
Sai Tamhankar Paragliding Video : मराठी कलाविश्वासह बॉलिवूडमध्येही दमदार अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारी ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकरने वर्ष 2025मध्ये गगनभरारी घेण्याचे ठरवले आणि हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ती खूप मेहनत घेत असल्याचंही दिसतंय. पॅराग्लायडिंगचे प्रशिक्षण घेत असल्याची पोस्ट सईने 2 जानेवारी 2025 रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. या नव्या प्रवासासाठी सेलिब्रिटींसह चाहत्यांनीही तिला शुभेच्छा दिल्या होत्या. यानंतर 19 जानेवारी 2025 रोजी सईने चाहत्यांसोबत भन्नाट व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रसिद्ध अभिनेता आर. माधवन, गायक-संगीत दिग्दर्शक विशाल दादलानीसह कित्येक सेलिब्रिटींनी सईवर अभिनंदन-कौतुकाचा वर्षाव केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
तर सर्वांच्या लाडक्या सईने पॅराग्लायडिंगचे प्रशिक्षण घेत असतानाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये सईने पॅराग्लायडिंग पायलट म्हणून सोलो फ्लाइंग करत असल्याचे दिसते आहे, जे करणे मुळीच सोपी गोष्ट नाहीय. सईच्या धाडसाचे आणि जिद्दीचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.
(नक्की वाचा: तेजश्री प्रधानने अपूर्वा नेमळेकरमुळे प्रेमाची गोष्ट मालिका सोडली का? काय आहे सत्य)
व्हिडीओमध्ये बोल्ड, ब्युटीफुल, बिनधास्त सई ताम्हणकर पॅराग्लायडिंगचे प्रशिक्षण घेताना दिसली. 'पुढे धोका आहे' तरी न घाबरता ती हवेत झेपावताना दिसली. आधी ट्रेनिंग आणि मग झेप असा पॅराग्लायडिंगचा थोडक्यात माहिती देणाऱ्या प्रवासाचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
(नक्की वाचा : कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरचे या महिन्यामध्ये आहे लग्न?)
सई ताम्हणकरच्या या व्हिडीओवर प्रसिद्ध अभिनेता आर. माधवनने कमेंट करत तिचे कौतुक केले आहे. वाह... सई तुझा खूप अभिमान आहे, मला सुद्धा हे करायला हवे, असे माधवनने म्हटलंय.

Photo Credit: Sai Tamhankar Instagram
संगीत दिग्दर्शक विशाल दादलानीने म्हटलंय की, पहिले सोलो फ्लाइट हे जगातील सर्वोत्तम अनुभूती देणारे असते. अभिनंदन!

Photo Credit: Sai Tamhankar Instagram
प्रिया बापट, अमृता खानविलकर, तेजस्विनी पंडित, स्वप्नील जोशीसह मराठी इंडस्ट्रीमधील कलाकारांनीही सई ताम्हणकराचे कौतुक केले आहे.

Photo Credit: Sai Tamhankar Instagram
लवकरच पॅराग्लायडिंगशी संबंधित आणखी एक व्हिडीओ लवकरच शेअर करणार असल्याचे सई ताम्हणकरने सांगितले. नव्या व्हिडीओमध्ये नेमके काय असणार आहे, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world