Paris Olympic: स्वप्नील कुसाळेच्या स्वागताचा प्लॅन ठरला, सरकारने जाहीर केले 1 कोटींचे बक्षिस

कोल्हापूरच्या नेमबाज स्वप्नील कुसाळे याने नेमबाजीत 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये 1 ऑगस्ट रोजी कांस्य पदक पटकावले आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत कांस्यपदकाचा वेध घेणारा स्वप्नील कुसाळेचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्राला स्वप्नीलने पहिले ऑलिंपिक पदक जिंकून दिले आहे. तब्बल 72 वर्षांनी महाराष्ट्रातील खेळाडूने पदक कमावले आहे. स्वप्नीलचे कौतुक करण्यासाठी एक जंगी प्लॅन निश्चित करण्यात आला असून स्वप्नील मायदेशी परतल्यानंतर त्याचे दणदणीत स्वागत केले जाणार आहे.

स्वप्नीलचे कौतुक करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलच्या कुटुंबियाना फोन केला. स्वप्नील हा महाराष्ट्राचा अभिमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलचे अभिनंदन केले आहे. कोल्हापूरच्या नेमबाज स्वप्नील कुसाळे याने नेमबाजीत 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये 1 ऑगस्ट रोजी कांस्य पदक पटकावले आहे. स्वप्नीलच्या या कामगिरीबद्दल  महाराष्ट्र शासनातर्फे त्याला एक कोटी रुपयांचे पारितोषिक दिले जाईल, असे जाहीर करण्यात आले आहे. 

Advertisement

Paris Olympics 2024: कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळने जिंकलं कांस्यपदक

मुख्यमंत्र्यांनी स्वप्नीलचे कौतुक करताना म्हटले की,स्वप्नीलमुळे कुस्तीमध्ये भारतासाठी वैयक्तिक असे पहिले पदक पटकावणाऱ्या खाशाबा जाधव यांचे स्मरण झाले. तब्बल 72 वर्षांनी स्वप्नीलने महाराष्ट्रासाठी या पदकाचा वेध घेतला आहे.  कोल्हापूर जिल्ह्याला नेमबाजीची एक मोठी परंपरा आहे. ही परंपरा स्वप्नीलने कायम राखली आहे. कांबळवाडी सारख्या ग्रामीण भागातून येऊन स्वप्नीलने आपले राज्य आणि देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकावले आहे. देशासाठी वैयक्तिक पदकाची कमाई करताना, स्वप्नीलने महाराष्ट्राचा क्रीडा क्षेत्रातील गौरव वाढवला आहे. स्वप्नीलच्या या यशात त्यांचे कुटुंबीय, प्रशिक्षक, मार्गदर्शक यांचे मोलाचे योगदान आहे, या सर्वांचे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने अभिनंदन.शिंदे यांनी पुढे म्हटले की, स्वप्नीलच्या पुढील वाटचालीसाठी आवश्यक असे सर्व ते सहकार्य केले जाईल. 

Advertisement

स्वप्नीलचा मोठा सत्कार होणार 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्वप्नीलच्या घरच्यांशी फोनवरून संपर्क साधत त्यांचे अभिनंदन केले. फडणवीसांनी म्हटले की, 1952 नंतर स्वप्नीलने वैयक्तिक पदक मिळवून दिलं. त्यामुळे ही गोष्ट आमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. स्वप्नील परत आल्यानंतर त्याचा मोठा सत्कार करायचा आहे. 

Advertisement

स्वप्नीलची जंगी मिरवणूक निघणार

कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही पॅरिस येथील ऑलम्पिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या स्वप्नील कुसाळेचे अभिनंदन केले. स्वप्नील कोल्हापुरात आल्यानंतर त्याची जंगी मिरवणूक काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुश्रीफ यांनी स्वप्नीलचे वडिल सुरेश कुसाळे यांना फोन करून स्वप्नील आणि त्याच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले.