एक चुकीचा निर्णय अन् न्यायाधीशाने स्वत:ला सुनावली थरकाप उडवणारी शिक्षा; आता मंदिरात होते पूजा

त्या न्यायाधीशाच्या नावाने बांधलेल्या मंदिरात लोक नतमस्तक होतात, कुठे आहे मंदिर? नेमकं प्रकरण काय आहे?

जाहिरात
Read Time: 3 mins

Judge sentenced himself : भारतात हजारो देवी-देवतांची पूजा केली जाते. देव, संतांसमोर आपण मनोभावे नतमस्तक होत असतो. मात्र भारताच्या एका भागात असं एक मंदिर आहे ज्याचा पौराणिक इतिहास नाही. तर ती व्यक्ती १८ व्या शतकातील एक न्यायाधीश आहे. केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील चेरुवल्ली देवी मंदिरात जजयम्मावन म्हणजे एका न्यायाधीशाची पूजा केली जाते. 

असं म्हटलं जातं न्यायालयासंबंधित प्रश्नांमध्ये अडकलेली व्यक्ती येथे नतमस्तक होते. त्रावणकोर देवासम बोर्डाअंतर्गत असलेल्या या मंदिराची मुख्य देवता भद्रकाली आहे. मात्र दक्षिण भारतात अनेक प्रसिद्ध व्यक्ती, कलाकार, न्यायपालिकेशी संबंधित लोकही जजयम्मावन यांच्या दर्शनासाठी येथे येतात. अभिनेता दिलीप यांची २०१७ च्या अपहरण आणि दुष्कृत्य प्रकरणात ८ डिसेंबर २०२५ रोजी न्यायालयाने सुटका केली, त्यानंर हे मंदिर चर्चेत आलं. हे प्रकरण दाखल झाल्यानंतर २०१९ मध्ये अभिनेता दिलीप आपल्या भावासह येथे दर्शनासाठी आले होते. 

तब्बल २०० वर्षांपूर्वी त्रावणकोर काळात कार्तिका तिरुनाल राज वर्मा यांचं शासन होतं. त्यांना धर्मराजा म्हटलं जात. ७ जुलै १७५८ ते १७ फेब्रुवारी १७९८ पर्यंत त्यांनी त्रावणकोरवर शासन केलं. ते प्राचीन न्याय व्यवस्था आणि कायद्याचं पालन करण्यासाठी प्रसिद्ध होते. राजाच्या न्यायालयात गोविंद पिल्लै नावाचे एक जज होते. तो तिरुवल्लाजवळील थलावडी स्थित रामवर्मठ कुटुंबातील होता. ते संस्कृतचे विद्वान होते आणि राजाप्रमाणे कायदा आणि न्यायमार्गाचे चालत. 

Advertisement

नक्की वाचा - Rickshaw Note : रात्री 12 ची वेळ, रॅपिडोमधून प्रवास; रिक्षामधील नोटने वेधलं सर्वांचं लक्ष, तरुणी म्हणाली...

कुठे झाली चूक? 

एकदा गोविंद पिल्लै यांचा पुतणा पद्मनाभ पिल्लै याच्यावर गंभीर आरोप लावण्यात आला होता. या प्रकरणात तो तुरुंगात गेला. पुरावे आणि युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशाने पुतण्याला दोषी मानत त्याला फाशीची शिक्षा सुनावली. मात्र फाशीच्या काही काळानंतर गोविंद पिल्लैला कळालं की त्यांनी दिलेला निर्णय चुकीचा होता. वास्तविक त्यांचा पुतणा निर्दोष होता. चुकीच्या निर्णयामुळे पुतण्याने जीव गमावला होता. याचा आघात त्यांना सहन झाला नाही. त्यांनी राजाकडे स्वत:ला शिक्षा देण्याची मागणी केली. राजाने यास नकार दिला. शेवटी न्यायाधीशालाच शिक्षा सुनावण्यास सांगण्यात आलं. गोविंद पिल्लै यांनी स्वत:ला अशी शिक्षा दिली, जी अत्यंत कठोर आणि भयावह होती. त्यांनी आदेश दिला की, दोन्ही पाय कापून त्यांना सार्वजनिकपणे फासावर लटकवलं जावं, त्याशिवाय हा मृतदेह तीन दिवस तेथेच लटकवत ठेवण्यात यावा, News18 हिंदीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.  

यानंतर गावात अनेक अशुभ घटना घडू लागल्या. यावेळी ज्योतिषाच्या सल्ल्याने न्यायाधीश आणि त्यांच्या पुतण्याच्या आत्माच्या शांतीसाठी त्यांच्या घराजवळ समाधी बांधण्यात आली. काही वर्षांनी चेरुवल्ली देवी मंदिरात जजयम्मावन यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. १९७८ मध्ये न्यायाधीशांच्या वंशजांनी मंदिराच्या प्रांगणात मुख्य देवी मूर्तीच्या बाहेर जजसाठी एक वेगळा गर्भगृह बांधण्यात आला. 

Advertisement

मंदिर दर्शनाची वेळ, ठिकाण..

हे मंदिर दररोज केवळ ४५ मिनिटांसाठी खुलं होतं. रात्री ८ वाजता पूजा-अर्चा सुरू होते. चेरुवल्ली देवी मंदिर पोनकुन्नम आणि मणिमालादरम्यान पुनालूर-मुवाट्टूपुझा हायवेवर हे ठिकाण आहे. येथे जवळील रेल्वे स्टेशन कोट्टायम असून येथून ३७ किलोमीटर अंतरावर मंदिर आहे.