पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना गोळ्या घालून ठार केलं. त्यानंतर भारत सरकारने पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलली आहेत. त्यानुसार पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. शिवाय 48 तासांच्या आत त्यांना देश सोडण्यास सांगण्यात आला आहे. या निर्णयानंतर पुन्हा एकदा सीमा हैदर (Seema Haider) हीचं नाव चर्चेत आलं आहे. सीमा हैदर हीच आहे जी पाकिस्तानातून दुबई नेपाळ मार्गे भारतात आली होती. शिवाय तिने इथे सचिन मिणा याच्या बरोबर लग्न ही केलं होतं. नुकतीच तिनं एका मुलीला ही जन्म दिला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मात्र सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर सीमा हैदरचं काय होणार याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता तिचे वकील ए. पी. सिंह यांनी याबाबत काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. ते म्हणाले की जो पहलगाममध्ये हल्ला झाला त्याचा आपण निषेध करतो. ही घटना समजल्यानंतर सीमा हैदरने दुख: व्यक्त केलं आहे. शिवाय तिला मोठा धक्का ही बसला आहे. सध्या ती एक रुग्णालयात उपचार घेत आहे.
सिंह यांनी पुढे सांगितले की सीमा हैदर ही पाकिस्तान सोडून भारतात आली आहे. तिने सनातन धर्माचा स्विकारही केला आहे. ती भारतात नेपाळ मार्गे दाखल झाली. त्याच बरोबर तिने सचिन मीणा याच्या बरोबर लग्न ही केले आहे. शिवाय तिने आता भारतात एका मुलीला ही जन्म दिला आहे. भारत सरकारने पाकिस्तानी लोकांचा व्हिसा रद्द केला आहे. हा निर्णय चांगला आहे. पण सीमा हैदरची केस थोडी वेगळी आहे. सीमा हैदरचे सर्व कागदपत्र गृह मंत्रालयाकडे आहेत. एटीएसने ही त्यांची कागदपत्र घेतली आहेत. राष्ट्रपतींकडेही त्यांची याचिका प्रलंबित आहे, असं ही त्यांनी सांगितलं.
उत्तर प्रदेशच्या न्यायालयाने त्यांना जामीन ही मंजूर केला आहे. त्यांना ज्या अटी घातल्या आहेत त्या सर्व अटींचे त्या पालन ही करत आहेत. सीमा सध्या आपल्या सासरी कुटुंबासह राहाते. त्यांना पाकिस्तानातून सतत धमक्या ही येत आहेत. त्यांना मारून टाकण्याची धमकी ही मिळाली आहे. याबाबत त्यांनी तक्रार ही दाखल केली आहे. अशा स्थितीत सचिन आणि सीमा यांचे संपूर्ण कुटुंब भारत आणि उत्तर प्रदेश सरकारवर विश्वास ठेवून आहे. सीमा भारतात शरण आली आहे. शिवाय सर्व कायद्याचे ती पालनही करत आहे असं त्यांनी स्पष्ट केलं.