
पहलगाममधील 26 जणांच्या मृत्यूचा भारताने बदला घेतला. पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. बुधवारी रात्री 1.30 वाजता भारतीय सैन्याने हवाई हल्ला (पाकिस्तान एअरस्ट्राईक) करून 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. ही ती ठिकाणे होती जिथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात होतं. नष्ट झालेल्या ठिकाणी मुरीदके, एक मोठा मरकज, लाहोरपासून थोड्या अंतरावर असलेला लष्कर-ए-तैयबा (एलईटी) चा तळ यांचा समावेश होता. जेव्हा मारिदकेमध्ये ड्रोन हल्ला करण्यात आला तेव्हा तिथले दृश्य खूपच भयानक होते. लोक घाबरले होते. एका स्थानिक नागरिकाने हल्ल्याचं वर्णन केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दहशतवादी तळांविरोधात भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानमधील मुरीदके येथील एका स्थानिकाने सांगितलं, वेळ साधारण 12.45 ची होती. सर्वात आधी एक ड्रोन आला, त्यानंतर आणखी तीन ड्रोन आले. यानंतर त्यांनी मशिदीवर हल्ला केला. त्यानंतर हल्ल्यांवर हल्ले होत राहिले. काही वेळात सर्व उद्ध्वस्त झालं. भारतीय सैन्याने पहलगाम हल्ल्याचा बदल घेतला. यावेळी भारताने पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर केवळ ड्रोनच नाही तर मिसाइलही दागली आहेत.
नक्की वाचा - Operation Sindoorचा विमानसेवेवर परिणाम; श्रीनगर, जम्मूसह या भागातील उड्डाणे रद्द
पाकिस्तानातील या नऊ ठिकाणांवर केला हल्ला
मरकज सुभान अल्लाह, बहावलपुर - जैश-ए-मोहम्मद
मरकज तैयबा, मुरीदके - लश्कर ए तोयबा
सरजल, तेहरा कलां - जैश-ए-मोहम्मद
महमूना जोया, सियालकोट - हिजबुल मुजाहीदीन
मरकज अहले हदीस, बरनाला - लश्कर ए तोयबा
मरकज अब्बास, कोटली - जैश ए मोहम्मद
मस्कर राहील शाहिद, कोटली -हिजबुल मुजाहीदीन
शावई नाला कँप, मुजफ्फराबाद - लश्कर ए तोयबा
सैयदना बिलाल कँप, मुजफ्फराबाद - जैश ए मोहम्मद
पाकिस्तानी सीमेपासून हल्ल्याच्या ठिकाणांचे अंतर
बहावलपूर - 100 किमी आत
मुरीदके - 30 किमी आत
गुलपुर-35 किमी आत
सवाई कँप-30 किमी आत
बिलाल कँप- अंतर स्पष्ट नाही
कोटली कँप- 15 किमी आत
बर्नाला कँप- 10 किमी आत
सरजाल कँप- 8 किमी आत
मेहमूना कँप- 15 किमी आत
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world