
शरद सातपुते, सांगली:
Sangli Special 26 Filmy Style Robbery: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा स्पेशल 26 हा चित्रपट प्रचंड गाजला. तोतया इनकम टॅक्स अधिकारी बनून खोटी धाड टाकली जाते आणि कोट्यवधी रुपये लुटले जातात अशी ही कथा. याच चित्रपटाच्या कथेप्रमाणे सांगलीमध्येही एक खोटा छापा टाकून कोट्यवधी रुपये लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अक्षय कुमारच्या स्पेशल 26 च्या चित्रपटा प्रमाणे सांगलीतल्या कवठेमहांकाळमध्ये एका डॉक्टरच्या घरावर आयकर छापा टाकत कोट्यवधीचे सोने आणि रोकड लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आयकर विभागाकडून आल्याचा सांगत शहरातील प्रसिद्ध डॉक्टर जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरात बोगस आयकर पथकाने रविवारी रात्रीच्या सुमारास प्रवेश केला.
Fact Check: ITR Filing साठी मुदतवाढ मिळाली? 15 सप्टेंबरपर्यंत आहे मुदत
डॉक्टर म्हेत्रे यांना सर्च वॉरंट दाखवत चौघांनी सिने स्टाईल पद्धतीने घराची झडती घेतली, ज्यामध्ये घरात असणारी 16 लाखांची रोकड तब्बल एक किलोच्या आसपास सोन्याचे दागिने असे जवळपास 2 कोटींचे जप्त केल्याचे सांगत तेथून पोबार केला. त्यानंतर डॉक्टरांना संशय आल्याने डॉक्टरांनी कवठेमहांकाळ पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी डॉक्टरांच्या घरी धाव घेतली.
दरम्यान, प्राथमिक तपासात हा छापा बोगस असल्याचे समोर आले असून सर्व प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मात्र तोतया आयकर विभागाच्या धाडीमुळे सांगली जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे.
नक्की वाचा: Pune School Holiday: पुण्यात अनेक शाळांना सुट्टी जाहीर, मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचलं
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world