Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! 'त्या' दोघांनी काय केलं? पर्यटकांना असं फसवलं

गर्दीला जाणूनबुजून इतर दोन सशस्त्र हल्लेखोरांकडे हाकलले. यामुळे गर्दी पांगणार नाही आणि टप्प्याटप्प्याने हल्ला करता येईल, हा त्यामागचा उद्देश होता.

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल कुलकर्णी, जम्मू काश्मीर: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या भ्याड हल्ल्यात 26 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यानंतर देशातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या असून या हल्ल्याचा सखोल तपास सुरु आहे. एनआयएकडून या हल्ल्याबाबत तपास सुरु असतानाच एक सर्वात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पहलगाम हल्ल्याबाबत एक सर्वात मोठा खुलासा झाला असून हल्ल्यावेळी दोघांनी गर्दीला हेतुपुरस्सर हल्लेखोरांकडे हाकलल्याचे समोर आले आहे. 22 एप्रिल रोजी दक्षिण काश्मीरच्या पाहलगाम येथील बैसारन माळरानावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन दहशतवाद्यांनी पर्यटकांमध्ये मिसळून गर्दीला जाणूनबुजून इतर दोन सशस्त्र हल्लेखोरांकडे हाकलले. यामुळे गर्दी पांगणार नाही आणि टप्प्याटप्प्याने हल्ला करता येईल, हा त्यामागचा उद्देश होता.

या हल्ल्यात 25 पर्यटक आणि एक स्थानिक टांगा चालक ठार झाला. बैसारनच्या प्रवेश/बाहेर पडण्याच्या बिंदूपासून 50 मीटर अंतरावर दोन ते तीन ठिकाणी गोळीबार झाला. दहशतवाद्यांनी धर्माच्या आधारे लोकांना वेगळं केलं आणि हत्या केली, अशी माहिती आहे. सुरक्षा यंत्रणांना आधीच इनपुट्स मिळाले होते की श्रीनगर आणि डच्छीगाममधील काही “हॉटेल्स” मध्ये संशयित हालचाली होत होत्या. त्यामुळे 22 एप्रिलच्या आधीच काही वरिष्ठ पोलिस अधिकारी श्रीनगरला तैनात होते.

( नक्की वाचा : Devendra Fadnavis : 'जे आले त्यांचा सत्कार, आले नाहीत त्यांचा...' फडणवीसांचा टोला कुणाला? )

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कटरा-बनिहाल रेल्वे मार्गाच्या उद्घाटनाआधी दौऱ्याचे नियोजन होते. त्यामुळे पहलगाम परिसरात पर्यटक पाठवले गेले होते, पण त्या वेळी पर्याप्त सुरक्षा व्यवस्था नव्हती. एक अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, हल्ल्याच्या दिवशी त्या ठिकाणी लष्करी किंवा पोलिस बंदोबस्त नव्हता.

Advertisement

दरम्यान,  दोन स्थानिक तरुण, जे पूर्वी पाकिस्तानात गेले होते, त्यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. त्यांचा हल्ल्यात सहभाग असू शकतो. बैसारनसारख्या दुर्गम भागात स्थानिक मदतीशिवाय अशा प्रकारचा हल्ला करणे शक्य नसल्याचे सुरक्षा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हल्ल्यानंतर दहशतवादी जंगलात पळून गेले. त्यांच्या कुटुंबीयांच्या घरांवर कारवाई न करण्याचा निर्णय घेण्यात आला, कारण त्यामुळे सहानुभूती आणि असंतोष वाढण्याची भीती असल्याचे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Ajit Pawar : एकनाथरावांना मला सांगायचं आहे... नाराज अजित पवारांनी सर्वांसमोरच सुनावलं

Topics mentioned in this article