यांनी म्हटले की, अल्पसंख्याक-बहुल भागांतील महसूली भागात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतोय. त्यावर आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.
नक्की वाचा: नौदलाचा जवान माथेरानच्या जंगलात रहस्यमयरित्या गायब, अखेर आठवड्यानंतर सत्य आलं समोर
बोराचा सहकारीही अडकला
या प्रकरणात नूपुर बोरा यांच्या कथित साथीदार, बारपेठ महसूल वर्तुळ कार्यालयातील कर्मचारी सुरजित डेका यााच्या घरावरही विशेष दक्षता पथकाने धाडी टाकल्या. डेका याच्यावर, बोरा या सर्कल ऑफिसर असताना त्यांच्यासोबत संगनमत करून जमिनींचे पैशाच्या लोभापायी गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. या कारवाईमुळे आसाम प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. सदर प्रकरणात बोरा या बड्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली असून तिला प्रशासनात अजून कोण मदत करत होतं, याचा तपास सुरू झाला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world