
जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 26 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता. या हल्ल्यानंतर पर्यटकांनी काश्मीरकडे पाठ फिरवली. पर्यटकांमध्ये भितीचे वातावरण असल्याने त्यांनी काश्मीर ऐवजी शिमला मनालीला पसंती दिल्याचे समोर येत आले. परिणामी ऐन सिजनमध्ये काश्मीरच्या व्यवसायिकांना पर्यटकांची वाट पाहात बसावं लागलं आहे. यावर मुश्ताक अहमद चाया या काश्मीरच्या हॉटेल उद्योजकाने नामी शक्कल लढवली आहे. त्यांनी आपल्या हॉटेलमध्ये राहण्यासाठी एक भन्नाट ऑफर देवू केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पर्यटकांनी परत काश्मीरला यावे यासाठी मुश्ताक अहमद चाया यांनी थेट 50 टक्के सवलत दिली आहे. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पर्यटकांनी काश्मीरकडे पाठ फिरवली. त्यामुळे आमचे मोठे नुकसान झाले आहे असं चाया हे सांगतात. त्यांनी आता परत काश्मीरमध्ये यावं असं आवाहन ही त्यांनी केले आहे. आपण दिलेल्या ऑफर मुळे पर्यटक काश्मीरमध्ये येतील अशी आशा त्यांना आहे. त्यांची हॉटेल्स ही काश्मीर मधील प्रसिद्ध हॉटेल्स पैकी एक आहेत. ज्या दहशतवाद्यांनी हे कृत्य केलं आहे त्यांना लाल चौकात फाशी द्यावी अशी मागणी ही त्यांनी केली. शिवाय पाकिस्तानला कायमचा धडा शिकवा असं ही ते म्हणाले.
मुश्ताक अहमद चाया हे श्रीनगर, जम्मू-कश्मीर येथील एक प्रतिष्ठित उद्योजक आणि हॉटेल व्यावसायिक आहेत. ते मुमताज ग्रुप ऑफ हॉटेल्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD) आहेत. ते ग्रँड मुमताज हॉटेल्स या ब्रँडअंतर्गत कार्यरत आहेत. त्यांच्या समूहाकडे भारतभरात 14 हॉटेल्स आहेत. यापैकी 9 काश्मीर खोऱ्यात, 2 जम्मूमध्ये आणि 3 दिल्लीमध्ये आहेत. यापैकी 6 हॉटेल्स Radisson ब्रँडशी संलग्न आहेत. विशेषतः श्रीनगरमधील Radisson Collection Hotel & Spa Riverfront हे भारतातील पहिले असे हॉटेल आहे, ज्यात 212 खोल्या आहेत. काश्मीरमधील सर्वात मोठे बॅन्क्वेट हॉल आहे याच हॉटेलमध्ये आहे.
चाया यांनी जम्मू-कश्मीरमधील पर्यटन व आतिथ्य क्षेत्राच्या विकासात मोलाची भूमिका बजावली आहे. ते J&K Hotelier Club चे अध्यक्ष राहिले आहेत. PHDCCI (PHD चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री) चे माजी अध्यक्ष देखील आहेत. तसेच, ते HRANI (Hotel & Restaurant Association of Northern India) च्या संचालक मंडळावर जम्मू-कश्मीरचे विशेष आमंत्रित सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा व्यवसायिक प्रवास प्रेरणादायक असून त्यांनी स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठे योगदान दिले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world