Operation Sindoor : 25 मिनिटं, 21 ठिकाणं; दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचणारं ऑपरेशन कसं राबवलं?

6 मेच्या मध्यरात्री 1.05 ते 1.30 या दरम्यान अवघ्या 25 मिनिटात दहशतवाद्यांच्या 9 तळातील 21 ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली.

जाहिरात
Read Time: 3 mins

22 एप्रिल रोजी लश्कर-ए-तैयबाने काश्मीरातील  पहलगाममध्ये आलेल्या पर्यटकांवर हल्ला केला होता. याच्या प्रत्युत्तरात भारतीय सैन्याने पीओके आणि पाकिस्तानातील 21 दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली. सुरक्षा दलाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी 6 मेच्या मध्यरात्री नेमकं काय घडलं याबाबत माहिती दिली. 

6 मेच्या मध्यरात्री 1.05 ते 1.30 या दरम्यान अवघ्या 25 मिनिटात दहशतवाद्यांच्या 9 तळातील 21 ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली.  यावेळी पाकिस्तानातील सर्वसामान्य नागरिकांना धोका होऊ नये यासाठी काळजी घेण्यात आली होती. 

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी 22 एप्रिल रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले. या कारवाईत, 9 दहशतवाद्यांचे अड्डे लक्ष्य करून नष्ट करण्यात आले.. या कारवाईत सामान्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली गेली.  पाकिस्तानवर ६ मे रोजी मध्यरात्री 1 वाजून 5 मिनिटांनी हल्ला झाला. या कारवाईत 9 दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला. ही कारवाई दुपारी 1.05 ते 1.30 वाजेपर्यंत चालली. गुप्तचर माहितीच्या आधारे लक्ष्यावर हल्ला करण्यात आला. 

दहशतवादी हल्ल्याच्या कट रचणाऱ्यांवर हल्ला झाला. पाकिस्तान आणि पीओके दोन्हीवर हल्ले झाले. आम्ही नागरिकांना इजा केली नाही. सर्वप्रथम, सवाई नाला कॅम्पला लक्ष्य करण्यात आले. आम्ही जैश आणि लष्करच्या छावण्यांना लक्ष्य केले. 9 ठिकाणी 21 लक्ष्यांवर हल्ला करण्यात आला. पाकिस्तानमधील ज्या ठिकाणी हल्ला झाला ते ठिकाण सियालकोट आहे. येथील सरजल छावणीवर हल्ला झाला. इथे हिजबुलची एक छावणी होती.

Advertisement

नक्की वाचा - Operation Sindoor : भारताची कारवाई फक्त दहशतवाद आणि दहशतवाद्यांविरोधात : परराष्ट्र सचिव


पाकिस्तानातील या टार्गेट्सवर हल्ला...

सरजल कॅम्प, सियालकोट: हे आंतरराष्ट्रीय सीमेपासून 6 किलोमीटर अंतरावर आहे. मार्च 2025 मध्ये जम्मू आणि काश्मीरच्या चार सैनिकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना याच ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आलं होतं. 

महमूना जया कॅम्प, सियालकोट: हे ठिकाण  आयबीपासून 12 ते 18 किलोमीटर अंतरावर होते आणि हिजबुल-मुजाहिदीनचा एक मोठा कॅम्प होता. कठुआमध्ये दहशत पसरवण्याचं केंद्र होतं. पठाणकोट एअरबेसवरील हल्लाही येथूनच रचण्यात आला होता.

Advertisement

मरकझ तैयबा मुरीदके: हे ठिकाण आयबीपासून 18 ते 25 किलोमीटर अंतरावर आहे. 2008 च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना येथे प्रशिक्षण देण्यात आलं होतं. अजमल कसाब आणि डेव्हिड हेडली यांनीही येथे प्रशिक्षण घेतले.

मरकज सुभानअल्लाह, भवलपूर: हे ठिकाण  आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किमी अंतरावर आहे. हे जैश-ए-मोहम्मदचे केंद्र होते.

विक्रम मिसरी यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

  • पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा हात उघड झाला आहे, त्याची रूपरेषा पाकिस्तानच्या ट्रॅक रेकॉर्डशी जुळते. 
  • पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनले आहे. दहशतवादी येथे लपण्यासाठी येतात.
  • 15 दिवस उलटूनही पाकिस्तानने कोणतीही कारवाई केलेली नाही.
  • आज भारताने सीमापार दहशतवादी हल्ले रोखण्याचा आणि त्यांना प्रत्युत्तर देण्याचा आपला अधिकार वापरला आहे.
  • आम्ही दहशतवादाविरुद्ध कारवाई केली असून आमची कृती चिथावणीखोर नाही.
  • आम्हाला गुप्तचर माहिती होती की आणखी हल्ले होऊ शकतात.