शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव बदलून सेंट मेरी करा! कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची मागणी

काँग्रेसचे आमदार रिझवान अर्शद यांनी शिवाजी नगर मेट्रो स्टेशनचे नाव बदलून सेंट मेरी स्टेशन असे ठेवावे अशी मागणी केली होती.

जाहिरात
Read Time: 3 mins

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर केवळ महाराष्ट्रात अथवा भारतातच नाही तर संपूर्ण जगात केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्नाटकात एका मेट्रो स्टेशनला नाव देण्यात आले आहे. शिवाजीनगर असं या स्टेशनचं नाव असून या स्टेशनचे नाव सेंट मेरी असं करावं अशी मागणी केली जाऊ लागली असून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शिवप्रेमींमध्ये यामुळे संतापाची लाट उसळली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असलेल्या स्टेशनचे नाव बदलण्याचा हा प्रकार अत्यंत चुकीचा आणि अवमानकारक असल्याचे शिवप्रेमींनी म्हटले आहे.  

नक्की वाचा: भाजप-शिवसेना शिंदे गटाची युती फुटली, निवडणुकीत भाजपची सरशी

काँग्रेस आमदाराची मागणी, मुख्यमंत्र्यांनी मान डोलावली

मागील आठवड्यात बेंगळुरूतील सेंट मेरी बॅसिलिका येथे आयोजित एका वार्षिक मेजवानीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात आर्चबिशप पीटर माचाडो यांनी बॅसिलिकाच्या नूतनीकरणासाठी निधीची मागणी केली, तसेच पिंक लाईनवरील आगामी शिवाजीनगर मेट्रो स्टेशनला सेंट मेरीचे नाव देण्याची मागणी केली. या दोन्ही मागण्यांना मुख्यमंत्र्यांनी "सकारात्मक प्रतिसाद" देण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवाजी महाराजांच्या नावाचा आदर राखण्याऐवजी, त्यांच्या नावाने असलेल्या स्टेशनला अन्य नाव देण्याचा प्रयत्न का केला जात आहे, असा संतप्त सवाल केला जात आहे. 

नक्की वाचा: स्प्लेंडर, होंडा शाईन, बजाजची प्लॅटिना; कोणती बाईक अधिक स्वस्त होणार?

तुष्टीकरणाचे प्रो मॅक्स राजकारण! भाजपची टीका

भाजपने या मुद्दावरून काँग्रेसवर टीका करताना म्हटले आहे की, काँग्रेसने काही विशिष्ट लोकांच्या तुष्टीकरणासाठी प्रो मॅक्स लेव्हलचे राजकारण सुरू केले आहे. या स्टेशनचे नाव कर्नाटकातील एखाद्या सन्माननीय व्यक्तीच्या नावावर ठेवावे अशी मागणी केली जात आहे. अभिनेते शंकर नाग यांचे नाव या स्टेशनला द्यावे अशीही मागणी होत आहे. ना त्यांचे नाव दिले जात आहे ना शिवाजी महाराजांचे नाव कायम ठेवले जात आहे. स्टेशनला नाव दिलं जातंय ते सेंट मेरी यांच्या नावाने. उद्धव ठाकरे हे या निर्णयाशी सहमत आहेत का ?त्यांनीही याबद्दलचं उत्तर देणं गरजेचं आहे. 

शिवाजीनगर मतदारसंघातून निवडून आलाय काँग्रेस आमदार

काँग्रेसचे आमदार रिझवान अर्शद यांनी शिवाजी नगर मेट्रो स्टेशनचे नाव बदलून सेंट मेरी स्टेशन असे ठेवावे अशी मागणी केली होती. ही मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरमय्या यांनी तत्काळ उचलून धरली. आपण यासंदर्भात केंद्र सरकारला पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी जाहीर करून टाकले. केंद्राला पत्र लिहून आपण या स्टेशनचे नाव बदलून सेंट मेरी यांच्या नावे करावे अशी मागणी करणार असल्याचे सिद्धरमय्या यांनी म्हटले आहे. विशेष बाब ही आहे की नाव बदलाची ही मागणी करणारे रिझवान अर्शद हे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातूनच निवडून आले आहेत. असं असताना शिवाजी महाराजांच्या नावाचे कर्नाटकातील सत्ताधाऱ्यांना वावडे का आहे ? असा सवाल विचारला जात आहे. 

Advertisement