जाहिरात
4 months ago
नवी दिल्ली:

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (22 July) सुरू झालं आहे. या अधिवेशनात (Budget Session of Parliament) 23 जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करतील. त्यापूर्वी आज अधिवेशनात नीट या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. 

गेल्या सात वर्षात पेपर लीक प्रकरणात पुरावे मिळाले नाहीत - शिक्षण मंत्री

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. या अधिवेशनात 23 जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करतील. त्यापूर्वी आज अधिवेशनात नीट या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, गेल्या सात वर्षांत पेपर लीक प्रकरणात कोणतेही पुरावे मिळालेलं नाही. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. 

राहुल गांधी यांनी नीट पेपर लीक मुद्दा केला उपस्थित

काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्ष नेता राहुल गांधी यांनी नीट पेपर लीक मुद्दा उपस्थित केला. 

यावेळी राहुल गांधी म्हणाले, प्रश्न फक्त नीट पेपर फुटीचा नाही तर देशातील एकूण सिस्टीमचा आहे. तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही भारतातील परीक्षेची सिस्टीम विकत घेऊ शकता. तुम्ही या सिस्टीमवर काय करत आहात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

अर्थसंकल्पीय अधिवेशन Live

Listen to the latest songs, only on JioSaavn.com