जाहिरात

Ajit Pawar : एकनाथरावांना मला सांगायचं आहे... नाराज अजित पवारांनी सर्वांसमोरच सुनावलं

Ajit Pawar : एकनाथरावांना मला सांगायचं आहे... नाराज अजित पवारांनी सर्वांसमोरच सुनावलं
मुंबई:

Ajit Pawar on Eknath Shinde : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या गौरवशाली महाराष्ट्र 2025 या कार्यक्रमात राज्याच्या आजी आणि माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला विरोधी पक्षातील माजी मुख्यमंत्री गैरहजर होते. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे देखील अनुपस्थित होते. शिंदे यांच्या अनुपस्थितीवर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले अजित पवार?

एकनाथ शिंदे यांचे प्रतिनिधी म्हणून या कार्यक्रमाला परिवहन मंत्री आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक उपस्थित होते. हा धागा पकडून अजित पवार म्हणाले की, एकनाथरावजींना मला सांगायचे आहे की, येऊ शकला तर प्रतिनिधी पाठवू नका. मी प्रताप सरनाईक यांच्यावर नाराज नाही. आम्ही राष्ट्रवादीमध्ये एकत्र काम केले आहे. असं सुरु राहिलं तर प्रत्येकजण प्रतिनिधी पाठवत जाईल.  हा माजी मुख्यमंत्री यांचा सत्कार आहे 13 कोटी जनतेच्या प्रतिनिधित्व केलेल्याचा सन्मान आहे त्यामुळे ज्याचा आहे तो त्यानेच स्वीकारला पाहिजे , असं अजित पवार यांनी सुनावलं. 

गेल्या 65 वर्षांंमध्ये यशवंतराव चव्हाण ते देवेंद्र फडणवीस पर्यंत जे मुख्यमंत्री झाले त्यांचा गौरव करण्यात येत आहे. जे हयात नाहीत त्यांच्याबाबत सद्भावना व्यक्त करतो. ज्यांना निमंत्रण दिले नसेल, चुकून राहिलं असेल, त्यांची माफी मागतो. या कार्यक्रमाला पक्षीय रंग द्यायचा नव्हता. तर आनंद व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता, असं अजित पवार म्हणाले. 

( नक्की वाचा : Devendra Fadnavis : 'जे आले त्यांचा सत्कार, आले नाहीत त्यांचा...' फडणवीसांचा टोला कुणाला? )
 

जे आले नाहीत त्यांचा

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या कार्यक्रमात बोलताना जे माजी मुख्यमंत्री आले नाहीत त्यांच्याबद्दल वक्तव्य केलं. सगळेच माजी मुख्यमंत्री आले असते तर आनंद झाला असता कारण हा राजकीय मंच नाही. जरी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम असला तरी हा गौरवशाली महाराष्ट्राचा सत्कार होता. त्यामुळे जे आले त्यांचा सत्कार आहे जे नाही आले त्यांचा मनातून सत्कार आहे, असं फडणवीस म्हणाले. फडणवीस यांनी हा टोला कुणाला लगावला? शरद पवार, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? ही चर्चा सुरु झाली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: