रात्री उशीरा प्रवास करणं महिलांना थोडं जिकरीचं वाटतं. त्यातही काही शहरांमध्ये महिलांना रात्री प्रवास करायला अधिक भीती वाटतं. बंगळुरूतही रात्री प्रवास करताना महिलांच्या मनात थोडीशी भीती असते. मात्र नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओने हा विचार बदलला आहे. एक महिला रात्री १२ वाजता रेपिडो रिक्षाने घरी परतत होती, त्यावेळी रिक्षात चिकटवलेली एक नोट वाचून तिने सुटकेचा सुस्कारा सोडला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे?
व्हिडिओमध्ये महिला सांगते की ती रात्री १२ वाजता रॅपिडोच्या रिक्षातून प्रवास करीत होती. तेव्हाच तिची नजर रिक्षाच्या आत लावलेल्या एका नोटवर गेली. ती म्हणते, ते वाचल्यानंतर तिला सुरक्षित वाटू लागलं. नोटमध्ये लिहिलं होतं, ड्रायव्हरदेखील कुणाचा तरी बाबा आणि भाऊ आहे. महिलेची सुरक्षा त्याच्यासाठी अत्यंक महत्त्वाची आहे. आरामात बसा...
व्हिडिओ होतोय व्हायरल...
हा व्हिडिओ लिटिल बंगळुरू स्टोरीज नावाच्या पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लोकांकडून याचं कौतुक केलं जात आहे.
पाहा Video:
ड्रायव्हरच्या उपक्रमाचा हृदयस्पर्शी पाऊल...
कमेंट सेक्शनमधील वापरकर्त्यांनी लिहिलंय, ते अनेक वर्षांपासून बंगळुरूमध्ये राहतात आणि त्यांना हे सर्वात सुरक्षित शहर वाटतं. अनेकांनी म्हटलं, रात्री उशिरा महिलांचा प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी अशी छोटी पावले महत्त्वाची आहेत. काही वापरकर्त्यांनी असंही म्हटलं की, जर प्रत्येक ड्रायव्हरने असं आश्वासन दिलं तर शहरं आणखी सुरक्षित होऊ शकतात.
महिलांच्या सुरक्षिततेवर मोठा संदेश
या व्हिडिओने दाखवून दिलं की, सुरक्षितता केवळ नियमांमुळेच नाही तर मानवतेमुळे देखील येते. ड्रायव्हरची एक छोटीशी चिठ्ठी हजारो महिलांना आश्वस्त करू शकते. बंगळुरूचा हा रॅपिडो ऑटो ड्रायव्हर आज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. कधीकधी छोटे छोटे शब्द मोठी भीती दूर करू शकतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world