स्वातंत्र्यानंतर भारताला पहिल्यांदा पाठीचा कणा असलेलं परराष्ट्र धोरण मिळालं : अमित शाह

अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या. आज पंतप्रधान मोदींचा वाढदिवस आहे. देशभरातील अनेक संस्थांनी त्यांचा वाढदिवस सेवा पंधरवडा म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

मोदी 3.0 के 100 दिन:

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचे आज 100 दिवस पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केंद्र सरकारच्या 100 दिवसांच्या कामाचा लेखाजोखा मांडला. यावेळी त्यांनी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या 100 दिवसांच्या कामाच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या. आज पंतप्रधान मोदींचा वाढदिवस आहे. देशभरातील अनेक संस्थांनी त्यांचा वाढदिवस सेवा पंधरवडा म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर असे 15 दिवस आमच्यासारखे अनेक कामगार देशाची सेवा करतील.

(नक्की वाचा-  PM Modi Birthday : डिजिटल इंडिया ते कलम 370, देश बदलणारे हे आहेत मोदींचे 9 मोठे निर्णय)

भारताला पाठीचा कणा असलेलं धोरण मिळालं- अमित शाह

अमित शाह यांनी म्हटलं, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित आहे आणि त्यांनी संपूर्ण जगात भारताला प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. 15 देशांनी पंतप्रधान मोदींना सर्वोच्च सन्मान दिला आहे. आता देशाला पाठीचा कणा असलेले परराष्ट्र धोरण आहे. 

पंतप्रधान मोदींच्या 10 वर्षांच्या नेतृत्वात देशाने बाह्य, अंतर्गत सुरक्षा आणि संरक्षण यंत्रणा मजबूत करून सुरक्षित भारताची निर्मिती केली आहे. 60 वर्षांनंतर पहिल्यांदाच देशात राजकीय स्थिरतेचे वातावरण आहे. आज 140 कोटी जनता पंतप्रधानांसाठी मनापासून प्रार्थना करत आहे, असंही अमित शाह यांनी म्हटलं. 

( नक्की वाचा : Vande Metro : देशातील पहिल्या 'वंदे मेट्रो'चं किती आहे तिकीट? काय आहे वेगळेपण? वाचा संपूर्ण माहिती )

आयुष्मान भारत योजना आज देशातील अनेकांसाठी आधार बनली आहे. 5 लाख रुपयांपर्यंतचा सर्व खर्च एनडीए सरकार उचलत आहे. आम्ही जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार, 70 वर्षे किंवा त्याहून अधिक वृद्ध लोकांना अधिक कव्हरेज दिले जाईल, असंही अमित शाह यांनी म्हटलं.