PM Modi : झारखंड विधानसभा निवडणुकांच्या प्रचारसभेला गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड आल्याचं वृत्त आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या विमानाची देवघर विमानातळावर इमरर्जन्सी लँडींग करावी लागली. त्यानुळे त्यांना वेळापत्रकात बदल करावा लागला. या तांत्रिक बिघाडामुळे पंतप्रधानांना दिल्लीमध्ये परतण्यास उशीर लागू शकतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त झारखंडमध्ये दोन सभा घेतल्या. बिरसा मुंडा यांची जयंती 'जनजातीय गौरव दिवस' म्हणून देशभर साजरी केली जाते.
यापूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरला देवघरमधूनच टेक ऑफची परवानगी मिळाली नाही. राहुल गांधी झारखंडमधील गोड्डामधील प्रचारसभेनंतर दिल्लीमध्ये परतणार होते. पण एअर ट्रॅफिक कंट्रोलनं (ATC) गोड्डा ते बेलबड्डामध्ये उड्डाण देण्यास परवानगी मिळाली नाही. त्यामुळे राहुल गांधी यांना देवघर विमानतळावर 45 मिनिटं थांबावं लागलं. या काळात राहुलगृ गांधी हेलिकॉप्टरमध्येच बसून होते आणि मोबाईल पाहात होते.
राहुल गांधीच्या हेलिकॉप्टर टेकऑफला लवकर परवानगी न मिळाल्यानं आता राजकारण सुरु झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमुळेच राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरला उड्डाण करण्यास परवानगी देण्यात आली नाही, असा आरोप काँग्रेसनं केलाय.
( नक्की वाचा : '... तर तुम्हाला चांगली झोप लागेल', PM मोदींनी ठेवलं ठाकरेंच्या मर्मावर बोट )
झारखंड विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात 38 जागांवर मतदान होणार असून त्यासाठी 528 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.