पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव (India-Pakistan Tension) वाढत आहे. दोन्ही देश दररोज एकमेकांवर नवनवीन निर्बंध लादण्याची घोषणा करत आहेत. जगभरातील देश भारत आणि पाकिस्तानला शांतता राखण्याचे आवाहन करत आहेत. इतकेच नव्हे तर, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत या विषयावर बंद दाराआड चर्चा झाल्यानंतर, संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांनी दोन्ही देशांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. वाढत्या तणावामुळे युद्धाची शक्यता वाढत आहे. जगाबद्दल अनेक भविष्यवणी करणारे महान भविष्यवक्ता बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीने काही असेच संकेत दिले आहेत. त्यांनी 2025 मध्ये पृथ्वीवर एका मोठ्या युद्धाची शक्यता वर्तवली होती. जरी बाबा वेंगा यांनी कोणत्याही विशिष्ट देशाचे नाव घेतले नव्हते, तरीही आतापर्यंत त्यांच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत बाबा वेंगा आणि त्यांनी 2025 साठी काय भविष्यवाणी केली होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे बाबा वेंगाची भविष्यवाणी?
वेंगाच्या भविष्यवाणीनुसार, 2025 मध्ये असा संघर्ष होईल ज्यामुळे युरोपचं मोठं नुकसान होईल. अनेक वर्षांपूर्वी केलेली त्यांची ही भविष्यवाणी आजही चर्चेत आहे. सध्या रशिया आणि युक्रेन तसेच गाझामध्ये भयंकर युद्ध सुरू आहे. त्यातच आता भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढल्याने जगात आणखी एक युद्ध सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वेंगा यांनी 2025 मध्ये विनाशकारी भूकंपांचीही भविष्यवाणी केली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी म्यानमारमध्ये 7.7 तीव्रतेचा भूकंप आला होता. त्यात 1700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.
कोण होत्या बाबा वेंगा?
1911 मध्ये बल्गेरियामध्ये जन्मलेल्या वांगेलिया पांडेवा गुश्तेरोव्हा भविष्य सांगण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे बाबा वेंगा म्हणून प्रसिद्ध झाल्या. वयाच्या 12 व्या वर्षी त्यांनी दृष्टी गमावली. त्यानंतर त्यांनी भविष्य पाहण्याची शक्ती असल्याचा दावा केला. त्यांनी जगातील अनेक मोठ्या घटनांविषयी भविष्यवाण्या केल्या. त्यापैकी अनेक खऱ्या ठरल्या आहेत. 1996 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अनुयायी त्यांच्या भविष्यवाण्यांबद्दल सांगतात.
बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्या
- बाबा वेंगा यांनी 2025 मध्ये भयंकर युद्ध होण्याची भविष्यवाणी केली होती. त्यांच्या भविष्यवाणीनुसार, 2025 मध्ये युरोपमधील अनेक देशांमध्ये भयानक लढाई होईल.
- बाबा वेंगा यांच्या मते, 2025 मध्ये मानवतेच्या पतनाची सुरुवात होईल आणि यासाठी सर्वात मोठे कारण युद्ध ठरू शकते.
- 2022 मध्ये सुरू झालेले आणि आतापर्यंत सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध केवळ युरोपसाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी चिंतेचे कारण बनले आहे. या लढाईत अमेरिका, नाटो आणि युरोपियन युनियनसारख्या प्रमुख देशांचा सहभाग असल्याने रशिया-युक्रेन युद्ध अधिक धोकादायक बनले आहे.
- बाबा वेंगा यांच्या अनेक भविष्यवाण्या यापूर्वी खऱ्या ठरल्या आहेत. ज्यात 2004 मधील त्सुनामी, 2019 मधील कोरोना महामारी आणि अमेरिकेतील 9/11 चा हल्ला यांचा समावेश आहे.
- बाबा वेंगा यांनी आणखी काही धोकादायक भविष्यवाण्या केल्या आहेत. यामध्ये 2043 मध्ये युरोपमध्ये मुस्लिम धर्माच्या अनुयायांचे राज्य येईल ही भविष्यवाणी सर्वात चिंताजनक मानली जात आहे.
- अशा परिस्थितीत, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव संपूर्ण जगाला चिंतेत टाकणारा आहे. जगाने यापूर्वीच दोन भयंकर युद्धे पाहिली आहेत. यात लाखो लोकांचा मृत्यू झाला. प्रचंड विनाश झाला. अशा स्थितीत भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू होण्याचा धोका वाढत आहे. ही माहिती केवळ सामान्य ज्ञान देते. याची एनडीटीव्ही पुष्टी करत नाही.