Operation Sindoor नंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, Google वर राफेलची किंमत करतायेत सर्च

भारतीयदेखील सोशल मीडियावर या ट्रेंड्सवर मोठी प्रतिक्रिया देत आहेत. ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर #OperationSindoor, #Rafale आणि #IndianArmy सारखे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. एअर स्ट्राईकमुळे भारताने केवळ दहशतवाद्यांच्या घरात घुसून धडा शिकवला. तर पाकिस्तानातील जनता आणि तेथील मीडियामध्ये भीतीचं वातावरण आहे. याचा पुरावा गुगलवर पाहायला मिळू शकते. पाकिस्तानी गुगलवर Rafale Jet', 'Indian Army' आणि 'Indian Air Strike' सारखे शब्द सर्च करीत आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान हादरला..
ऑपरेशन सिंदूरनंतर गुगल ट्रेंड्समध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळत आहे. पाकिस्तानातील शहरांमध्ये राफेल फायटर जेट आणि भारतीय सैन्याची ताकद यावर अचानक इंटरेस्ट पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर या सर्च ट्रेंड्सचे स्क्रीनशॉट व्हायरल होत आहेत. 

नक्की वाचा - Operation Sindoor : रात्री 12.45 ची वेळ, आधी एक ड्रोन नंतर 3 अन् सर्व उद्ध्वस्त..., प्रत्यक्षदर्शीचा थरकाप उडवणारा अनुभव

Advertisement

पाकिस्तानातील अनेक भागातून गुगलवर सर्वाधिक सर्च केलेले टॉपिक
Rafale Jet India
Indian Army Power 
Operation Sindoor Details
Indian Air Force Strike Today
Bharat ki Sena kitni powerful hai


भारतीयदेखील सोशल मीडियावर या ट्रेंड्सवर मोठी प्रतिक्रिया देत आहेत. ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर #OperationSindoor, #Rafale आणि #IndianArmy सारखे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. यावरून स्पष्ट होत आहे की, भारताची ही कारवाई केवळ सैन्याचे ऑपरेशन नाही तर एक कडक संदेश आहे. जर कोणी भारताकडे वाईट नजरेने पाहील तर त्याला तसंच प्रत्युत्तर मिळेल. 

Advertisement