- पद्म पुरस्कारों की संभावित सूची में कैलाशचंद्र, ब्रज लाल भट्ट और डॉ. श्याम सुंदर जैसे नाम शामिल
- पद्म पुरस्कारों की आधिकारिक घोषणा सरकार द्वारा जल्द ही गणतंत्र दिवस से पहले की जाएगी
- सूची में विभिन्न राज्यों के प्रतिष्ठित व्यक्तियों के नाम हैं, जो अपने क्षेत्रों में खास योगदान दे रहे हैं
Padma Awards 2026 List from maharashtra : प्रजासत्ताक दिनापूर्वी पद्म पुरस्काराची यादी समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये कैलाशचंद्र, ब्रज लाल भट्ट, डॉ. श्याम सुंदर सह अनेक नावांचा समावेश आहे. सरकारकडून लवकरच पद्म पुरस्कार मिळालेल्या दिग्गजांची घोषणा केली जाईल. यामध्ये चार महाराष्ट्रातील मान्यवरांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातून कोणा-कोणाला मिळाले पद्म पुरस्कार?
भिकल्या लडक्या धिंडा (महाराष्ट्र)
रघुवीर खेडकर (महाराष्ट्र)
आर्मिदा फर्नांडीस (महाराष्ट्र)
श्रीरंग देवबा लाड (महाराष्ट्र)
लोककलावंताचा सन्मान....
यंदा महाराष्ट्रातील रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील लोककलावंत, तमाशा क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. खेडकर हे ज्येष्ठ तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे पुत्र. ते केवळ फड चालवित नाही तर त्यांनी उत्तम सोंगाड्या साकारला. गेल्या चार दशकांहून अधिक काळापासून ते तमाशा रंगभूमी गाजवित आहेत. महाराष्ट्रातील तमाशा ही लोककला त्यांनी जागतिक स्तरावर पोहोचली. डॉ. जब्बार पटेल यांनी 'एक होता विदुषक' हा चित्रपट लिहिताना रघुवीर खेडकर यांना डोळ्यासमोर ठेवले होते, अशी माहिती आहे.
पद्म पुरस्कार मिळालेल्या मान्यवरांची यादी...
- भगवंदास रायकर (मध्य प्रदेश)
- भिकल्या लडक्या धिंडा (महाराष्ट्र)
- ब्रिज लाल भट्ट (जम्मू-कश्मीर)
- चरण हेम्ब्रम (ओडिशा)
- चिरंजी लाल यादव (उत्तर प्रदेश)
- डॉ. पद्मा गुरमेट (जम्मू-कश्मीर)
- कोल्लक्कयिल देवकी अम्मा जी (केरल)
- महेंद्र कुमार मिश्रा (ओडिशा)
- नरेश चंद्र देव वर्मा (त्रिपुरा)
- ओथूवर तिरुथानी (तमिलनाडू)
- रघुपत सिंह (उत्तर प्रदेश)
- रघुवीर खेडकर (महाराष्ट्र)
- राजस्तापति कालीअप्पा गौंडर (तमिलनाडू)
- सांग्युसांग एस. पोंगेनर (नागालँड)
- श्रिरंग देवबा लाड (महाराष्ट्र)
- थिरुवरूर बख्तवसलम (तमिलनाडू)
- अंके गौड़ा (कर्नाटक)
- आर्मिदा फर्नांडीस (महाराष्ट्र)
- डॉ. श्याम सुंदर (उत्तर प्रदेश)
- गफरुद्दीन मेवाती (राजस्थान)
- खेम राज सुंद्रीयाल (हरियाणा)
- मीर हाजीभाई कसामभाई (गुजरात)
- मोहन नगर (मध्य प्रदेश)
- नीलेश मंडलेवाला (गुजरात)
- आर एंड एस गोडबोले (छत्तीसगड)
- राम रेड्डी ममिडी (तेलंगाना)
- सिमांचल पात्रो (ओडिशा)
- सुरेश हनागवाड़ी (कर्नाटक)
- तेची गूबिन (अरुणाचल प्रदेश)
- युनम जत्रा सिंह (मणिपुर)
- बुधरी ताथी (छत्तीसगढ)
- डॉ. कुमारासामी थंगाराज (तेलंगाना)
- डॉ. पुण्णियामूर्ति नटेासन (तमिलनाडू)
- हैली वॉर (मेघालय)
- इंदरजीत सिंह सिद्धू (चंडीगड)
- के. पाजनिवेल (पाँडिचेरी)
- कैलाश चंद्र पंत (मध्य प्रदेश)
- नुरुद्दीन अहमद (आसाम)
- पोकीला लेकटेपी (आसाम)
- आर. कृष्णन (तमिलनाडू)
- एस. जी. सुशीलेम्मा (कर्नाटक)
- टागा राम भील (राजस्थान)
- विश्व बंधु (बिहार)
- धर्मिकलाल चूनीलाल पांड्या (गुजरात)
- शफी शौक़ (जम्मू-कश्मीर)
या सन्मानाची काय आहे खासियत?
भारताच्या सर्वोच्च नागरिक सन्मानामध्ये सामील पद्म पुरस्कार तीन श्रेणींमध्ये दिले जातात. यामध्ये पद्म विभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. हे सन्मान कला, सामाजिक कार्य, जन प्रशासन, विज्ञान, व्यापार, उद्योग, वैद्यकीय, साहित्य, शिक्षण, खेळ आदी क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी करणाऱ्यांना दिले जातात. पद्मविभूषण हा अपवादात्मक आणि विशिष्ट सेवेसाठी, पद्मभूषण उच्च दर्जाच्या विशिष्ट सेवेसाठी, तर पद्मश्री हा कोणत्याही क्षेत्रातील गुणवंत सेवेसाठी दिला जातो. या पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनी केली जाते.