operation sindoor 2: कंधार विमान अपहरणाचा मास्टरमाइंड रऊफ अजहर ठार, संसदेवर ही केला होता हल्ला

रऊफ अझहरचा सहभाग 2001 मधील भारतीय संसद हल्ल्यामध्ये ही होता. तर 2016 मधील पठाणकोट हल्ला आणि 2019 मधील पुलवामा हल्ला यासारख्या अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्याचाच हात होता.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताचा सर्वात मोठा शत्रू ठरलेला आणि पाकिस्तानात लपलेला मोस्ट वाँटेड दहशतवादी अब्दुल रऊफ अजहर हा ठार झाला आहे. भारताने केलेल्या हल्ल्यात त्याचा खात्मा झाला. भाजपने ही तो ठार झाला असल्याचं ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. रऊफ हा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख होता. याचा कंधार विमान अपहरण,पठाणकोट दहशतवादी हल्ला आणि भारतीय संसदेवरच्या हल्ल्यात त्याचा हात होता.  या तीनही भयानक हल्ल्यांचा मास्टरमाइंड रऊफ अजहर होता. तो दहशतवादी मसूद अजहरचा भाऊ आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

अब्दुल रऊफ अझहर हा जैश-ए-मोहम्मद (JeM) या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेचा प्रमुख होता. तो संघटनेच्या संस्थापक मौलाना मसूद अझहरचा धाकटा भाऊ आहे. रऊफ अझहरने 21 एप्रिल 2007 रोजी JeM च्या नेतृत्वाची सूत्रे हाती घेतली होती. त्यावेळी मसूद अझहर भूमिगत झाला होता. त्याच्या नेतृत्वाखाली, JeM ने भारताविरुद्ध अनेक दहशतवादी कारवाया केल्या आहेत. भारतासाठी तो मोस्ट वाँटेड होता.   

ट्रेंडिंग बातमी - S-400 SAM: भारताचे ‘सुदर्शन चक्र' काय आहे? ज्यामुळे पाकिस्तानचा रात्रीचा हल्ला झाला निष्फळ

रऊफ अझहर 1999 मध्ये इंडियन एअरलाईन्सच्या IC-814 विमान अपहरणाचा मुख्य सूत्रधार होता. त्यानेच या विमानाचे अपहरण केले होते. या अपहरणाच्या माध्यमातून भारत सरकारकडून मसूद अझहर, अहमद उमर सईद शेख आणि मुश्ताक अहमद यांसारख्या दहशतवाद्यांची सुटका त्यानेच करुन घेतली होती. या घटनेनंतर, JeM या नव्या दहशतवादी संघटनेची स्थापना करण्यात आली होती. त्याची धुरा रऊफ वर होती.   

ट्रेंडिंग बातमी - Operation Sindoor: बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार? काय केली होती भविष्यवाणी?

रऊफ अझहरचा सहभाग 2001 मधील भारतीय संसद हल्ल्यामध्ये ही होता. तर 2016 मधील पठाणकोट हल्ला आणि 2019 मधील पुलवामा हल्ला यासारख्या अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्याचाच हात होता. त्याचे पुरावेही भारताकडे होते. त्याच्या या कारवायांमुळे तो भारताच्या सर्वाधिक वाँटेड दहशतवाद्यांपैकी एक बनला होता. भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानमधील बहावलपूर येथे स्थित JeM च्या तळांवर हवाई हल्ले केले. या कारवाईत रऊफ अझहर ठार झाल्याचे वृत्त आहे. भाजपने त्यांच्या अधिकृत ट्वीटरवर तो ठार झाल्याचे म्हटले आहे. 

Advertisement