जाहिरात

पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा हिंदू रक्षा दल करणार सन्मान, रोख रक्कम ही देणार, कारण काय?

हिंदू कुटुंबांची संख्या वाढवण्यासाठी पिंकी चौधरी यांनी जास्त मुले असणाऱ्या कुटुंबांना सन्मानित करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा हिंदू रक्षा दल करणार सन्मान, रोख रक्कम ही देणार, कारण काय?
  • सीमा हैदर पाकिस्तानातून भारतात आली असून तिने भारतात धर्मांतर करून सनातन धर्म स्वीकारला आहे
  • सीमा हैदरने पाकिस्तानात चार मुलांना जन्म दिला आणि भारतात सचिन मीणा यांच्याशी लग्नानंतर दोन मुले झाली आहेत
  • हिंदू रक्षा दलचे राष्ट्रीय अध्यक्ष पिंकी चौधरी यांनी सीमा आणि तिच्या पतीचा सत्कार करण्याची घोषणा केली आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Hindu raksha dal: पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सीमाने सहाव्या अपत्याला जन्म दिल आहे. पाकिस्तानात असताना तिने चार मुलांना जन्म दिला होता. भारतात आल्यानंतर तिने सचिन मीणा सोबत लग्न केले. त्याच्या पासून तिला दोन मुलं झाली आहेत. अशी सहा मुलं तिला आहे. त्यामुळे 'हिंदू रक्षा दल'चे राष्ट्रीय अध्यक्ष पिंकी चौधरी यांनी सीमा हैदर आणि सचिन मीणाचा सत्कार करण्याची घोषणा केली आहे. हिंदू कुटुंबांची संख्या वाढवण्यासाठी पिंकी चौधरी यांनी जास्त मुले असणाऱ्या कुटुंबांना सन्मानित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.

पिंकी चौधरी यांनी आधीच जाहीर केले होते की, चौथ्या अपत्यावर 21,000 रुपये आणि पाचव्या अपत्यावर 31,000 रुपये देऊन हिंदू कुटुंबांचा सन्मान केला जाईल. सीमाने सनातन धर्माचा स्वीकार केला आहे. ती भारतीय संस्कृतीचे पालन करत असल्याने तिचे अभिनंदन करणे आवश्यक असल्याचे चौधरी यांनी म्हटले आहे. "आजच्या आधुनिक काळात भारतीय महिला संस्कृती विसरत असताना सीमा हैदर मात्र बिंदी आणि सिंदूर लावून संस्कृती जपत आहे," असे मत ही त्यांनी व्यक्त केले.

नक्की वाचा -  Seema Haider: पाकिस्तानातून आलेली सीमा हैदर सहाव्यांदा झाली आई, 11 महिन्या पूर्वीच मुलीला दिला होता जन्म

चौधरी यांच्या मते, सीमाने केवळ भारतात येऊन धर्मांतर केले नाही, तर ती खऱ्या अर्थाने भारतीय जीवनशैली अंगीकारत आहे. "ज्या प्रकारे सीमा हैदर भारतावर प्रेम करत आहे, तसे प्रेम सर्वांनीच करायला हवे," असा संदेश त्यांनी दिला. आधुनिकतेच्या नावाखाली संस्कृतीपासून दूर जाणाऱ्यांना सीमा हैदरने आरसा दाखवला असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. त्यामुळे आता लवकरच सीमा आणि सचिनला या संघटनेकडून आर्थिक पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

नक्की वाचा - Shocking: पती, पत्नी अन् पुजारी! भक्तीच्या आड अनैतिक संबंध बहरले, 'प्रॉमिस डे'च्याच दिवशी भयंकर घडले

पिंकी चौधरी यांनी यापूर्वीच 4 किंवा 5 मुले असलेल्या कुटुंबांना रोख रक्कम देऊन सन्मानित करण्याची घोषणा केली होती. सीमा हैदरच्या बाबतीत बोलताना ते म्हणाले की, "सीमा भारतीय संस्कृतीचे उत्तम पालन करत आहे. कपाळावर टिकली आणि भांगेत सिंदूर लावून ती भारतीयांना प्रेरणा देत आहे." सीमा हैदरप्रती असलेला हा सन्मान म्हणजे तिच्या बदललेल्या जीवनशैलीला मिळालेली पावती असल्याचे बोलले जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com